एका महिन्यात 120 लाख प्रोडक्ट्स विकून Xiaomi ने केला रेकॉर्ड, 85 लाख स्मार्टफोन्स सह विकले गेले 6 लाख MI TV

भारतीय बाजारात यशस्वी झाल्यानंतर Xiaomi ची स्पर्धा Samsung शी होती. तसेच गेल्या काही महिन्यांत Realme चे नाव इतक्या वेगाने वर येत आहे कि या ब्रँडला Xiaomi चा प्रतिस्पर्धी म्हटले जात आहे. Realme ने कालच माहिती दिली होती कि साल 2019 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने ग्लोबल मार्केट मध्ये 10 मिलियन म्हणजे 1 कोटी स्मार्टफोन्सची शिपमेंट केली आहे जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 808 टक्के जास्त आहे. तर आज Realme च्या प्रसिद्धीनंतर Xiaomi ने पण घोषणा केली आहे कि ब्रँडने फक्त एका महिन्यात भारतात 12 मिलियन म्हणजे 1.2 कोटी Xiaomi डिवाईस विकून नवीन रेकॉर्ड केला आहे.

Xiaomi ने प्रसिद्धीपत्रक पाठवून आपल्या या नवीन रेकॉर्डची माहिती दिली आहे. Xiaomi ने सांगितले आहे कि सणासुदीच्या निमित्ताने कंपनीने आयोजित केलेल्या फेस्टिवल सेल्स मध्ये ब्रँडचे 12 मिलियन पेक्षा पण जास्त डिवाईस विकले गेले आहेत. Xiaomi चे हे आकडे फक्त एका महिन्याचे आहेत. 28 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर पर्यंत भारतात 120 लाखांपेक्षा पण जास्त Xiaomi प्रोडक्ट्सची विक्री झाली आहे. या प्रोडक्ट्स मध्ये Xiaomi स्मार्टफोन्स सोबत Mi TV, Mi Ecosystem आणि Accessory चा समावेश होता.

40 टक्क्यांची वाढ

Xiaomi नुसार गेल्या एका महिन्यात साल 2018 मध्ये आयोजित फेस्टिवल सेलच्या तुलनेत यावर्षी ब्रँडने भारतात 40 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्यावर्षी याच दिवसांत Xiaomi चे 8.5 मिलियन म्हणजे 85 लाख डिवाईस विकले गेले होते, पण यावर्षीच्या फेस्टिवल सेल मध्ये Xiaomi ने 120 लाखांपेक्षा पण जास्त प्रोडक्ट विकले आहेत. या Xiaomi प्रोडक्ट्सचा सेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइट मी डॉट कॉम सोबत मी होम, फ्लिपकार्ट आणि अमेझॉन तसेच रिटेल स्टोर्स वर झाला आहे.

हे देखील वाचा: जगातील पहिला 108 एमपी कॅमेरा असेलला फोन Xiaomi Mi CC9 Pro, 5 नोव्हेंबरला होईल लॉन्च

85 लाख स्मार्टफोन

Xiaomi नुसार या महिन्याभरात ब्रँडचे 8.5 मिलियन म्हणजे 85 लाखांपेक्षा पण जास्त स्मार्टफोन विकले गेले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी विकले गेलले स्मार्टफोन 37 टक्के जास्त आहेत. याच काळात Redmi Note 7 सीरीज Xiaomi ची सर्वात जास्त विकली जाणारी सीरीज होती तर Redmi 7 आणि Redmi 7A अमेझॉन वर विकले गेलेले बेस्ट बजेट स्मार्टफोन बनले.

6 लाख टीवी

Xiaomi चे स्मार्टफोननेच नाही तर स्मार्टटीवीने पण यूजर्सना आकर्षित केले आहे. शाओमीनुसार यावर्षी आयोजित झालेल्या फेस्टिव सेल मध्ये 6,00,000 Mi TV ची विक्री झाली आहे. हि विक्री गेल्या वर्षी झालेल्या सेल पेक्षा 48 टक्के जास्त आहे. Xiaomi म्हणते आहे कि साधारणतः एका महिन्यात संपूर्ण स्मार्ट टीवी इंडस्ट्री मध्ये 4 लाखांपर्यंत स्मार्ट टेलीविजन विकले जातात पण Xiaomi ने फक्त एका महिन्यात 6 लाख टीवी विकले आहेत.

हे देखील वाचा: फक्त तीन महिन्यात भारतीयांनी विकत घेतले 490 लाख फोन, Xiaomi आहे नंबर वन तर Realme आहे सर्वात वेगवान

तीन महिन्यात विकले गेले 490 लाख फोन

काउंटरप्वाइंटच्या रिपोर्ट नुसार जुलै ते सप्टेंबर महिन्यात भारतात 490 लाख स्मार्टफोन्सचा सेल झाला आहे. या आकड्यांची प्रमुख करणे म्हणजे स्मार्टफोन कंपन्यांनी केलेले नवीन लॉन्च, स्मार्टफोन्स वर देण्यात आलेला डिस्काउंट आणि दिवाळीच्य आधी वेगवेगळ्या शॉपिंग साइट वर आयोजित झालेला सेल असल्याचे बोलले जात आहे. रिपोर्ट नुसार 49 मिलियन यूनिटच्या या विक्रीत एकट्या Xiaomi ने 26 टक्के मार्केट शेयर आपल्या नावे केला आहे. साल 2018 च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत साल 2019 च्या तिसऱ्या तिमाहीत Xiaomi ने 7 टक्क्यांची वाढ केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here