क्वॉड कॅमेरा सेटअपसह Vivo X90 Pro+ ची चीनमध्ये एंट्री; पाहा स्पेसिफिकेशन्स

विवो कंपनीनं काल टेक मंचावर आपली बहुप्रतीक्षित स्मार्टफोन सीरीज Vivo X90 Series लाँच केली आहे. या सीरीज अंतगर्त तीन नवीन विवो मोबाइल फोन लाँच झाले आहेत जे Vivo X90, Vivo X90 Pro आणि Vivo X90 Pro+ नावाने बाजारात आले आहेत. हे सर्व 5G Vivo Phone आहेत जे अ‍ॅडव्हान्स फीचर्स व शक्तिशाली स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतात. विवो एक्स90 प्रो प्लस स्मार्टफोन Vivo X90 Series चा सर्वात मोठा मॉडेल आहे जो 12GB RAM, Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट, 50MP+50MP+48MP+64MP क्वॉड रियर कॅमेरा तथा 32MP सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पुढे Vivo X90 Pro+ Price आणि Specifications ची माहिती देण्यात आली आहे.

Vivo X90 Pro Plus Specifications

Vivo X90 Pro+ Display

50 mp camera 12 gb ram smartphone vivo x90 pro launched with Dimensity 9200 check specifications and price

विवो एक्स90 प्रो प्लस स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे जो 3200 × 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या क्वॉड एचडी+ ई6 अ‍ॅमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही एलटीपीओ स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1200हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. या फोन स्क्रीन मध्ये 1800निट्स ब्राइटनेस, 8000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो, 1440हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग, 1.07 बिलियन कलर आणि एमईएमसी सारख्या फीचर्सना सपोर्ट करते. हे देखील वाचा: 5 हजारांनी स्वस्त झाले Samsung Smartphones, कंपनीनं गॅलेक्सी ‘एम’ सीरीज किंमती केल्या कमी!

Vivo X90 Pro+ Processor

विवो एक्स90 प्रो प्लस अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे जो ओरिजन ओएस 3 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 3.20गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 64बिट ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 4एनएम फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा विवो मोबाइल एड्रेनो 740 जीपीयूला सपोर्ट करतो.

Vivo X90 Pro+ RAM

विवो एक्स90 प्रो प्लस स्मार्टफोन टेक मार्केटमध्ये 12 जीबी रॅमसह आला आहे. हा मोबाइल फोन 8जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. तसेच हेव्ही प्रोसेसिंग व मल्टी टॉस्किंग दरम्यान गरज पडल्यास वर Vivo X90 Pro+ 20 RAM च्या शक्तीसह परफॉर्म करू शकतो.

Vivo X90 Pro+ Camera

विवो एक्स90 प्रो प्लस मध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये एफ/1.75 अपर्चर असलेला 50MP IMX989 सेन्सर + एफ/2.2 अपर्चर असलेली 48MP IMX598 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स + एफ/1.6 अपर्चर असलेली 50MP IMX758 2X पोर्टरेट लेन्स + एफ/3.5 अपर्चर असलेला 64MP OmniVision OV64B पेरिस्कोप सेन्सर आहे. तसेच Vivo X90 Pro+ एफ/2.45 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo X90 Pro+ Battery

विवो एक्स90 प्रो प्लस स्मार्टफोन कंपनीनं 4,700एमएए बॅटरीसह लाँच केला आहे. ही बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी एक्स90 प्रो+ 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर करण्यात आला आहे. तसेच फोन वायरलेस पद्धतीनं चार्ज करण्यासाठी 50वॉट फास्ट वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीचा सपोर्ट देखील मिळतो. हे देखील वाचा: सॅमसंगचा नवा budget 5G Smartphone! सिम कार्ड न टाकताच मिळणार रेंज, स्वस्तात वॉटरप्रूफ फोन

Vivo X90 Pro Plus Price

विवो एक्स90 प्रो प्लस चीनी मार्केटमध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. एका व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा व्हेरिएंट 12 जीबी रॅमसह 512 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या दोन्ही व्हेरिएंटची किंमत क्रमश: RMB 6499 आणि RMB 6999 आहे. ही प्राइस इंडियन करंसीनुसार 74,400 रुपये आणि 80,000 रुपयांच्या आसपास आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here