आयफोनलाही टक्कर देईल असा Xiaomi चा सर्वात शक्तिशाली फोन; उच्च दर्जाच्या प्रोसेसर आणि कॅमेरा

दरवर्षी वर्षाच्या अखेरीस अँड्रॉइड प्रोसेसर बनवणारी कंपनी आपला नवा सर्वात शक्तिशाली फ्लॅगशिप प्रोसेसर सादर करते. यंदाही Qualcomm नं आपला नवीन प्रोसेसर Snapdragon 8 Gen 2 सादर केला आहे आणि आता या चिपसह येणाऱ्या फोनची चर्चा होऊ लागली आहे. आता एका चिनी वेबसाइटनं Xiaomi 13 चा एक पोस्टर लीक केला आहे, त्यानुसार कंपनी हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen2 प्रोसेसरसह सादर करणार आहे. डिजिटल चॅट स्टेशननं लीक केलेल्या बातमीनुसार शक्तिशाली प्रोसेसरसह यात 2K रिजोल्यूशन, 120 वॉट चार्जिंग आणि सोनी सेन्सरसह ओआयएस सपोर्ट मिळेल.

Xiaomi 13 चे स्पेसिफिकेशन

Xiaomi 13 चे स्पेसिफिकेशन पाहता हा शाओमीचा फ्लॅगशिप फोन असल्यामुळे कंपनी यात अत्यंत शक्तिशाली हार्डवेयर देणार आहे. या फोनच्या लाँच डेटची माहिती मिळाली नाही परंतु हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 सह लाँच होणारआ पहिला फोन असेल, अशी चर्चा आहे. हा फोन 12GB रॅमसह बाजारात येऊ शकतो आणि जोडीला 256GB स्टोरेज मिळू शकते.

फोन मीयुआय 13 वर सादर केला जाऊ शकतो जो अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम 13 आधारित असेल. चांगल्या प्रोसेसरसह याचा 2के डिस्प्ले तुम्हाला इम्प्रेस करेल. फोनमध्ये 6.2 इंचाची स्क्रीन सेंटर नॉचसह मिळू शकते. तसेच तुम्हाला 120 हर्ट्ज स्क्रीन रिफ्रेश रेट मिळेल. हे देखील वाचा: तुमचं स्वतःचं YouTube चॅनेल कसं बनवायचं, जाणून घ्या सोपी पद्धत

यात तुम्हाला हाय रिजोल्यूशन असलेला सोनी सेन्सर मिळेल. फोनमध्ये सोनीचा IMX989 sensor मिळेल असं सांगण्यात आलं होतं परंतु आता Sony IMX8 सीरीजचा सेन्सर असल्याचं समजतं आहे. विशेष म्हणजे मेन सेन्सरमध्ये यावेळी ओआयएस सपोर्ट दिला जाऊ शकतो. त्यामुळे फक्त नाइट फोटोग्राफी चांगली होणार नाही तर स्टॅबिलायजेशन सुधारेल.

Xiaomi 13 ची लाँच डेट

शाओमी 13 च्या लाँच डेट बद्दल कंपनीनं आतापर्यंत कोणतीही माहिती दिली नाही परंतु बोलले जात आहे की हा फोन या महिन्याच्या अखेरीस चीनमध्ये लाँच होऊ शकतो. तर डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीमध्ये भारतात एंट्री होईल. हे देखील वाचा: एकाच चार्जरनं चार्ज होणार मोबाइल फोन, टॅबलेट आणि लॅपटॉपही! भारतात नवा नियम लागू होणार

Qualcomm Snapdragon 8 Gen 2 आधारित फोन

Qualcomm च्या या नवीन प्रोसेसरसह Xiaomi 13 सोबतच iQoo 11 सीरीजचे फोन, Vivo X90 सीरीज, Samsung Galaxy S23 सीरीज आणि Oneplus 11 मॉडेल लाँच होण्याची शक्यता आहे. तसेच मोटोरोला एज 40 आणि ओप्पो फाइंड एक्स सीरीजच्या फोन्समध्ये देखील हा दमदार प्रोसेसर दिला जाईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here