6जीबी रॅम आणि इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर सह 15 नोव्हेंबरला लॉन्च होईल वीवो एक्स21एस

वीवो ने एक्स21 ने स्मार्टफोन्स मधील फिंगरप्रिंट सेंसरची टेक्नॉलॉजी बदलून टाकली. आधी फोनच्या होम बटन किंवा बॅक पॅनल वर फिं​गरप्रिंट सेंसर देण्यात येत होते पण वीवो ने एक्स21 च्या माध्यमातून पहिल्यांदा टेक मंचावर इंनविजिबल असणारा इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर सादर केला होता. एक्स21 च्या माध्यमातून नवीन स्थान निर्माण करणारी वीवो आता लवकरच या फोनचा अजून एक नवीन वर्जन घेऊन येणार आहे. ताज्या बातमी मधून समजले आहे कि येत्या 15 नोव्हेंबरला वीवो एक्स21एस स्मार्टफोन आॅफिशियली लॉन्च करेल.

चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर वीवो एक्स21एस ची माहिती मिळाली आहे. एका पोस्ट मध्ये एक्स21एस च्या लॉन्च डेट सोबत याच्या स्पेसिफिकेशन आणि किंमतिचा खुलासा पण करण्यात आला आहे. वेईबो नुसार वीवो 15 नोव्हेंबरला चीनी बाजारात आपला नवीन फोन एक्स21एस लॉन्च करेल. वेईबो वर सांगण्यात आले आहे कि वीवो एक्स21एस मिलेनियम पिंक आणि स्ट्रारी नाईट ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला जाईल तसेच फोनची किंमत 2798 युआन असेल. हि किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 30,000 रुपये असेल.

वीवो एक्स21एस चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक नुसार हा फोन पॉलीकार्बोनेट बॉडी वर बनलेला असेल तसेच 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.28-इंचाच्या ओएलईडी डिस्प्ले सह सादर केला जाईल. पण फोन मध्ये कोणती नॉच असेल हे समजले नाही. लीक नुसार हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस वर सादर केला जाऊ शकतो सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालेल.

कंपनी वीवो एक्स21एस 6जीबी रॅम सह लॉन्च करू शकते तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. कॅमेरा डिपार्टमेंट पाहता लीक नुसार हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर असतील तर सेल्फी साठी या फोन मध्ये 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

वीवो चा हा फोन डुअल सिम फोन असेल जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करेल. वीवो एक्स21एस पण एक्स21 प्रमाणे इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर सह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,330 एमएएच ची बॅटरी असेल. चीन मध्ये हा फोन 15 नोव्हेंबरला लॉन्च केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here