स्वस्त स्मार्टफोन Vivo Y28s 5G ची होत आहे तयारी, लवकर होऊ शकतो मार्केटमध्ये लाँच

विवोबाबत बातमी समोर येत आहे की कंपनी आपल्या ‘वाय’ च्या एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे, ज्याला Vivo Y28s 5G नावाने मार्केटमध्ये आणले जाईल. हा एक लो बजेट मोबाईल फोन असेल जो Vivo Y28 चा नेक्स्ट व्हर्जन असेल. समोर आलेली ​फोनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Vivo Y28s 5G

विवो वाय 28 एस 5 जी फोनची बातमी टेक वेबसाईट गिजमोचायनाने शेअर केली आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की हा अगामी विवो फोन CQC सर्टिफिकेशन तसेच डेटाबेसमध्ये समोर आला आहे जिथे याला V2346 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आले आहे. या लिस्टिंग्समध्ये फोनच्या स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली नाही, परंतु दावा जरूर करण्यात आला आहे की हा फोन टेक मार्केटमध्ये Vivo Y28s 5G नावाने एंट्री घेईल. तसेच फोनमध्ये 15W चार्जिंग दिली जाणार असल्याची गोष्ट समोर आली आहे.

Vivo Y28 5G किंमत आणि स्पेसिफिकेशन

किंमत

हा विवो फोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. याच्या 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असणारा बेस व्हेरिएंट 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फोनचे 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मॉडेल 15,499 रुपये तसेच सर्वात मोठा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 16,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. फोनला Crystal Purple आणि Glitter Aqua कलर विकत घेता येईल.

स्पेसिफिकेशन

  • 6.56″ 90 हर्ट्झ डिस्प्ले
  • 8 जीबी अ‍ॅक्टेंडेड रॅम
  • मीडियाटेक डायमेंसिटी 6020
  • 50 एमपी ड्युअल रिअर कॅमेरा
  • 15 वॉट 5,000 एमएएच बॅटरी

स्क्रीन : विवो वाय 28 5 जी फोन 1612 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी + वॉटरड्रॉप डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही एलसीडी स्क्रीन आहे जी 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते तसेच 840 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करते.

प्रोसेसिंग : हा मोबाईल अँड्रॉईड 13 वर लाँच झाला आहे जो फनटच ओएस 13 सह मिळून काम ​करतो. प्रोसेसिंगसाठी यात 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डायमेंसिटी 6020 ऑक्टाकोर प्रोसेसर आहे जो 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. Vivo Y28 5G फोन 8 जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह आहे. ही वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी फोनला 8 जीबी फिजिकल रॅमसह मिळून याला 16 जीबी पर्यंत वाढवते.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी विवो वाय 28 5 जी फोन ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असणाऱ्या 2 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स सह मिळून चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी Vivo Y28 5G फोनमध्ये 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी हा मोबाईल 15 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.

इतर: हा विवो 5 जी फोन 7 5G Bands ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी यात साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर तसेच फेस अनलॉक फिचर मिळते. वाय 28 5 जी फोन IP54 रेटेड आहे जो याला पाणी व धूळीपासून सुरक्षित ठेवतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here