10जीबी रॅम आणि 5जी सपोर्ट सह येत आहे शाओमी मी मिक्स 3! 25 ऑक्टोबरला होईल लॉन्च

शाओमी ने दीर्घ प्रतीक्षेनंतर सांगितले आहे की कंपनीचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन मी मिक्स 3 येत्या 25 ऑक्टोबरला सादर होईल. मी मिक्स 3 च्या लॉन्च बद्दल कंपनी ने अनेक टीजर ईमेज पण शेयर केल्या आहेत ज्यातून फोनच्या डिजाईन व लुकचा अंदाज लावला जात आहे. जरी शाओमी ने अजून मी मिक्स 3 चे स्पेसिफिकेशन्स सांगितले नसले तरी एका ताज्या लीक मधून अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्यामुळे इतर स्मार्टफोन कंपन्यांना धक्का बसेल तर दुसरीकडे शाओमी फॅन्सना मोठे सरप्राइज मिळेल. बातमी अशी आहे की शाओमी मी ​मिक्स 3 10जीबी रॅम सह लॉन्च होईल.

शाओमी ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर फोटो ईमेज शेयर केली आहे ज्यात दोन कार्ड आहेत, एकावर ‘5’ लिहिण्यात आले आहे तर दुसर्‍या वर ’10’ लिहिलेल आहे. आपल्या पोस्ट वर शाओमी चाइना ने सांगितले आहे की शाओमीचा हा आगामी डिवाईस मी मिक्स 3 5जी नेटवर्क सपोर्ट सह लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे शाओमी मी मिक्स 3 जगातील पहिला फोन असेल जो 5जी सपोर्ट सह येईल आणि लोकांच्या वापरासाठी उपलब्ध होईल.

शाओमी मी मिक्स 3 बद्दल समजले आहे की कंपनी हा फोन 10जीबी रॅम सह बाजारात आणेल. काही दिवसांपूर्वी शाओमी मी मिक्स 3 चा वीडियो पण शेयर करण्यात आला होता की ज्यावरून समजले होते की हा स्मार्टफोन स्लाइड आउट कॅमेर्‍या सह लॉन्च होईल. आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मी मिक्स 3 च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल ज्या सोबत फ्लॅश लाईट असेल.

शाओमी मी मिक्स 3 च्या बॅक पॅनल वर कोणताही फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला नाही. त्यामुळे अंदाज लावला जात आहे की या फोन मध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. या आधी कंपनी शाओमी मी 8 चे एक वर्जन सादर केले आहे ज्यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. मी मिक्स 3 डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. तसेच स्लाईडर वर ईयरपीस आणि सेल्फी फ्लॅश आहे.

शाओमी मी मिक्स 3 10जीबी रॅम सोबत 8जीबी रॅम आणि 6जीबी रॅम सह सादर केला जाईल ज्यात 256जीबी आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. तसेच प्रोसेसिंग साठी यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट असेल. लीक नुसार मी मिक्स 3 मध्ये 2के रेज्ल्यूशन वाला एमोलेड डिस्प्ले मिळेल. येत्या 25 ऑक्टोबरला शाओमी बीजिंग मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट च्या मंचावरून शाओमी मी मिक्स 3 आॅफिशियली लॉन्च केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here