Samsung Galaxy A6 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 03 Sep 2018 13:19:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.5 सॅमसंग ने केल्या 6 स्मार्टफोन्सच्या किंमती कमी, 6,500 रुपयांनी स्वस्त झाले हे शानदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a6-galaxy-j4-galaxy-j8-galaxy-j7-prime-price-cut-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a6-galaxy-j4-galaxy-j8-galaxy-j7-prime-price-cut-in-marathi/#respond Mon, 03 Sep 2018 13:19:36 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1924 जर तुम्ही खालील दिलेल्या कोणत्याही स्मार्टफोन्स पैकी कोणताही डिवाईस घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी गामावू नका.

The post सॅमसंग ने केल्या 6 स्मार्टफोन्सच्या किंमती कमी, 6,500 रुपयांनी स्वस्त झाले हे शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कपंनी वीवो ने काही दिवसांपूर्वी एक साथ आपल्या तीन स्मार्टफोन च्या किंमती कमी केल्या होत्या. तसेच देशातील दिग्गज कपंनी सॅमसंग ने आपल्या फॅन्स साठी अशीच भेट आणली आहे. जन्माष्टमीच्या निमित्ताने बातमी आली आहे की सॅमसंग ने एक साथ आपल्या 6 स्मार्टफोन्स च्या किंमती कमी केल्या आहेत. सॅमसंग ने या डिस्काउंट मध्ये गॅलेक्सी जे सीरीज आणि गॅलेक्सी ए सीरीज चा समावेश केला आहे. जर तुम्ही खालील दिलेल्या कोणत्याही स्मार्टफोन्स पैकी कोणताही डिवाईस घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी गामावू नका.

सॅमसंग ने गॅलेक्सी जे2 (2017), गॅलेक्सी जे4, गॅलेक्सी जे8 आणि गॅलेक्सी जे7 प्राइम सोबत गॅलेक्सी ए6 आणि गॅलेक्सी ए6 प्लस च्या किंमती कमी केल्या आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीज पाहता 21,990 रुपयांमध्ये लॉन्च झालेल्या 32जीबी वाल्या गॅलेक्सी ए6 स्मार्टफोन ची किंमत कंपनी ने 6,500 रुपयांनी कमी केली आहे तसेच फोनच्या 64जीबी वेरिएंट ची किंमत 6,000 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर 32जीबी वेरिएंट 15,490 रुपये तर 22,990 रुपयांचा 64जीबी वेरिएंट 16,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

त्याचप्रमाणे 25,990 रुपयांमध्ये लॉन्च झालेल्या गॅलेक्सी ए6+ स्मार्टफोन 4,000 रुपयांच्या प्राइस कट नंतर 21,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

गॅलेक्सी जे2 (2017) बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन गेल्या वर्षी 7,990 रुपयांमध्ये विकत घेता येत होता पण आता सॅमसंग ने प्राइस कट केल्यामुळे हा स्मार्टफोन फक्त 5,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 2जीबी रॅम आणि 3,000एमएएच बॅटरी असलेला गॅलेक्सी जे4 कंपनी ने 9,999 मध्ये बाजारात आणला होता. पण आता सॅमसंग ने या फोनची किंमत पण 1,000 रुपयांनी कमी केली आहे. म्हणजे 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला गॅलेक्सी जे4 फक्त 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

त्याचप्रमाणे सॅमसंग ने 16जीबी स्टोरेज वाल्या गॅलेक्सी जे7 प्राइम ची किंमत पण 500 रुपयांनी कमी केली आहे. आता पर्यंत हा स्मार्टफोन 10,490 रुपयांमध्ये उपलब्ध होता पण आता प्राइस कट नंतर हा 9,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. अशा प्रकारे जून मध्ये लॉन्च झालेला कंपनी चा मीड रेंज स्मार्टफोन गॅलेक्सी जे8 पण 1,000 रुपयांनी कमी किंमतीत विकत घेता येईल. 18,990 रूपयांचा हा फोन आता 17,990 रुपयांमध्ये मिळेल.

The post सॅमसंग ने केल्या 6 स्मार्टफोन्सच्या किंमती कमी, 6,500 रुपयांनी स्वस्त झाले हे शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a6-galaxy-j4-galaxy-j8-galaxy-j7-prime-price-cut-in-marathi/feed/ 0
सॅमसंग 21 मे ला भारतात करणार आहे ईवेंट, लॉन्च होऊ शकतात गॅलेक्सी ए6, ए6+ आणि गॅलेक्सी जे4 स्मार्टफोन, शेयर केले मीडिया इन्वाईट https://www.91mobiles.com/marathi/samsung-21-may-event-in-india-galaxy-a6-galaxy-a6-plus-galaxy-j4-galaxy-j6-might-launch-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-21-may-event-in-india-galaxy-a6-galaxy-a6-plus-galaxy-j4-galaxy-j6-might-launch-in-marathi/#respond Wed, 16 May 2018 18:20:23 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=484 विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सॅमसंग ने इंडोनेशियन बाजारात गॅलेक्सी ए6 आणि गॅलेक्सी ए6+ सादर केले आहेत.

The post सॅमसंग 21 मे ला भारतात करणार आहे ईवेंट, लॉन्च होऊ शकतात गॅलेक्सी ए6, ए6+ आणि गॅलेक्सी जे4 स्मार्टफोन, शेयर केले मीडिया इन्वाईट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग बद्दल अनेक दिवसांपासुन बातम्या येत होत्या. काही रिपोर्ट्स मधून सॅमसंग च्या गॅलेक्सी ए6 स्मार्टफोन मॉडेल्स ची माहिती मिळाली आहे तर काही रिपोर्ट मध्ये गॅलेक्सी जे4 आणि गॅलेक्सी जे6 च्या लॉन्च ची बातमी मिळत आहे. सॅमसंग ने अजूनपर्यंत कोणतीच माहिती दिली नव्हती पण आज सॅमसंग इंडिया ने घोषणा केली आहे की कंपनी 21 मे ला देशात ईवेंट चे आयोजन करणार आहे. 21 मे च्या ईवेंट साठी सॅमसंग ने मीडिया इन्वाईट पाठवेन सुरू केले आहेत, ज्यातून आगामी स्मार्टफोन ची माहिती मिळाली आहे.

सॅमसंग इंडिया ने 21 मे ला भारतात ईवेंट चे आयोजन केले जात आहे. सॅमसंग कडून पाठवण्यात आलेल्या मीडिया इन्वाईट मध्ये ‘से हॅलो टू, इनफिनिटी अँड मोर’ लिहिण्यात आले आहे. या टॅगलाईन वरून कळते की कपंनी यादिवशी भारतात जे डिवाईस लॉन्च करणार आहे त्यात इनफिनिटी डिस्प्ले असेल. सूत्रांनुसार 21 मे ला सॅमसंग भारतात एक नही तर अनेक स्मार्टफोन अनाउंस करेल.

प्राप्त माहितीनुसार या ईवेंट च्या मंचावरून सॅमसंग गॅलेक्सी ए6, गॅलेक्सी ए6+, गॅलेक्सी जे4 तसेच गॅलेक्सी जे6 स्मार्टफोन भारतीय बाजारात आणू शकते. पण सॅमसंग ने लॉन्च होणार्‍या स्मार्टफोन्स ची नावे समोर आणली नाहीत पण एवढे निश्चित की कंपनी 21 मे ला भारतीय टेक बाजारात नवीन फोन्स आणून इतर कंपन्यांची समीकरणे बदलेल.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सॅमसंग ने इंडोनेशियन बाजारात गॅलेक्सी ए6 आणि गॅलेक्सी ए6+ सादर केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल 18.5:9 आसपेक्ट रेशियो वाल्या इनफिनिटी डिस्प्ले सह सादर करण्यात आले आहेत. गॅलेक्सी ए6 5.6-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे तर गॅलेक्सी ए6+ 6-इंचाच्या सुपरएमोलेड स्क्रीन ला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सॅमसंग च्या कमी बजेट वाल्या गॅलेक्सी जे6 पण 5.6-इंचाच्या बेजल लेस इनफिनिटी डिस्प्ले सह सादर करण्यात येईल.

The post सॅमसंग 21 मे ला भारतात करणार आहे ईवेंट, लॉन्च होऊ शकतात गॅलेक्सी ए6, ए6+ आणि गॅलेक्सी जे4 स्मार्टफोन, शेयर केले मीडिया इन्वाईट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-21-may-event-in-india-galaxy-a6-galaxy-a6-plus-galaxy-j4-galaxy-j6-might-launch-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी ए6 आणि गॅलेक्सी ए6 प्लस लॉन्च, इनफिनिटी डिस्प्ले डुअल कॅमेरा आणि शानदार सेल्फी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a6-and-a6-plus-launched-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a6-and-a6-plus-launched-price-specification-and-features-in-marathi/#respond Tue, 01 May 2018 06:38:00 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=176 कंपनी ने आपल्या आॅफिशियल वेबसाइट वर सॅमसंग गॅलेक्सी ए6 आणि गॅलेक्सी ए6+ लिस्ट केले आहेत.

The post सॅमसंग गॅलेक्सी ए6 आणि गॅलेक्सी ए6 प्लस लॉन्च, इनफिनिटी डिस्प्ले डुअल कॅमेरा आणि शानदार सेल्फी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मागील काही महिन्यांपासून सॅमसंग चे दोन नवीन मॉडेल गॅलेक्सी ए6 आणि गॅलेक्सी ए6+ बद्दल चर्चा होत होती. तसेच काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्स ने माहिती दिली होती कि लवकरच हे फोन भारतात लॉन्च होणार आहेत. या सोबत आम्ही काही स्पेसिफिकेशन पण शेयर केले होते. पण आज सॅमसंग ने या फोन्स वरून पडदा हटवला आहे. कंपनी ने आपल्या आॅफिशियल वेबसाइट वर सॅमसंग गॅलेक्सी ए6 आणि गॅलेक्सी ए6+ लिस्ट केले आहेत. सध्यातरी हे इंडोनेशिया च्या वेबसाइट वर लिस्ट करण्यात आले आहेत पण लवकरच हे भारतात लॉन्च होणार आहेत.

कंपनी ने आता पर्यंत किंमतीची माहिती दिली नाही पण फोन्स चे सर्व स्पेसिफिकेशन उपलब्ध झाले आहेत. सॅमसंग गॅलेक्सी ए6 मॉडेल आहे तर गॅलेक्सी ए6+ थोडा मोठा वेरियंट आहे. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर सॅमसंग गॅलेक्सी ए6 मध्ये तुम्हाला 5.6-इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल. फोन चे स्क्रीन रेजल्यूशन 1480 x 720 पिक्सल आहे. विशेष म्हणजे या फोन मध्ये तुम्हाला 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाला इनफिनिटी डिसप्ले मिळणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए6 मध्ये 16-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी ने याला एफ/1.7 अपर्चर सह सादर केले आहे जो मोठे फोटो घेण्यास सक्षम आहे. तसेच याचा फ्रंट कॅमेरा पण 16-मेगापिक्सलचा आहे. दोन्ही कॅमेरा सोबत तुम्हाला फ्लॅश मिळेल. फोनचा फ्रंट कॅमेरा पण काही कमी नाही. हा एफ/1.9 अपर्चर सह सादर करण्यात आला आहे जो वाइड एंगल सेल्फी घेण्यास सक्षम आहे.

यह फोन सैमसंग के ही एक्नोस 7870 चिपसेट पर कार्य करता है और इसमें 1.6गीगाहट्र्ज का आॅक्टाकोर प्रोसेसर दिया गया है। इसके साथ ही 3जीबी रैम और 32जीबी की इंटरनल मैमोरी है। फोन में मैमोरी कार्ड सपोर्ट है और आप 256जीबी तक के कार्ड का उपयोग कर सकते हैं।


हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो. डुअल सिम आधारित या फोन मध्ये 4जी वोएलटीई सपोर्ट आहे. तसेच सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनी ने यात फेस अनलॉक फीचर पण दिले आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए6+ पाहता हा फोन खुप अडवांस आहे. यात तुम्हाला 6-इंचाची सुपरएमोलेड स्क्रीन मिळेल. जी कंपनी ने फुलचडी प्लस (2220 x 1080 पिक्सल रेजोल्यूशन) सह सादर केली आहे. पण अजूनही प्रोटेक्शन ची माहिती देण्यात आली नाही. या फोन मध्ये तुम्हाला 18.5:9 आसपेक्ट रेशियो वाला इनफिनिटी डिसप्ले मिळेल.

फोटोग्राफी बद्दल बोलायचे झाले तर सॅमसंग गॅलेक्सी ए6+ मध्ये तुम्हाला 16-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा मिळेल. यात एक सेंसर एफ/1.7 अपर्चर सह आहे तर दुसरा एफ/1.9 अपर्चर सह देण्यात आला आहे. सेल्फी च्या बाबतीत हा अजूनच पुढे आहे. याचा फ्रंट कॅमेरा 24—मेगापिक्सल चा देण्यात आला आहे जो एफ/1.9 अपर्चर सह आहे. यात तुम्हाला बॅक सह फ्रंट मध्ये पण फ्लॅश मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी ए6+ क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो आणि यात 1.8गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मध्ये 4जीबी रॅम सह 32जीबी ची इंटरनल मेमरी आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 400जीबी पर्यंतचे कार्ड वापरू शकता.

ए6 प्रमाणे हा फोन पण एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि यात फिंगरप्रिंट स्कॅनर सह फेस अनलॉक पण मिळेल. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी ए6 आणि गॅलेक्सी ए6 प्लस लॉन्च, इनफिनिटी डिस्प्ले डुअल कॅमेरा आणि शानदार सेल्फी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a6-and-a6-plus-launched-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0