डिस्काउंटसह मिळत आहेत Redmi आणि Mi चे स्मार्ट टीव्ही; सुरु झाला Xiaomi चा Sale Out सेल

Xiaomi ची सेल आउट (Sale Out) स्कीम सुरु झाली आहे. शाओमीच्या या स्कीमसह Redmi आणि Mi चे स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करता येतील. शाओमीचा हा सेल 14 डिसेंबर ते 19 डिसेंबर म्हणजे 6 दिवस चालेल. Xiaomi च्या या ऑफरसह स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. इथे आम्ही तुम्हाला Redmi आणि Mi च्या स्मार्ट टीव्हीवर मिळणाऱ्या डिस्काउंटची माहिती देत आहोत.

Redmi आणि Mi के स्मार्ट टीव्हीवरील ऑफर्स

Xiaomi च्या सेल आउट स्कीम दरम्यान कंपनीच्या स्मार्ट टीव्हीवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. इथे आम्ही आम्ही तुम्हाला या टीव्हीवर मिळणाऱ्या डिस्काउंटची माहिती दिली आहे. हे देखील वाचा: ओटीपी नव्हे तर फक्त मिस कॉल देऊन बँक अकाऊंटमधून काढले 50 लाख; असा आहे ‘सिम स्वॅप’ फ्रॉड

Redmi 32

Redmi 32 इंच स्मार्ट टीव्हीवर 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. रेडमीच्या या टीव्हीची MRP 13,999 रुपये आहे, जी डिस्काउंटनंतर 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Mi 32 5A

Mi 32 5A स्मार्ट टीव्हीवर 500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. शाओमीच्या या टीव्हीची एमआरपी 13,999 रुपये आहेत. डिस्काउंटमुळे हा टीव्ही फक्त 13599 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Mi 40 5A

Mi 40 5A स्मार्ट टीव्ही 1000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. टीव्हीची एमआरपी 21,999 रुपये आहे, परंतु सेल अंतर्गत हा टीव्ही 20,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे.

Redmi 43

Redmi 43 स्मार्ट टीव्हीवर शाओमीच्या सेल आउट स्कीम दरम्यान 2000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे 23,999 रुपये एमआरपी असलेला हा मॉडेल डिस्काउंटनंतर 21,999 रुपयांमध्ये तुमचा होईल.

Mi 43 5x

Mi 43 5x स्मार्ट टीव्हीवर 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. Mi च्या 43 इंच टीव्हीची एमआरपी 31,999 रुपये आहे, जी आता 30,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Redmi 50

Redmi 50 स्मार्ट टीव्हीची साइज 50 इंच आहे, जिच्यावर 1000 रुपयांचा डिस्काउंट आहे. या टीव्हीची एमआरपी 32,999 रुपये आहे. सेल दरम्यान हा टीव्ही 31,999 रुप्यानमध्ये तुमचा होईल.

Xiaomi X50

Xiaomi X50 स्मार्ट टीव्हीवर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. इतरवेळी शाओमीचा हा टीव्ही 34,999 रुपयांमध्ये खरेदी करावा लागतो परंतु सेलमध्ये याची किंमत 32,999 रुपये झाली आहे. हे देखील वाचा: OnePlus 11 ची लाँच डेट लीक! कंपनीच्या 9th anniversary च्या दिवशी येईल सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन

Xiaomi X43

Xiaomi X43 स्मार्ट टीव्हीवर सेल आउट स्कीम दरम्यान 1000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. या टीव्हीची मूळ किंमत 28,999 रुपये आहे, परंतु सेल दरम्यान हा टीव्ही 27,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here