Vivo T3 5G ची डिझाईन आली समोर, फ्लिपकार्ट पेज झाले लाईव्ह

Highlights

  • Vivo T3 5G ची मायक्रोसाइट लाईव्ह झाली आहे.
  • यात फोन हिरव्या रंगाच्या ऑप्शनमध्ये दिसला आहे.
  • हा 8 जीबी रॅम +256 जीबी स्टोरेजसह असू शकतो.

विवोने आपल्या टी-सीरिजमध्ये Vivo T3 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात आणण्याची तयारी करत आहे. तसेच मोबाईलचा टिझर सोशल मीडियावर समोर आला होता. तसेच, आता ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर फोटोसह डिव्हाईसला दाखविण्यात आले आहे. ज्यात याची डिझाईन आणि दुसरी माहिती पाहायला मिळू शकते. चला, पुढे तुम्हाला विवो टी3 5जी बाबत पूर्ण अपडेट देत आहोत.

Vivo T3 5G ची डिझाईन

  • ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर नवीन Vivo T3 5G की मायक्रोसाइट लाईव्ह झाली आहे यात बॅक पॅनलसह फोन दिसत आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीनशॉट फोटोमध्ये पाहू शकता की स्मार्टफोन हिरव्या रंगाच्या ऑप्शनमध्ये समोर आला आहे. ज्यात पिरामिड पॅटर्न सारखी यूनिक डिझाईन दिसून येत आहे.
  • डिव्हाईसच्या बॅक पॅनलवर एक आयताकृती कॅमेरा माड्यूल देण्यात आले आहे, ज्यात तीन गोलकार सेन्सर यूनिट एका लाइनमध्ये दिसत आहेत. याच्या बाजूला मध्ये एक एलइडी फ्लॅश दिसून येत आहे.
  • फोनच्या उजव्या साईडवर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आले आहे. तर खालच्या बाजूला विवोची ब्रँडिंग पाहायला मिळू शकते.

Vivo T3 5G चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: रिपोर्ट्सनुसार Vivo T3 5G मध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. या स्क्रीनवर 120Hz रिफ्रेश रेट, 1800 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस आणि पंच-होल कटआऊट डिझाईन दिले जाऊ शकते.
  • प्रोसेसर: मोबाईलमध्ये परफॉरमेंससाठी ब्रँड 4 नॅनोमीटर प्रक्रियावर आधारित मीडियाटेक डाइमेंसिटी 7200 ऑक्टाकोर प्रोसेसर देऊ शकतो.
  • स्टोरेज: Vivo T3 5G दोन स्टोरेज व्हेरिएंट मध्ये लाँच होऊ शकतो. ज्यात 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम +256 जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. त्याचबरोबर मोबाईल फोनमध्ये 8 जीबी एक्सटेंडेड रॅम पण दिली जाऊ शकते.
  • कॅमेरा: Vivo T3 5G ची फ्लिपकार्ट फोटोमध्ये ट्रिपल सेन्सर यूनिट पाहायला मिळू शकते. परंतु हे तिन्ही कॅमेऱ्यासाठी आहे की नाही याची पुष्टी अजून झालेली नाही. तसेच, लीकनुसार हा फोन ड्युअल रिअर कॅमेरामध्ये येऊ शकतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा आयएमएक्स882 प्रायमरी आणि 2 मेगापिक्सल बोकेह लेन्स लावला जाऊ शकतो. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी: Vivo T3 5 जी मध्ये तुम्हाला पावर बॅकअपसाठी 5,000 एमएएच बॅटरी आणि याला चार्ज करण्यासाठी 44 वॉट फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते.
    आणखी फिचर्स: हा मोबाईल पाणी आणि धुळीपासून वाचण्यासाठी IP54 रेटिंग, कनेक्टिव्हिटीसाठी 10 5G बँड सपोर्ट, मायक्रो एसडी कार्ड स्लॉट, ड्युअल सिम 5 जी, वायफाय, ब्लूटूथ, फिंगरप्रिंट सेन्सर सारखे अनेक फिचर्ससह एंट्री घेऊ शकतो.
  • ओएस: Vivo T3 5G स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टमच्या बाबतीत अँड्रॉइड 14 वर रन करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here