Redmi Y3 आणि Redmi 7 भारतात लॉन्च, Xiaomi पुन्हा करणार नवीन रेकॉर्ड

देशातील नंबर वन ब्रँड बनलेल्या शाओमी ने आज भारतात पुन्हा एकदा आपले स्मार्टफोन्स वाढवले आहेत. शाओमी ने भारतीय स्मार्टफोन बाजारात आपली स्थिती अजून मजबूत करत एक साथ दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीने Redmi Y3 आणि Redmi 7 लॉन्च केले आहेत. शाओमीचे हे दोन्ही स्मार्टफोन लो बजेट सेग्मेंट मध्ये सादर झाले आहेत जे कमी किंमतीत शानदार लुक सोबत दमदार स्पेसिफिकेशन्स पण देतात. चला एक नजर टाकूया Xiaomi Redmi Y3 आणि Redmi 7 वर :

डिजाईन
Xiaomi ने Redmi Y3 आणि Redmi 7 दोन्ही स्मार्टफोन बेजल लेस डिजाईन असलेल्या वॉटरड्रॉप नॉच वर सादर केले आहेत. डिस्प्लेच्या तिन्ही बाजूंनी फोन बेजल लेस आहे तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Redmi Y3 आणि Redmi 7 च्या बॅक पॅनल वर डावीकडे डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे. बॅक पॅनल वरच फिंगरप्रिंट सेंसर आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर व पावर बटण देण्यात आले आहे तसेच डावीकडील पॅनल वर सिम स्लॉट आहे.

डिस्प्ले
Redmi Y3 आणि Redmi 7 हे दोन्ही फोन डॉटनॉच डिस्प्ले वर सादर करण्यात आले आहेत. या फोन मध्ये 2.5डी कर्व्ड ग्लास कोटेड 19:9 आस्पेक्ट रेशियो वाली 6.26-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1520 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन सपोर्ट करतो. स्क्रीन प्रोटेक्शन साठी शाओमी ने आपला हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला आहे.

प्रोसेसिंग
Redmi Y3 आणि Redmi 7 शाओमीने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केले आहेत जे मीयूआई 10 आधारित आहेत. हे दोन्ही फोन 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 14एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतात. तसेच ग्राफिक्स साठी Redmi Y3 आणि Redmi 7 मध्ये ऐड्रेनो 506 जीपीयू देण्यात आला आहे.

रॅम व स्टोरेज
शाओमीने हे दोन्ही स्मार्टफोन भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्सचे सर्व वेरिएंट्स माइक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतात ज्यामुळे फोनची मेमरी 512जीबी पर्यंत वाढवता येते.

Redmi Y3 चा एक वेरिएंट 3जीबी रॅम मेमरी सह 32जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

Redmi 7 चा सर्वात छोटा वेरिएंट 2जीबी रॅम मेमरी सह 32जीबी इंटरनल मेमरी सपोर्ट करतो. तर रेडमी 7 च्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी
शाओमीने Redmi Y3 आणि Redmi 7 दोन्ही स्मार्टफोन्स डुअल रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फोन एआई टेक्नॉलॉजी सह येतात. दोन्ही फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये सेकेंडरी रियर कॅमेरा 2-मेगापिक्सलचा आहे जो डेफ्थ सेंसिंगला सपोर्ट करतो.

सेल्फी बद्दल बोलायचे तर Redmi Y3 शाओमी ने 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात आणला आहे. तर Redmi 7 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह लॉन्च केला गेला आहे. शाओमीचे हे दोन्ही फोन एआई पोर्टरेट मोडला सपोर्ट करतात.

सिक्योरिटी व कनेक्टिविटी
Xiaomi Redmi Y3 आणि Redmi 7 दोन्ही फोन मध्ये सिक्योरिटी आणि फोन अनलॉकिंग साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच सोबत हे दोन्ही फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतात. तसेच हे दोन्ही फोन डुअल सिम, 4जी वोएलटीई सोबत ब्लूटूथ, वाईफाई व आईआर ब्लास्टर सारख्या फीचर्स सह येतात.

बॅटरी
शाओमी ने आपल्या यूजर्सची काळजी घेत दोन्ही स्मार्टफोन्स Redmi Y3 आणि Redmi 7 मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी दिली आहे. पण कंपनी ने आपल्या नवीन फोन्स मध्ये फास्ट चार्जिंग दिली नाही. लिहाजा फोनची हि पावरफुल बॅटरी माइक्रो यूएसबीने चार्ज करता येईल.

कलर ऑप्शन
Xiaomi फॅन्स रंगांच्या बाबतीत चूजी असतात आणि म्हणूनच शाओमी आपले स्मार्टफोन्स अनेक आर्कषक रंगात लॉन्च करते.
Redmi Y3 भारतात प्राइम ब्लॅक, बोल्ड रेड आणि एलिगेंट ब्लू कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.
Redmi 7 को इक्लिप्स ब्लॅक, लुनार रेड आणि कॉमेट ब्लू कलर मध्ये विकत घेता येईल.

किंमत
Redmi Y3

3जीबी रॅम + 32जीबी मेमरी = 9,999 रुपये
4जीबी रॅम + 64जीबी मेमरी = 11,999 रुपये

Redmi 7
2जीबी रॅम + 32जीबी मेमरी = 7,999 रुपये
3जीबी रॅम + 32जीबी मेमरी = 8,999 रुपये

शाओमी Redmi 7 29 एप्रिल पासून आपल्या पहिल्या सेल साठी उपलब्ध होईल तर Redmi Y3 30 एप्रिल पासून फ्लॅश सेल मध्ये विकत घेता येईल. हे दोन्ही स्मार्टफोन शाओमीच्या अधिकृत वेबसाइट सोबत शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वरून पण विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here