स्वस्त स्मार्टफोन TECNO POVA 6 होत आहे लाँचसाठी तयार, समोर आले हे स्पेसिफिकेशन

Tecno ने गेल्या महिन्यात MWC 2024 च्या मंचावरून मिड बजेट स्मार्टफोन POVA 6 Pro टेक मार्केटमध्ये आणला होता. हा मोबाईल 6,000mAh battery, 70W fast charging आणि Dimensity 6080 ​चिपसेटला सपोर्ट करतो. तसेच आता बातमी येत आहे की कंपनीने या फोनच्या बेस मॉडेल Tecno POVA 6 वर काम सुरु केले आहे जो लवकरच बाजारात लाँच केले जाऊ शकतो.

TECNO POVA 6 Google Play Console Listing डिटेल

  • टेक्नो पोवा 6 ला गुगल प्ले कंसोलवर TECNO-LI7 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आले आहे.
  • लिस्टिंगमध्ये खुलासा झाला आहे की हा मोबाईल MediaTek Helio G99 चिपसेटवर रन करेल.
  • फोनमध्ये 2.2GHz असणारा 2 Cortex A76 कोर तसेच 2.0GHz स्पीड असलेल्या 6 Cortex A55 मिळतात.
  • गुगल प्ले कंसोलनुसार ग्राफिक्ससाठी TECNO POVA 6 Mali G57 GPU ला सपोर्ट करेल.
  • या अपकमिंग टेक्नो स्मार्टफोनला लिस्टिंगमध्ये Android 14 ओएससह सांगण्यात आले आहे.
  • फोनमध्ये 2436 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या HD+ Display पाहायला मिळू शकते. यावर 480 PPI मिळेल.
  • TECNO POVA 6 ला या लिस्टिंगमध्ये 8GB RAM वर बनलेले दाखविण्यात आले आहे. परंतु कंपनी याचे छोटे व्हेरिएंट पण आणू शकते.

Tecno Pova 6 Pro स्पेसिफिकेशन

  • स्क्रीन: Tecno Pova 6 Pro मध्ये 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, 2160Hz PWM रेट मिळतो. स्क्रीनमध्ये बेजेल्स मात्र 1.3 मिमी आहेत. हा कमी बजेट असलेला फोन आहे, यानुसार हा फिचर्स खूप दमदार युजर एक्सपीरियंस प्रदान करतो.
  • परफॉर्मन्स : प्रोसेसर पाहता नवीन यूनिक मोबाईल मीडियाटेक डाइमेंसिटी 6080 चिपसेटवर चालतो. हा 6 नॅनो मीटर प्रक्रियावर आधारित आहे ज्यामुळे गेमिंगसह सर्व ऑपरेशन चांगल्या प्रकारे पूर्ण होतात. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी माली-जी57 एमसी2 जीपीयू मिळतो.
  • कॅमेरा: टेक्नो पोवा 6 प्रो मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 108 एमपी प्रायमरी कॅमेरा 3x झूम आणि 10x डिजिटल झूम पर्यंतला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 2MP डेप्थ सेन्सर आणि एक AI कॅमेरा लेन्स लावण्यात आली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 एमपीची फ्रंट लेन्स ड्युअल-टोन एलईडी फ्लॅशसह मिळते.
  • बॅटरी: या नवीन टेक्नो फोनला खास बनवते, याची मोठी बॅटरी कारण यात 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जो याला जास्त वेळाचा बॅकअप प्रदान करते, त्याचबरोबर फास्ट चार्ज करण्यासाठी यूएसबी टाइप सी केबल आणि 70 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here