ताकदवान प्रोसेसर आणि दमदार कॅमेरा असलेला पावरफुल फोन Vivo X60 इंडियन साइटवर झाला लिस्ट, आता Samsung-Xiaomi ची उडेल झोप

Vivo X60 सीरीजमध्ये कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये Vivo X60 आणि Vivo X60 Pro स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च केले होते. तसेच कंपनीने या सीरीजचा हाई-एन्ड फ्लॅगशिप फोन Vivo X60 Pro+ जानेवारीमध्ये लॉन्च केला होता. काही दिवसांपासून रिपोर्ट समोर येत आहे, ज्यात वीवो एक्स60 सीरीजच्या भारतातील लॉन्चची माहिती दिली जात आहे. आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झाले नाही कि भारतात फक्त वीवो एक्स60 व वीवो एक्स60 प्रो लॉन्च केले जातील कि त्यांच्यासोबत वीवो एक्स60 प्रो प्लस पण येईल. या रिपोर्ट्सनंतर आता 91मोबाईल्सने Vivo X60 मॉडेल नंबर V2045 सह Indonesia Telecom website वर स्पॉट केला आहे. (vivo x60 pro global launch imminent multiple certifications bis)

मिळाले अनेक सर्टिफिकेशन

इंडोनेशिया टेलिकॉम वेबसाइटच्या आधी Vivo X60 Pro (V2046) मल्टीपल सर्टिफिकेशन वेबसाइट जसे कि Indonesia Telecom, EEC आणि BIS वर दिसला आहे. त्याचबरोबर आम्ही या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते कि वीवो एक्स 60 सीरीज मार्चच्या शेवटपर्यंत भारतात लॉन्च होईल.

हे देखील वाचा : Vivo ने कमी केली 32MP चा सेल्फी कॅमेरा असलेल्या वीवो V20 SE ची किंमत, आता या किंमतीत होत आहे विक्री

या लाइनअप मध्ये विवो X60, X60 Pro आणि शक्यतो X60 Pro + चा समावेश असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर असे पण सांगण्यात आले आहे कि कंपनी Vivo X50 Pro + त्याच्या आसपास घेऊन येऊ शकते, त्यामुळे हा X60 + ची जागा घेऊ शकतो.

Vivo X60 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Vivo X60 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता, यात 6.56-इंचाचा ऐमोलेड डिस्प्ले FHD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. डिस्प्ले 19.8:9 आस्पेक्ट रेश्यो, HDR10+ आणि P3 कलर गेमूट आहे. फोन मध्ये 5nm Exynos 1080 SoC सह 12GB LPPRD4x रॅम + 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. फोन OriginOS सह अँड्रॉइड 11 वर चालतो. फोनमध्ये पवार बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंगसह येते.

फोटोग्राफीसाठी Vivo X60 प्रो मध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप, ज्यात 48MP (f / 1.48) Sony IMX598 प्राइमरी सेंसर, 5x ऑप्टिकल झूमसह 8MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 60x डिजिटल झूम, 13GB 120-डिग्री अल्ट्रा-वाइड लेंस, आणि 50mm फोकल लेन्थसह अजून एक 13MP पोर्ट्रेट लेंस देण्यात आली आहे. हँडसेट दुसऱ्या जेनरेशनच्या माइक्रो-गिंबल ओआईएस टेक्नॉलॉजी सह येतो, फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP स्नॅपर आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy M31S ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत

Vivo X60 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo X60 चे स्पेसिफिकेशन्स जवळपास प्रो मॉडेल प्रमाणेच आहे. फक्त वीवो एक्स60 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी आहे. याव्यतिरिक्त वीवो एक्स60 आणि एक्स60 प्रो मध्ये कोणताही फरक नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here