मोबाईल फोन मधील 16:9, 18:9 आणि 19:9 स्क्रीन आस्पेक्ट रेशियो म्हणजे का आणि त्याचे फायदे

तुम्हाला आठवतो एक तुमचा पहिला फोन! ज्यात 1.8-इंचाची मोनोक्रोम स्क्रीन असायची आणि तुम्ही त्यातून फक्त कॉलिंग आणि मेसेजिंग करू शकत होता. परंतु आज हातात मोठा मोबाईल आहे ज्यात 6-इंचाची स्क्रीन किंवा त्यापेक्षा पण मोठी स्क्रीन आहे. त्याचबरोबर आज या स्क्रीन बद्दल अनेकप्रकारच्या नवीन टेक्नोलॉजी विषयी पण बोलले जाते. अलीकडेच मोबाईल डिस्प्ले मध्ये स्क्रीन आस्पेक्ट रेशियो बद्दल खूप चर्चा होत आहे. काही फोन 16:9 आस्पेक्ट रेशियो बद्दल बोलतात तर काही 18:9 रेशियो सह येतात. सध्या जास्तीत जास्त फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो सह येतात. अलीकडेच मोबाईल स्क्रीन साठी 21:9 आस्पेक्ट रेशियो ची पण चर्चा खूप होत आहे. त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल कि हा आस्पेक्ट रेशियो म्हणजे काय आणि यामुळे डिस्प्ले मध्ये काय बदल होतो? चला तर मग आज स्क्रीनच्या या टेक्ननोलॉजी बद्दल सविस्तर चर्चा करूया.

आस्पेक्ट रेशियो म्हणजे काय

सर्वात आधी तुमच्या डोक्यात हाच प्रश्न आला असेल कि हा आस्पेक्ट रेशियो म्हणजे काय? तर त्याचे उत्तर असे कि आस्पेक्ट रेशियो एखाद्या स्क्रीनची रुंदी आणि उंचीचे गुणोत्तर दर्शवतो. हे प्रामुख्याने W:H च्या स्वरूपात दिले जाते. ज्यात W म्हणजे विड्थ अर्थात रुंदी आणि H हाइट आर्थात उंची चे गुणोत्तर दर्शवते. जर एखाद्या फोनचा स्क्रीन आस्पेक्ट रेशियो 16:9 असेल तर त्याचा अर्थ असा कि फोनची रुंदी 16 सामान भाग आहे तर उंची 9 सामान भाग आहे. स्क्रीनला या गुणोत्तरात विभागण्यासाठी जे हॉरिजेंटल अर्थात क्षितिज बनते त्याला लेटर बॉक्सेस म्हटले जाते.

कसा बदलला स्क्रीन आस्पेक्ट रेशियो

मोबाईल व्यतिरिक्त टीवी सहित इतर स्क्रीन पण अशाच आस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतात. मोबाईलच्या आधी टीवी आणि कंप्युटर घरात आले होते आणि आस्पेक्ट रेशियोचा उल्लेख तेव्हाच सुरु झाला होता. सुरवातीला मॉनिटर आणि टीवी साठी 4:3 आस्पेक्ट रेशियो वापरला जायचा. 2003 पर्यंत भारतासहित जगभरात लॉन्च होणाऱ्या अनेक कंप्युटर मॉनिटर आणि टीवी स्क्रीन साठी 4:3 आस्पेक्ट रेशियो वाल्या स्क्रीनचा वापर केला जात होता. तसेच काही मॉनिटर 5:4 आस्पेक्ट रेशियो वाले पण असायचे. परंतु 2003 नंतर हा ट्रेंड वेगाने बदललाआणि 2006 पर्यंत कंप्युटर मॉनिटर मध्ये 16:10 आस्पेक्ट रेशियो वाल्या मॉनिटरची मागणी खूप वाढली. 16:10 असपेक्ट रेशियो वाल्या डिस्प्लेची सुरुवात सर्वात आधी लॅपटॉप मध्ये झाली त्यानंतर इतर डिस्प्ले मध्ये हा येऊ लागला. याचा काळात 16:9 आणि 16:10 आस्पेक्ट रेशियो वापरले जायचे.

नवीन आस्पेक्ट रेशियोची मागणी वाढणायचे मुख्य कारण होते वाइड स्क्रीन असलेले डिस्प्ले. अर्थात आधी चौकोनी डिस्प्ले होते ज्यांचा अनुभव यापेक्षा वेगळा होता. नवीन आस्पेक्ट रेशियो वर गेम खेळणे आणि ऍप्स वापरणे चांगले वाटत होते. 2008 पर्यंत 16:10 आणि 16:9 आस्पेक्ट रेशियो वाले स्क्रीन मॉनिटर साठी स्टॅंडर्ड बनला. 2011-2012 पर्यंत 4:3 आस्पेक्ट रेशियो वाल्या मॉनिटरची निर्मिती जवळपास बंद झाली.

टीवी बद्दल बोलायचे तर 2010 च्या आधी जास्तीत जास्त कंपन्या 4:3 आस्पेक्ट रेशियो वाल्या स्क्रीन वापरत होत्या पण त्यानंतर 16:9 असपेक्ट रेशियो तर जवळपास स्टॅंडर्ड बनला. नवीन एचडी आणि एफएचडी टीवी साठी इसी आस्पेक्ट रेशियोचा जास्त वापर केला जात आहे. टीवी मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो खूप कमी दिसतो. सध्या 21:9 आस्पेक्ट रेशियो असलेले टीवी पण येऊ लागले आहेत.

पण सध्या आस्पेक्ट रेशियोचा उल्लेख सर्वात जास्त मोबइल बद्दल होतो. त्यामुळे मोबाईल बद्दल बोलयला हवे. 2010 पर्यंत मोबाईल फोन साठी जास्तीत जास्त 3.2 आणि 5:3 आस्पेक्ट रेशियो असलेल्या स्क्रीनचा वापर केला जात होता. परंतु स्मार्टफोन आल्यानंतर हे सर्व बदलले. 2010 नंतर 16:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या स्क्रीन चट्रेंड मध्ये आल्या ज्यात यूजर्स वाइड स्क्रीनचा वापर फोन मध्ये करू लागले.

2016 पर्यंत 16:9 आस्पेक्ट असलेले स्क्रीन रेशियो वाले स्मार्टफोन येत होते. पंरतु 2017 मध्ये सॅमसंग ने 18:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या स्क्रीनची सुरुवात केली ज्याला कंपनीने इनफिनिटी डिस्प्लेचे नाव दिले. या स्क्रीन सह फोन मध्ये बेजल आणि पण कमी झाले आणि छोट्या डिवाइस मध्ये लोकांना वाइड स्क्रीन मिळू लागली.

त्यानंतर नॉच स्क्रीन वाल्या फोन मध्ये 19:9, वाटरड्रॉप नॉच, पंच होल डिस्प्ले आणि पॉपआॅप कॅमेरा वाल्या फोन मध्ये 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वली स्क्रीन आली आहे. सोबतच यावर्षीच्या सुरवातीला सोनी आणि नंतर मोटोरोला ने आपले फोन लॉन्च केले आहेत ज्यात 21:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या स्क्रीनचा वापर स्मार्टफोन मध्ये केला गेला आहे. हा मोबाईल साठी सर्वात नवीन आस्पेक्ट रेशियो आहे.

आस्पेक्ट रेशियो मुळे काय फरक पडतो

आता पर्यंत तर तुम्हाला समजले असेल कि आस्पेक्ट रेशियो म्हणजे काय आणि कोणत्या आस्पेक्ट रेशियोचा वापर मोबाईल फोन, टीवी आणि कंप्यूटर साठी केला जात आहे. परंतु याने काय फरक पडतो हा प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल. चला त्या विषयी बोलू.

मोबाईल गेम किंवा ऍप्लिकेशन मध्ये आस्पेक्ट रेशियोचा फरक तुम्हाला जास्त दिसणार नाही. कारण ते असे तयार केले जातात कि ते स्क्रीन आस्पेक्ट रेशियो आणि रेजल्यूशन नुसार अडजस्ट होतात. परंतु पिक्चर बघताना तुम्हाला आस्पेक्ट रेशियोची जाणीव होईल.

कोणताही पिक्चर 21:9 आस्पेक्ट रेशियो सह रेकॉर्ड केला जातो. त्यामुळे जेव्हा दुसऱ्या आस्पेक्ट रेशियो वाल्या स्क्रीन वर जेव्हा तुम्ही पिक्चर बघता तेव्हा त्यात बाजूला ब्लॅक सपॉट दिसले. याला पिलर बॉक्सेज म्हणतात. जर 4:3 आस्पेक्ट रेशियो वाल्या स्क्रीन वर तुम्ही एखादा वीडियो बघत असाल तर तुम्हाला स्क्रीनच्या दोन्ही बाजूला काळी पट्टी दिसते. तसेच 16:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या स्क्रीन वर पण मूवी बघताना डावीकडे आणि उजवीकडे काळी पट्टी दिसेल. पण काही स्क्रीन याला स्ट्रेच करून एडजस्ट करता पण त्यामुळे पिक्चरचा मूळ आकार राहत नाही उलट 21:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या स्क्रीन वर तुम्ही संपूर्ण स्क्रीन वर वास्तविक शेप सह पिक्चर बघू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here