वीवो वी15 प्रो अमेझॉन वर झाला लिस्ट, 20 फेब्रुवारीला लॉन्च होईल हा दमदार स्मार्टफोन

वीवो येत्या 20 फेब्रुवारीला भारतात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि याच ईवेंटच्या मंचावरून कंपनी आपल्या ‘वी’ स्मार्टफोनचा विस्तार करेल. वीवो त्यादिवशी वी15 प्रो आणि वी15 स्मार्टफोन सादर करणारआहे. 91मोबाईल्सने कंपनीच्या घोषणेच्या आधीच वी15 प्रो च्या फोटो सहित फोनचे स्पेसिफिकेशन्स पण शेयर केले आहेत. आज वीवो वी सीरीजचा आगामी डिवाईस शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण लिस्ट करण्यात आला आहे.

अमेझॉन इंडिया वर सध्या फक्त वीवो वी15 प्रो लिस्ट केला गेला आहे. अमेझॉनच्या या लिस्टिंग वरून एकीकडे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर हा फोन फक्त अमेझॉन इंडिया वर विकला जाईल हे स्पष्ट झाले आहे तसेच अमेझॉन ने आपल्या लिस्टिंग मध्ये वी15 प्रो चा लुक पण ऑफिशियली शेयर केला आहे. अमेझॉनच्या वेबपेज वर वी15 प्रो च्या पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर कॅमेरा तसेच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरची झलक पण दाखवण्यात आली आहे.

वीवो वी15 प्रो ची सर्वात मोठी खासियत फोनचा कॅमेरा सेग्मेंट असेल. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल तसेच हा फोन पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. वीवो 15 प्रो मध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल जो फोन बॉडी मध्ये असेल. सेल्फीची कमांड देताच हा सेंसर पॉप अप कॅमेऱ्याच्या स्वरूपात बाहेर येईल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वरील ट्रिपल कॅमेरा सेटअप मध्ये 48-मेगापिक्सल (12 X 4) चा प्राइमरी कॅमेरा सेंसर, 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी तसेच 5-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेंसर असेल.

शाओमी रेडमी आणि सॅमसंग गॅलेक्सी एम10 ला टक्कर द्यायला येत आहे एलजी के12+, 24 फेब्रुवारीला होईल लॉन्च

वी15 प्रो मध्ये फुल व्यू डिस्प्ले देण्यात येईल जो सुपर एमोलेड असेल. या डिस्प्लेच्या खालच्या भागात अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. लीकनुसार या फोनची डिस्प्ले साईज 6.39-इंच असेल जो फुलएचडी+ रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. वी15 प्रो 6जीबी रॅम सह बाजारात येईल तसेच फोन मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाईल. लेटेस्ट एंडरॉयड वर्जन सह वीवो आपला हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट सह लॉन्च करेल.

पुन्हा कमी झाली सॅमसंगच्या चार रियर कॅमेरा असलेल्या गॅलेक्सी ए9 ची किंमत, जाणून घ्या किती रुपयांत मिळेल हा शानदार फोन

वीवो वी15 प्रो 3,700एमएएच च्या बॅटरी वर सादर केला जाऊ शकतो जो डुअल इंजन फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. वीवो येत्या 20 फेब्रुवारीला वी15 प्रो भारतात सादर करणार आहे. या स्मार्टफोन्सची किंमत 30 हजार ते 35 हजारांच्या दरम्यान असू शकते. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार येत्या 15 फेब्रुवारी पासून वी15 प्रो प्री-बुकिंग साठी उपलब्ध होईल. तसेच फोनचा पहिला सेल कधी होईल या माहितीसाठी 20 फेब्रुवारीची वाट बघितली जात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here