शाओमी ने पण बनवला पॉप-अप कॅमेरा वाला फोन, रेडमी प्रो 2 चा खरा फोटो आला समोर

Xiaomi आपल्या रेडमी सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो रेडमी प्रो 2 नावाने लॉन्च केला जाईल. मागे चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर एक पोस्ट समोर आली होती ज्यात Redmi Pro 2 चा एक फोटो तसेच फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली होती. या पोस्ट वरून समजले होते कि रेडमी प्रो 2 शाओमी द्वारा पॉप-अप सेल्फी कॅमेरा सह बाजारात येईल तसेच हा एक हाईएंड फ्लॅगशिप फोन असेल. या लीक मध्ये फोनची कान्सेप्ट ईमेज दाखवण्यात आली होती आता Redmi Pro 2 संबंधित अजून एक महत्त्वाचा लीक समोर आला आहे ज्यात फोनची रियल ईमेज दाखवण्यात आला आहे.

Redmi Pro 2 ची ही रियल ईमेज पण चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर शेयर केला गेला आहे. या पोस्ट मध्ये एका व्यक्तिने आपल्या हातात फोन पकडला आहे, ज्याच्या वरच्या पॅनल आणि रियर पॅनल दिसत आहे. पोस्ट मध्ये सांगण्यात आले आहे की हा फोन शाओमीचा आगामी डिवाईस Redmi Pro 2 आहे. या फोटो मध्ये फोन मध्ये वरच्या पॅनल वर एक पॉप-अप कॅमेरा दाखवण्यात आले आहे. हा पॉप अप कॅमेरा फोन बॉडी च्या मध्ये देण्यात आला आहे. विशेष म्हणजे लीक झालेल्या फोटो मध्ये पॉप अप कॅमेरा बॉडी वर उजव्या बाजूला दाखवण्यात आला होता.

हे देखील वाचा: शाओमी फॅन्स साठी खुशखबरी : रेडमी गो साठी आता बघावी लागणार नाही फ्लॅश सेलची वाट, ओपन सेल मध्ये झाला उपलब्ध

रेडमी प्रो 2 डिजाईन
Xiaomi Redmi Pro 2 च्या लीक झालेल्या या रियल ईमेज मध्ये फोन रेड कलर मध्ये दाखवण्यात आला आहे. फोनच्या वरच्या पॅनल वर बॉडी मधून सेल्फी कॅमेरा बाहेर निघाला आहे. फोनच्या वरच्या पॅनल वर पॉप अप कॅमेर्‍याच्या दोन्ही बाजूला एंटिना बॅण्ड डिजाईन देण्यात आला आहे. Redmi Pro 2 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. बॅक पॅनल वर कॅमेरा फोन उजवीकडे आहे. तिन्ही कॅमेरा सेंसरच्या वर किंवा बाजूला फ्लॅश लाईट देण्यात आलेली नाही, त्यामुळे फ्लॅश कॅमेरा सेटअप खाली असू शकतो. या फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर पण दिसत नाही. बोलले जात आहे की हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल.

रेडमी प्रो 2 स्पेसिफिकेशन्स
Redmi Pro 2 चे आफिशियल स्पेसिफिकेशन्स समोर आले नाहीत पण लीक्स मध्ये खुलासा झाल्यानंतर बोलले जात आहे की शाओमी आपला फोन हाईएंड डिवाईस म्हणून फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आणेल. लीक मध्ये सांगण्यात आले आहे की रेडमी प्रो 2 क्वालकॉमच्या नवीन आणि पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 855 सह बाजारात येऊ शकतो. तसेच Redmi Pro 2 चा ट्रिपल रियर कॅमेर्‍या सेटअप मध्ये एक कॅमेरा सेंसर 48-मेगापिक्सलचा दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा: 60 लाख यूजर जोडल्याचा आनंद साजरा करत आहे रियलमी, 4 दिवस स्वस्त मिळतील फोन, सोबत फ्री गिफ्ट

Xiaomi Redmi Pro 2 मध्ये पॉप-अप कॅमेरा निश्चित झाला आहे रेडमी प्रो 2 मध्ये कोणतीही नॉच किंवा पंच-होल डिस्प्ले नसेल तसेच हा फोन फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च होईल. विशेष म्हणजे चिपसेट पाहता असे पण म्हणता येईल कि Redmi Pro 2 6जीबी रॅम मेमरी किंवा 8जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केला जाऊ शकतो. फोन मध्ये 128जीबी मेमरी तसेच 256जीबी इंटरनल स्टोरेज पण दिसेल.

Xiaomi ने अजूनतरी Redmi Pro 2 च्या लॉन्च बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. पण समोर आलेल्या या रियल ईमेज वरून स्पष्ट झाले आहे की रेडमी प्रो 2 निर्मिती झाली आहे आणि मार्केट मध्ये येण्यासाठी तयार झाला आहे. आशा आहे की शाओमी लवकरच Redmi Pro 2 लॉन्च बद्दल माहिती देईल आणि येणार्‍या काही दिवसांत हा फोन टेक मंचावर येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here