तुमच्या व्हाट्सॅप वर येत आहेत का तिन ब्लू टिक ? जाणून घ्या तिन टिक आणि रेड टिक मागील सत्य

व्हाट्सॅप भारतात सर्वात जास्त वापरला जाणारा मेसेजिंग अॅप बनला आहे. फक्त तरुणच नाहीत तर शाळेत जाणार्‍या मुलांपासून गृहिणींपर्यंत सर्वच व्हाट्सॅप वापरत आहेत. नातेवाईकांशी व मित्रांशी कनेक्टड राहण्यासाठी लोक व्हाट्सॅप ग्रुप्स चा वापर करत आहेत. व्हाट्सॅप चे हेच ग्रुप्स सध्या अनेक प्रकारचे मीडिया कन्टेंट पण शेयर करतात, यात पोर्नोग्राफी, मिसलिडिंग वीडियोज व फोटोज इत्यादीचा समावेश असतो. मागील काही दिवसांपासून बातमी येत आहे की व्हाट्सॅप वर आता तिन टिक यायला सुरवात होईल आणि यातील तिसर्‍या टिक चा अर्थ तुमचा मेसेज सरकार ने पण वाचला आहे.

तुम्हाला पण असा मेसेज आला आहे का किंवा तुम्ही कुठे अशी बातमी वाचली वा ऐकली आहे का? सर्वात आधी तुम्हाला सांगतो नेमके हे प्रकरण काय आहे. या तिन टिक कशासाठी असतिल आणि व्हाट्सॅप मध्ये यांचा कसा वापर होईल.

सिंगल टिक
जेव्हा तुम्ही कोणालाही मेसेज पाठवता तेव्हा तुम्हाला सर्वात आधी सिंगल टिक येते. सिंगल टिक म्हणजे तुमच्याकडून मेसेज पाठवला गेला.

डबल टिक
पाठवलेल्या मेसेज वर सिंगल टिक नंतर डबल टिक आल्यास त्याचा अर्थ असा की तुम्ही पाठवलेला मेसेज दुसर्‍या व्यक्तीच्या मोबाईल वर पोचला आहे.

दोन ब्लू टिक
डबल टिक ब्लू म्हणजे निळ्या झाल्यास याचा अर्थ असा की ज्याला तुम्ही मेसेज पाठवला आहे त्यांनी तो वाचला आहे. आणि हो ब्लू टिक नंतर तुम्हाला रिप्लाई मिळाला नाही तर समजून जा समोरची व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत आहे.

तिन टिक
इथे प्रकरण थोडा गंभीर होत. बोलेल जात आहे की जर तुम्ही पाठवलेल्या मेसेज वर तिन टिक आल्यास असे समजावे की तुमचा मेसेज फक्त तुमच्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर आपल्या सरकार कडे पण पोचला आहे आणि या तिन्ही टिक निळ्या झाल्यास समजावे की पाठवलेला मेसेज सरकारने पण वाचला आहे.

दोन ब्लू आणि एक रेड टिक
तुम्ही पाठवलेल्या मेसेज वर दोन ब्लू टिक आल्या सोबत एक टिक रेड म्हणजे लाल झाली तर समजा धोक्याची घंटा वाजली. अशी बातमी पसरली आहे की तीसरी टिक रेड झाली म्हणजे सरकारला तुमचा मेसेज आक्षेपार्ह वाटला आहे. सरकारला तुमचा मेसेज समाजासाठी घातक वाटतो आहे तसेच शिक्षा म्हणून तुम्हाला पोलिस अटक करतील.

व्हाट्सॅप वर तुम्हाला पण ही बातमी मिळाली असेल आणि कदाचित तुम्ही पण समाजसेवेच्या नावाखाली हा मेसेज 4-5 लोकांना पाठवला असेल. तुम्ही याबद्दल जास्त सीरियस होण्याआधी तुम्हाला सांगतो की तिन टिक वाला हा मेसेज आणि याबद्दल ची बातमी पूर्णपणे खोटी आहे.

व्हाट्सॅप ने असा कोणताही फीचर अपडेट केला नाही तसेच सरकार ने पण असा कोणताही नवीन नियम आणला नाही. व्हाट्सॅप वर कोणत्याही मेसेज वर तिन टिक येणार नाहीत आणि सरकार तुमच्या खाजगी मेसेज आशा प्रकारे एक्सेस पण करणार नाही.

तिन टिक वाली ही बातमी खोटी असल्याचे समजल्यानंतर भरपूर लोकांना दिलासा मिळाला असेल. पण 91मोबाईल्स आवाहन करत आहे की देशातील कोणत्याही नागरिकाने टेक्नॉलजी आणि इंटरनेट च्या माध्यमातून कोणताही असा मेसेज किंवा मीडिया कंटेंट शेयर करू नये जो सामाजिक दृष्ट्या चुकीचा असेल आणि कोणत्याही व्यक्तीच्या भावनांना धक्का देईल. सोशल मीडिया प्लॅटफार्म चा वापर ज्ञान मिळण्यासाठी केला जावा खोट्या अफवा पसरवण्यासाठी नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here