Xiaomi चे स्वस्त Smart TV लाँच; शानदार फीचर्ससह Xiaomi Smart TV X Series चा 43-इंचाचा मॉडेल सादर

Xiaomi नं भारतात Xiaomi NoteBook Pro 120G लॅपटॉपसह नवीन स्मार्ट टीव्ही सीरीज देखील लाँच केली आहे. कंपनीनं Xiaomi Smart TV X Series मध्ये तीन नवीन मॉडेल सादर केले आहेत. यात 43-इंच, 50-इंच आणि 55-इंच मॉडेलचा समावेश आहे. नवीन Xiaomi Smart TV 4K रिजॉल्यूशनसह येतात आणि या smart TV series मध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे स्मार्ट टीव्ही खूप कमी किंमतीत लाँच झाले आहेत. या स्मार्ट टीव्हीमध्ये खासकरून डॉल्बी व्हिजन, एचडीआर 10, अँड्रॉइड टीव्हीसाठी पॅचवॉल युआय स्किन आणि अनेक सुविधा मिळतात. चला जाणून घेऊया Xiaomi च्या स्मार्ट टीव्हीची सविस्तर माहिती.

Xiaomi स्मार्ट टीव्ही एक्स सीरीजचे फीचर्स

डिस्प्ले साइजमधील फरक सोडला तर सर्व टीव्हीचे फीचर्स सारखेच आहेत. Xiaomi स्मार्ट टीव्ही X सीरीजमध्ये 3840 x 2160 पिक्सल रिजॉल्यूशनसह 4K पॅनल आणि 94% DCI-P3 कलर स्पेस मिळते. हा डिस्प्ले 4K HDR, HLG आणि HDR 10 कंटेंटला सपोर्ट करतो. तसेच डॉल्बी व्हिजनला सपोर्ट देखील मिळतो. टीव्हीमध्ये विविड पिक्चर इंजिन सपोर्ट देखील देण्यात आला आहे ज्याच्या मदतीनं कलर, कॉन्ट्रास्ट आणि डेप्थचा शानदार अनुभव मिळतो. हे देखील वाचा: स्वस्तात खूप पावरफुल स्मार्टफोन! पुढील आठवड्यात येतोय POCO M5, कंपनीनं सांगितली किंमत

टीव्हीची डिजाइन पाहता Xiaomi स्मार्ट टीव्ही X मध्ये मेटलची बेजेल-लेस बॉर्डर मिळते, त्यामुळे या टीव्हीला प्रीमियम लुक मिळतो. चांगल्या ऑडियोसाठी टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडियो आणि डीटीएस व्हर्च्युअल एक्स सपोर्टसह 30W स्पिकर सेटअप मिळतात. टीव्हीमध्ये 2GB रॅम, 8GB स्टोरेज, क्वॉड कोर A55 SoC प्रोसेसर, 3 HDMI पोर्ट (eARC x 1), 2 USB पोर्ट, AV, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, Xiaomi रिमोट आणि एक 3.5 मिमी हेडफोन जॅक मिळतो.

OS पाहता तिन्ही टीव्ही Android 10 TV OS आणि Xiaomi च्या पॅचवॉल UI वर चालतात. टीव्हीमध्ये यूनिवर्सल सर्च, 300+ लाइव्ह चॅनेल, पॅरेंटल लॉकसह किड्स मोड, Mi होम सह 15 भाषांचा सपोर्ट मिळतो. हे देखील वाचा: कमी किंमतीत जबरदस्त स्पेसिफिकेशन्स; 64MP Camera असलेला Redmi Note 11 SE भारतात लाँच

Xiaomi Smart TV X Series ची प्राइस

Xiaomi स्मार्ट टीव्हीच्या 43-इंच मॉडेलची किंमत 28,999 रुपये आहे, तर 50-इंच मॉडेलची किंमत 34,999 रुपये ठेवण्यात आली आहे तर 55-इंचाचा टॉप मॉडेल 39,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या स्मार्ट टीव्ही मॉडेलची विक्री भारतात 14 सप्टेंबरपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart सह Mi.com आणि Mi स्टोर्सवर केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here