शाओमी घेऊन येत आहे अनोखा फोन, बॉटमला असतील दोन सेल्फी कॅमेरे

स्मार्टफोन निर्माता कंपन्या सध्या हाई स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो असलेलं डिवाइस सादर करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. बेजल्स कमी करण्याऐवजी, कंपन्या आता कॅमेरे नॉच डिस्प्ले मध्ये किंवा पॉप-अप मॅकेनिज्म मध्ये सादर करत आहेत. आता चीनच्या स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीच्या अपकमिंग फोनचा पेटेंट दिसला आहे, जो बघून वाटत आहे कि कंपनी मी मिक्स सीरीजचा फोन सादर करण्याच्या योजने वर काम करत आहे.

पेटेंटनुसार कंपनी एका स्मार्टफोन मध्ये डुअल फेसिंग कॅमेरा सेंसर देऊ शकते. पण हे कॅमेरा वरच्या ऐवजी खाली नॉच सह सादर केले जाऊ शकतात. पेटेंट मधील फोटोज मध्ये याचा खुलासा झाला आहे. पेटेंट मध्ये आलेल्या फोटोज नुसार कंपनी आपल्या अपकमिंग फोन मध्ये खालच्या बाजूला नॉच मध्ये दोन कॅमेरा सेंसर देईल.

जर असे झाले तर हि नवीन गोष्ट नसेल. याआधी पण कंपनीने मी मिक्स स्मार्टफोन मध्ये बॉटमला कॅमेरा दिले आहेत. हि डिजाइन आल्यानंतर प्रश्न असा समोर येतो कि खाली देण्यात आलेल्या कॅमेऱ्यामुळे सेल्फी आणि वीडियो कॉलिंग मध्ये किती फरक पडेल.

हे देखील वाचा: खुशखबर : 4जीबी रॅम असलेला रियलमी यू1 झाला 1500 रुपयांनी स्वस्त, किंमत फक्त 9,999 रुपयांपासून सुरु

तसेच अजून एक पेटेंट समोर आला आहे त्यातल्या फोटोज मध्ये फ्रंट पॅनल वर डुअल कॅमेरा खालच्या बाजूला दिसत आहे. पण या पेटेंट मध्ये डुअल कॅमेऱ्या पैकी एक कॅमेरा राइट बॉटम आणि दुसरा कॅमेरा लेफ्ट बॉटम मध्ये आहे. या पेटेंट वरून एवढे निश्चित झाले आहे कि कंपनी लवकरच मी मिक्स सीरीज मध्ये आपला स्मार्टफोन सादर करणार आहे.

अलीकडेच चीनच्या माइक्रोब्लगिंग वेबसाइट वीबो वर शाओमी ने एक टीजर जारी केला आहे, ज्यावरून अन्दाज लावला जात आहे कि कंपनी लवकरच मी मिक्स 4 सादर करू शकते. वीबो वर एक फोटो शेयर करण्यात आला आहे. या फोटो मध्ये मी मिक्स सीरीजचे स्मार्टफोन्स दिसत आहेत, ज्यात मी मिक्स, मी मिक्स 2 आणि मी मिक्स 3 सोबत अजून एक मॉडेल आहे ज्यात नाव आणि डिजाइन दाखवण्यात आली नाही. पण हा बघून निश्चितपणे सांगता येते कि कि हा फोन मी मिक्स मॉडेल मध्ये सादर केला जाईल.

हे देखील वाचा: वोडाफोन पुन्हा एकदा प्रीपेड यूजर्स साठी घेऊन आला आहे 50 आणि 100 रुपयांचे रिचार्ज प्लान, मिळतील हे फायदे

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मी मिक्स 3 बीजिंग मध्ये सादर करण्यात आला होता. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट सोबत क्वालकॉम एक्स50 मॉडेमला सपोर्ट करतो. आणि याच हार्डवेयर मुळे फोन मध्ये 5जी कनेक्टिविटी उपलब्ध झाली आहे. चर्चा अशी होती कि शाओमी हा फोन यूरोपियन देशांमध्ये पण लॉन्च करेल आणि मार्च किंवा त्याआधीपासून मी मिक्स 3 ग्लोबल मार्केट मध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल जे झाले नाही.

सोर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here