काय झाले जेव्हा शाओमी रेडमी नोट 7 पाठवण्यात आला अंतरिक्षात, अवकाशातून घेतले पृथ्वीचे फोटो !

शाओमीने यावर्षी रेडमी आपला सब ब्रँड म्हणून सादर केला होता. रेडमी ब्रँडिंग अंतर्गत सर्वात आधी Redmi Note 7 स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च केला होता. रेडमी नोट 7 नंतर भारतात Redmi Note 7 Pro नावाने लॉन्च झाला आहे. Redmi Note 7 लॉन्चच्या वेळी कंपनी ने फक्त यूजर्सना पावरफुल स्पेसिफिकेशन्स देण्याची घोषणा केली नव्हती तर सोबत असा दावा पण केला होता कि त्यांचा फोन दमदार बिल्ड क्वॉलिटी सह येईल आणि प्रत्येक परिस्थिती मध्ये चांगली परफॉर्मेंस देऊ शकेल. शाओमीचा हा दावा तापसण्यासाठी Redmi Note 7 अंतरिक्षात पाठवण्यात आला. त्यांनतर जे झाले ते बघून तुम्ही हैराण व्हाल.

रेडमी नोट 7 चे अवकाश मिशन
Xiaomi Redmi Note 7 “out of the world” डिवाईस सिद्ध करण्यासाठी शाओमी ने या अनोख्या मिशनची योजना बनवली. शाओमी यूरोपच्या टीमने संपूर्ण मिशनची योजना तयार केली आणि निश्चित वेळी हा फोन स्पेस म्हणजे अंतरिक्षात पाठवण्यात आला. Redmi Note 7 अंतरिक्षात नेण्यासाठी एक हाइड्रोजन बलून तयार करण्यात आला आणि त्यात पृथ्वी बाहेरील वातावरणातील ओजोन लेअर पार करून अंतरिक्षात पोहचण्याइतका आणि एका ठराविक उंची नंतर तो पुन्हा पृथ्वीवर परत येईल इतका गॅस भरण्यात आला.

हा हाइड्रोजन बलून खूप खास पद्धतीने बनवण्यात आला ज्यात अनेक कॅमेरा फिट होते. या कॅमेऱ्यांसोबत एक स्पेशल स्टॅन्ड पण होता ज्यात Redmi Note 7 फोन होता. शाओमीचा फोन ऑन करून या बलूनच्या स्टॅन्ड वर फिट करण्यात आला आणि हाइड्रोजन बलून उडवण्यात आला. हैराणीची बाब म्हणजे Redmi Note 7 शी बांधलेला हाइड्रोजन बलून 33,375 मीटर पर्यंतची उंची गाठून अंतरिक्षात पोचला.

Redmi Note 7 जेव्हा अंतरिक्षात पोचला तेव्हा तिथे जाऊन पृथ्वीचे काही फोटो क्लिक करण्यात आले. या फोटोज मध्ये पृथ्वीचे बाह्यावरण आणि अंतरिक्ष स्पष्ट दिसत आहे. हैराणीची बाब अशी कि जेव्हा Redmi Note 7 बलूनच्या मदतीने अंतरिक्षात पोचला तेव्हा तिथले तापमान -58°C होते. म्हणजे इतक्या थंडीत माणसाचे रक्त गोठले असते.

Xiaomi Redmi Note 7 स्पेस मिशन मध्ये जेव्हा फोन पुन्हा जमिनीवर आला तेव्हापण फोन योग्यरीत्या चालू होता. फोन तेव्हापण चालू होता आणि त्याचे सर्व पार्ट्स पूर्णपणे चालत होते. या अनोख्या मिशन ने शाओमीचा दावा सिद्ध केला आहे, सोबत Redmi Note 7 ची मजबूती “out of the world” आहे असे पण समजले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here