OPPO A58x 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 03:14:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.5 चीनमध्ये आलेल्या OPPO A58x 5G मध्ये मिळतेय 5000mAh battery आणि 8GB RAM https://www.91mobiles.com/marathi/8-gb-ram-smartphone-oppo-a58x-5g-launched-know-price-and-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/8-gb-ram-smartphone-oppo-a58x-5g-launched-know-price-and-specifications-details/#respond Wed, 14 Dec 2022 10:27:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15992 ओप्पो कंपनीनं काही दिवसांपूर्वी टेक मंचावर आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत OPPO A58 5G फोन लाँच केला होता जो 50MP Camera, 8GB RAM, MediaTek Dimensity 700 चिपसेट आणि 33W 5,000mAh battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो. 19 हजारांच्या रेंजमध्ये आलेल्या ओप्पो ए58 5जी नंतर आता कंपनीनं आणखी एक कमी किंमत असलेला स्वस्त 5जी मोबाइल फोन OPPO A58x […]

The post चीनमध्ये आलेल्या OPPO A58x 5G मध्ये मिळतेय 5000mAh battery आणि 8GB RAM first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओप्पो कंपनीनं काही दिवसांपूर्वी टेक मंचावर आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत OPPO A58 5G फोन लाँच केला होता जो 50MP Camera, 8GB RAM, MediaTek Dimensity 700 चिपसेट आणि 33W 5,000mAh battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो. 19 हजारांच्या रेंजमध्ये आलेल्या ओप्पो ए58 5जी नंतर आता कंपनीनं आणखी एक कमी किंमत असलेला स्वस्त 5जी मोबाइल फोन OPPO A58x 5G देखील टेक मंचावर सादर केला आहे. ओप्पो ए58एक्स 5जी चीनमध्ये लाँच झाला आहे ज्याची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

OPPO A58x 5G चे स्पेसिफिकेशन्स

OPPO A58x 5G फोन अँड्रॉइड 12 आधारित कलरओएस 12.1 सह लाँच झाला आहे जो ऑक्टा-कोर प्रोसेसरसह मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटवर चालतो. या ओप्पो मोबाइलमध्ये 8जीबी पर्यंतचा इंटरनल रॅम देण्यात आली आहे जो 5जीबी वचुर्अल रॅमला पण सपोर्ट करतो. गरज पडल्यास ओप्पो ए58एक्स 5जी फोन 13जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकतो. ओप्पो ए58एक्स 5जी फोन LPDDR4x RAM आणि UFS 2.2 storage टेक्नॉलॉजीसह चालतो. हे देखील वाचा: टाटाच्या इलेक्ट्रिक कारशी पंगा घेण्यासाठी येतेय Citroen C3; भारतीय लाँचची जोरदार तयारी

ओप्पो ए58एक्स 5जी फोन को 720 x 1612 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. या फोनच्या डिस्प्लेमध्ये 600निट्स ब्राइटनेस, 269पीपीआय आणि 16.7एम कलरचा सपोर्ट मिळतो तसेच पांडा ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी ओप्पो ए58एक्स 5जी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. बॅक कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल पोर्टरेट लेन्ससह चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OPPO A58x 5G फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 5जी आणि 4जी दोन्ही वापरता येतं. सिक्योरिटीसाठी साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तसेच या फोनमध्ये फेस अनलॉक फीचर देखील आहे. पावर बॅकअपसाठी ओप्पो ए58एक्स 5जी फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: सर्वात कमी किंमतीत 600GB डेटा आणि 12 महिने चालणारा BSNL चा प्लॅन; Jio-Airtel ची बोलती बंद

OPPO A58x 5G ची किंमत

ओप्पो ए58एक्स 5जी चीनमध्ये लाँच झाला आहे जिथे स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. फोनचा बेस व्हेरिएंट 6GB RAM + 128GB Storage ला सपोर्ट करतो तर दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 8GB RAM + 128GB Storage देण्यात आली आहे. सध्या फोनच्या 6जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत समोर आली आहे जी 1200 युआन आहे. भारतीय करंसीनुसार ही किंमत 14,200 रुपयांच्या आसपास आहे. चीनमध्ये OPPO A58x 5G Breeze Purple, Tranquil Blue आणि Star Black कलरमध्ये विकत घेता येईल.

The post चीनमध्ये आलेल्या OPPO A58x 5G मध्ये मिळतेय 5000mAh battery आणि 8GB RAM first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8-gb-ram-smartphone-oppo-a58x-5g-launched-know-price-and-specifications-details/feed/ 0