5000mAh बॅटरी असलेले Vivo Y20 आणि Y20i भारतात झाले लॉन्च, किंमत : 11,490 रुपयांपासून सुरु

Vivo ने आज गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या Y19 चा अपग्रेडेड वर्जन वीवो वाय20 भारतात लॉन्च केला आहे. विवो वाय20 सोबत कंपनीने वीवो वाय20आय पण सादर केला आहे. या सीरीजच्या लॉन्चची माहिती काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्सने दिली होती. आज अधिकृतपणे Vivo Y20 लॉन्च केला गेला आहे. दोन्ही फोन्सचे स्पेसिफिकेशन्स जवळपास एकसारखे आहेत. पण किंमतच्या बाबतीत दोन्ही डिवाइस मध्ये थोडा फरक आहे.

डिजाइन

डिजाइन बद्दल बोलायचे तर Vivo Y20 आणि Y20i दोन्ही फोन लुकच्या बाबतीत एकसारखे आहेत. दोन्ही हँडसेट मध्ये वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. नॉच असल्यामुळे फोनच्या उजवीकडे आणि डावीकडे खूप कमी बेजल्स आहेत. तर बॉटमला थोडे जाड बेजल्स आहेत. डिवाइसच्या मागे वर्टिकल शेप कॅमेरा मॉड्यूल आहे. या सेटअप मध्ये ट्रिपल कॅमेरा आणि एक एलईडी सेंसर आहे. सोबत मागे बॉटमला वीवो ची ब्रँडिंग आहे. तसेच डिवाइसच्या बॉटमला 3.5एमएम हेडफोन जॅक आणि स्पीकर ग्रिल आहे.

Vivo Y20 आणि Y20i चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y20 आणि Y20i चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात रॅम व्यतिरिक्त सर्व फीचर्स एक सारखे आहेत. दोन्ही डिवाइस मध्ये आयपीएस 6.51-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे पिक्सल रिजोल्यूशन 720X1600 (HD+) आहे. तसेच फोन्स मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 460 प्रोसेसर आहे. Vivo Y20 मध्ये 4GB रॅम आणि Y20i मध्ये 3GB रॅम सह 64GB ची स्टोरेज आहे.

फोटोग्राफी पाहता Vivo Y20/Y20i मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. ट्रिपल कॅमेरा सेटअप मध्ये अपर्चर f/2.2 सह 13 मेगापिक्सल + अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सल + अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच वीडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये अपर्चर f/1.8 सह 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. दोन्ही फोन्स एंडरॉयड 10 वर चालतात आणि यात पावरसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Vivo Y20 मध्ये 18वॉट फ्लॅशचार्जचा ऑप्शन आहे. दोन्ही फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत.

किंमत

किंमतीबाबत बोलायचे तर Vivo Y20 12,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे, ज्याची विक्री 28 ऑगस्ट पासून वीवो ई स्टोर आणि रिटेल स्टोर वर केली जाईल. फोन Obsidian Black आणि Dawn White कलर ऑप्शन मध्ये येतो. Vivo Y20i 11,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. या डिवाइसची विक्री 3 सप्टेंबर पासून केली जाईल. हा डिवाइस Dawn White/ Nebule Blue कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here