48एपमी ट्रिपल कॅमेरा, 32एमपी पॉपअप सेल्फी, 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह लॉन्च झाला वीवो वी15 प्रो

गेल्या काही दिवसांपासून वीवोच्या नवीन फोन वी15 प्रो ची खूप चर्चा सुरु होती. कंपनी ने खूप आधीच हि घोषणा केली होती कि 20 फेब्रुवारीला हा भारतात लॉन्च केला जाईल आणि आज हा फोन सादर करण्यात आला आहे. कंपनी ने भारतीय बाजारात 2019 चा आपला पहिला फ्लॅगशिप फोन वी15 प्रो लॉन्च केला आहे. हा फोन इनडिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, पॉपअप कॅमेरा आणि ट्रिपल कॅमेरा सारख्या फीचर्स ने सुसज्ज आहे. भारतीय बाजारात हा फोन 6 मार्च पासून सेल साठी उपलब्ध होईल आणि हा ऑनलाइन स्टोर अमेझॉन व्यतिरिक्त ऑफलाइन स्टोर वरून पण विकत घेता येईल. राहिला प्रश्न किंमतीचा तर या फोनची सुरवाती किंमत 29,990 रुपये आहे.

वीवो वी15 प्रो चा कॅमेरा
हा फोन खासकरून आपल्या कॅमेरा फीचर्स साठी काफी चर्चेत आहे. वीवो 15 प्रो च्या मागील पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फ्रंट पॅनल वर तुम्हाला पॉपअप सेल्फी कॅमेरा मिळेल मिलेगा जो फोटो क्लिक करताना वर येतो आणि नंतर फोनच्या आत लपून जातो. अशाप्रकरेचा फीचर कंपनी ने गेल्यावर्षी वीवो नेक्स मध्ये सादर केला आहे. याचा सेल्फी कॅमेरा 32—मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.0 अपर्चर सह येतो. तसेच मागील पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर आहेत ज्यात मेन सेंसर 48—मेगापिक्सलचा (12 X 4) आहे जो एफ/1.8 अपर्चर सह येतो. पण यात पिक्सल बिनिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे ज्यात 12एमपी चा सेंसर आहे जो 48एमपी वर फोटो घेऊ शकतो. तसेच दुसरा सेंसर 8—मेगापिक्सलचा आहे जो वाइड एंगल साठी आहे तर तिसरा सेंसर 5—मेगापिक्सलचा देण्यात आला आहे आणि हा डेफ्थ सेंसिंगचे काम करतो. एकंदरीत कॅमेरा सेग्मेंट खुफ पावरफुल आहे.

वीवो वी15 प्रो चे स्पेसिफिकेशन
वीवो वी15 प्रो कंपनी ने ग्लास फिनिश मध्ये सादर केला आहे जो समोरून पूर्णपणे बेजल फ्री आहे. कंपनी ने हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे आणि यात 6.39—इंचाचा फुल एचडी+ (1080 x 2316 पिक्सल रेजल्यूशन) स्क्रीन देण्यात आली आहे. खास बाब अशी कि फोन मध्ये सुपर एमोलेड स्क्रीन पॅनलचा वापर केला गेला आहे जो चांगल्या डिस्प्ले साठी ओळखला जातो.

हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर (2×2.0 गीगाहट्र्ज क्रयो 460 गोल्ड आणि 6×1.7 गीगाहट्र्ज क्रयो 460 सिल्वर) देण्यात आला आहे. हा क्वालकॉमचा नवीन प्रोसेसर आहे जो शानदार प्रोसेसिंग साठी ओळखला जातो. तसेच कंपनी ने हा 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह सादर केला आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,700 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन वीवोच्या फनटच ओएस वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर आधारित आहे.

वीवो वी15 प्रो मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन
वीवो वी15 प्रो मध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे आणि तुम्ही दोन्ही सिम वर 4जी चा वापर करू शकता. सोबत वाईफाई आणि ब्लूटूथ तर आहेच. चांगली बाब अशी कि यात अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे जो कि एक प्रीमियम फीचर आहे. डेटा व चार्जिंग साठी यात माइक्रो यूएसबी पोर्ट आहे आणि हीच कमजोर बाब म्हणता येईल. या रेंज मध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट असता तर चांगले झाले असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here