8GB रॅम व मोठी बॅटरी असलेल्या Vivo S1 Pro आणि Y50 ची किंमत झाली अजून कमी, जाणून घ्या नवीन किंमत

Vivo ने आपल्या दोन शानदार फोन्सच्या किंमती कमी करून ग्राहकांना भेट दिली आहे. कंपनीने Vivo S1 Pro आणि Vivo Y50 च्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता ग्राहक हे दोन्ही हँडसेट कमी किंमतीत विकत घेऊ शकतील. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी Vivo ने जीएसटी च्या दरात बदल झाल्यामुळे आपल्या अनेक फोन्सच्या किंमती बदलल्या होत्या. 91मोबाईल्सला एक्सक्लूसिवली ऑफलाइन स्टोर्स कडून या दोन्ही फोन्सच्या नवीन किंमतींची माहिती मिळाली आहे.

नवीन किंमत

Vivo Y50 बद्दल बोलायचे तर कंपनीने याच्या एकमेव 8जीबी रॅम+128जीबी वेरिएंटच्या किंमतीत कपात केली आहे. कपातीनंतर फोन 16,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. याआधी फोनची किंमत 17,990 रुपये होती. Vivo S1 Pro प्राइस कटच्या आधी 19,990 रुपयांमध्ये विकला जात होता, पण आता किंमत कमी झाल्यानंतर हा फोन को 18,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ऑफलाइन व्यतिरीक्त कंपनीच्या साइट वर पण दोन्ही फोन्स कमी किंमत विकले जात आहेत.

Vivo S1 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Vivo S1 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता स्मार्टफोन मध्ये 6.38 इंचाचा फुल-एचडी+ (2340×1080 पिक्सल) सुपर एमोलेड फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19.5.9 आहे. तसेच स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर सह 8 जीबी रॅम आहे आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. कॅमेरा सेटअप पाहता Vivo S1 Pro मध्ये डायमंड आकाराचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, एफ/ 1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर आहे. सोबत 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड एंगल सेंसर देण्यात आला आहे आणि 2 मेगापिक्सलचे दोन सेंसर आहेत, एक डेप्थ सेंसिंग आणि एक मॅक्रो फोटोग्राफी साठी . तसेच फ्रंट कॅमेरा एफ/ 2.0 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सल सह येतो.

हे देखील वाचा: 5000mAh बॅटरी असलेले Vivo Y20 आणि Y20i भारतात झाले लॉन्च, किंमत : 11,490 रुपयांपासून सुरु

डिवाइसची स्टोरेज ग्राहक माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवू शकतात. तसेच फोन मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन साठी 4जी एलटीई, डुअल-बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ वर्जन 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एफएम रेडियो आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. सिक्योरिटी साठी फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. वीवो एस1 प्रो Android 9 Pie वर आधारित फनटच ओएस 9.2 वर चालतो. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Vivo Y50 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y50 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.53-इंचाची अल्ट्रा ओ स्क्रीन आणि फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रेजोल्यूशन 1080 x 2340 पिक्सल आहे. फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर असेल. फोन मध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Exclusive : Vivo V20 सीरीज दसऱ्याच्या निमित्ताने होईल भारतात लॉन्च, असे असतील स्पेसिफिकेशन्स

तसेच फटोग्राफीसाठी फोन मध्ये रियर वर 13-मेगापिक्सल प्राइमरी शूटर, 8-मेगापिक्सल वाइड-अँगल शूटर 120 डिग्री फिल्ड-ऑफ-व्यू, 2-मेगापिक्सल पोर्टेट लेंस आणि 2-मेगापिक्सल मॅक्रो सेंसर फोकल लेंथ सह येतो. तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे.

वीवो एस1 प्रो वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here