वजनाने हलका, फीचर्सनी शक्तिशाली! पूर्ण झाली Xiaomi 12 Lite च्या लाँचची तयारी

Xiaomi नं गेल्यावर्षी एक हलका फुलका 5G स्मार्टफोन Xiaomi 11 Lite NE 5G नावानं भारतात लाँच केला होता. या स्मार्टफोनची आकर्षक डिजाईन ग्राहकांना आवडली होती. आता या हँडसेटचा अपग्रेडेड व्हर्जन जागतिक बाजारात येत आहे. एप्रिल महिन्यात टेक मंचावर आलेल्या ‘शाओमी 12 सीरीज’ मध्ये लवकरच Xiaomi 12 Lite 5G चा समावेश केला जाऊ शकतो. आतापर्यंत या सीरिजमध्ये Xiaomi 12, Xiaomi 12 Pro आणि Xiaomi 12X लाँच झाले आहेत. यातील शाओमी 12 प्रो स्मार्टफोन भारतात 66,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Xiaomi 12 Lite लवकरच होणार लाँच

शाओमी 12 लाईटची माहिती कोणत्याही लीक किंवा रिपोर्टमधून समोर आली नाही. स्वतः शाओमीनं ग्लोबल वेबसाईटच्या माध्यमातून हा फोन समोर ठेवला आहे. Xiaomi 12 Lite स्मार्टफोन कंपनीनं ऑफिशियली टीज केला आहे आणि कंपनीनं फोनचं प्रोडक्ट पेज शेयर करत शाओमी 12 लाईटच्या लुक व डिजाईनची झलक दाखवली आहे. हे देखील वाचा: सर्वात बेस्ट कॅमेरा असूनही चाहते नाराज; शक्तिशाली प्रोसेसर, फास्ट चार्जिंगसह Xiaomi 12S सीरीज लाँच

आगामी Xiaomi 12 Lite स्मार्टफोन Xiaomi 12 series चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. हा फोन Green, Pink आणि White कलरमध्ये लाँच होऊ शकतो. कंपनीनं या फोनच्या स्पेसिफिकेशन्स कोणतीही माहिती दिली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्समधून Xiaomi 12 Lite च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. ज्यांची माहिती आम्ही पुढे दिली आहे.

Xiaomi 12 Lite चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 12 Lite सीरिजमधील अन्य हँडसेटप्रमाणे फ्लॅगशिप प्रोसेसरसह बाजारात येणार नाही. लीक्स नुसार हा मोबाईल फोन 6.55 इंचाच्या डिस्प्लेसह बाजारत येऊ शकतो, ज्याचे रिजोल्यूशन फुलएचडी+ असू शकते. कंपनी या हँडसेटमध्ये ओएलईडी पॅनलचा वापर करू शकते. तसेच स्मूद डिस्प्ले देण्यासाठी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट देखील मिळू शकतो. हे देखील वाचा: वनप्लसला झटका देण्याची तयारी पूर्ण; 64MP कॅमेरा असलेल्या Redmi 50i 5G च्या लाँचची तारीख समजली

वर सांगतिल्याप्रमाणे Xiaomi 12 Lite 5G फोनमध्ये हायएंड चिपसेट मिळणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार जुन्या Xiaomi 11 Lite NE प्रमाणे या फोनमध्ये देखील Qualcomm चा Snapdragon 778G चिपसेट मिळू शकतो. लीकनुसार हा स्मार्टफोन 8GB RAM आणि 256GB storage ला सपोर्ट करेल. तसेच फोनमध्ये Android 12 आधारित MIUI 13 मिळेल.

Xiaomi 12 Lite मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या सेटअपमध्ये 108MP चा मुख्य कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा-वाईड-अँगल कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा दिला जाऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी शाओमी 12 लाईटमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 4,300mAh मिळेल, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here