पुन्हा सुरु होत आहे शाओमी ‘मी फेस्टिवल’, 1 रुपायात मिळेल रेडमी नोट 7 प्रो आणि मी एलईडी टीवी

भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड बनली आहे शाओमी. शाओमीची फॅन फॉलोइंग इंडियन स्मार्टफोन यूजर्स मध्ये जितकी आहे तितकी क्वचितच एखाद्या ब्रँडची असेल. शाओमीचा जवळपास प्रत्येक प्रोडक्ट देसाहत रेकॉर्ड विक्री करतो, मग स्मार्टफोन असो ​स्मार्टटीवी असो किंवा स्मार्ट बँड. शाओमी पण आपल्या फॅन्सची खास काळजी घेते. आणि त्यासाठीच कंपनी दरवर्षी ‘मी फेस्टिवल’ चे आयोजन करते. आपल्या फॅन्ससाठी पुन्हा एकदा आकर्षक ऑफर्स आणि शानदार डील्स घेऊन येत शाओमी ने ‘मी फेस्टिवल’ ची सुरवात केली आहे. या मेगा सेल अंतर्गत फक्त शाओमी प्रोडक्ट स्वस्तात आणि भरपूर डिस्काउंट वर मिळत नाहीत तर सोबत लकी शाओमी फॅन्सना शाओमी डिवाईस 1 रुपयात मिळवण्याची संधी पण मिळेल.

‘शाओमी मी फेस्टिवल’
शाओमी ने आज ‘मी फेस्टिवल’ च्या आयोजनाची अधिकृत घोषणा केली आहे. प्रेस रिलीज पाठवून शाओमी ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 4 एप्रिलला ‘मी फेस्टिवल’ सुरु होईल. शाओमी मी फेस्टिवल तीन दिवसांसाठी आयोजित होईल जो 6 एप्रिल पर्यंत चालेल. शाओमी मी फेस्टिवलचे आयोजन मी डॉट काम वर केले जाईल, सोबत शाओमी प्रोडक्ट्स आर्कषक ऑफर व डिस्काउंट वर मी होम, मी स्टोर्स व आफलाईन स्टोर्स वरून पण विकत घेता येतील. चला एक नजर टाकू मी फेस्टिवल मध्ये मिळणाऱ्या स्वस्त प्रोडक्ट्स वर.

1 रुपयात फ्लॅश सेल
शाओमी मी फेस्टिवल मध्ये ‘1 रुपया फ्लॅश सेल’ चे आयोजन पण केले जाईल. तिन्ही दिवशी म्हणजे 4, 5 आणि एप्रिलला दुपारी दोन वाजता हा अनोखा सेल सुरु होईल. 1 रुपये फ्लॅश सेल मध्ये शाओमीचे वेगवेगळे प्रोडक्ट्स जसे कि रेडमी नोट 7 प्रो, पोको एफ1, मी साउंडबार, मी एलईडी टीवी 4ए प्रो (32) सारखे अनेक स्मार्टफोन व गॅजेट्स फक्त 1 रुपयात मिळवण्याची संधी मिळेल. तसेच सेल मध्ये ‘मिस्ट्री बॉक्स’ पण विकले जातील. या बॉक्स मध्ये 2400 रुपयांपर्यंतचे सामान असेल पण 99 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा मिस्ट्री बॉक्स सेल रोज 4 वाजता सुरु होईल.

हे देखील वाचा: शाओमी घेऊन येत आहे अनोखा फोन, बॉटमला असतील दोन सेल्फी कॅमेरे

इतका मिळेल डिस्काउंट
शाओमी ने सांगितले आहे कि मी फेस्टिवल मध्ये पोको एफ1 चा 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरिएंट 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच रेडमी नोट 5 प्रो चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 10,999 रुपये आणि 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. शाओमी नुसार मी फेस्टिवल मध्ये रेडमी नोट 6 प्रो वर 5,000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल आणि फोनचा 4जीबी रॅम वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. मी फेस्टिवल मध्ये शाओमीचा मी एलईडी टीवी 4 प्रो चा 55इंच मॉडेल 45,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

बँक ऑफर्स
शाओमी मी फेस्टिवल मध्ये कंपनी द्वारा दिल्या जाणाऱ्या ऑफर्स आणि डिस्काउंट व्यतिरिक्त वेगवेगळ्या बँकेच्या कार्ड वरून शॉपिंग केल्यास पण लोकांचा फायदा होईल. मी फेस्टिवल मध्ये एचडीएफसी बँक कार्ड वरून शॉपिंग केल्यास 5 टक्क्यांची ​अतिरिक्त सूट मिळेल. तसेच मी एलईडी टीवी, मी साउंड बार आणि शाओमी स्मार्टफोन्स ईएमआई वर पण विकत घेता येतील.

हे देखील वाचा: खुशखबर : 4जीबी रॅम असलेला रियलमी यू1 झाला 1500 रुपयांनी स्वस्त, किंमत फक्त 9,999 रुपयांपासून सुरु

त्याचबरोबर मोबि​क्विकने पेमेंट केल्यास 15 टक्क्यांचा फ्लॅट डिस्काउंट मिळेल​ ज्यात 2000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक पण मिळेल. शाओमी मी फेस्टिवल मध्ये मी पे ने पेमेंट करणाऱ्या शाओमी यूजर्सना मी टीवी आणि रेडमी नोट 7 फ्री मध्ये मिळवण्याची संधी पण मिळेल.
शाओमी मी फेस्टिवल मध्ये सहभागी होण्यासाठी (इथे क्लिक करा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here