Mi TV - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.5 डिस्काउंटसह मिळत आहेत Redmi आणि Mi चे स्मार्ट टीव्ही; सुरु झाला Xiaomi चा Sale Out सेल https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-sale-out-scheme-discount-on-redmi-and-mi-tv/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-sale-out-scheme-discount-on-redmi-and-mi-tv/#respond Thu, 15 Dec 2022 04:29:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16009 Xiaomi ची सेल आउट (Sale Out) स्कीम सुरु झाली आहे. शाओमीच्या या स्कीमसह Redmi आणि Mi चे स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करता येतील. शाओमीचा हा सेल 14 डिसेंबर ते 19 डिसेंबर म्हणजे 6 दिवस चालेल. Xiaomi च्या या ऑफरसह स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. इथे आम्ही तुम्हाला Redmi आणि Mi च्या स्मार्ट टीव्हीवर मिळणाऱ्या […]

The post डिस्काउंटसह मिळत आहेत Redmi आणि Mi चे स्मार्ट टीव्ही; सुरु झाला Xiaomi चा Sale Out सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ची सेल आउट (Sale Out) स्कीम सुरु झाली आहे. शाओमीच्या या स्कीमसह Redmi आणि Mi चे स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करता येतील. शाओमीचा हा सेल 14 डिसेंबर ते 19 डिसेंबर म्हणजे 6 दिवस चालेल. Xiaomi च्या या ऑफरसह स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. इथे आम्ही तुम्हाला Redmi आणि Mi च्या स्मार्ट टीव्हीवर मिळणाऱ्या डिस्काउंटची माहिती देत आहोत.

Redmi आणि Mi के स्मार्ट टीव्हीवरील ऑफर्स

Xiaomi च्या सेल आउट स्कीम दरम्यान कंपनीच्या स्मार्ट टीव्हीवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. इथे आम्ही आम्ही तुम्हाला या टीव्हीवर मिळणाऱ्या डिस्काउंटची माहिती दिली आहे. हे देखील वाचा: ओटीपी नव्हे तर फक्त मिस कॉल देऊन बँक अकाऊंटमधून काढले 50 लाख; असा आहे ‘सिम स्वॅप’ फ्रॉड

Redmi 32

Redmi 32 इंच स्मार्ट टीव्हीवर 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. रेडमीच्या या टीव्हीची MRP 13,999 रुपये आहे, जी डिस्काउंटनंतर 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Mi 32 5A

Mi 32 5A स्मार्ट टीव्हीवर 500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. शाओमीच्या या टीव्हीची एमआरपी 13,999 रुपये आहेत. डिस्काउंटमुळे हा टीव्ही फक्त 13599 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Mi 40 5A

Mi 40 5A स्मार्ट टीव्ही 1000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. टीव्हीची एमआरपी 21,999 रुपये आहे, परंतु सेल अंतर्गत हा टीव्ही 20,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे.

Redmi 43

Redmi 43 स्मार्ट टीव्हीवर शाओमीच्या सेल आउट स्कीम दरम्यान 2000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे 23,999 रुपये एमआरपी असलेला हा मॉडेल डिस्काउंटनंतर 21,999 रुपयांमध्ये तुमचा होईल.

Mi 43 5x

Mi 43 5x स्मार्ट टीव्हीवर 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. Mi च्या 43 इंच टीव्हीची एमआरपी 31,999 रुपये आहे, जी आता 30,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Redmi 50

Redmi 50 स्मार्ट टीव्हीची साइज 50 इंच आहे, जिच्यावर 1000 रुपयांचा डिस्काउंट आहे. या टीव्हीची एमआरपी 32,999 रुपये आहे. सेल दरम्यान हा टीव्ही 31,999 रुप्यानमध्ये तुमचा होईल.

Xiaomi X50

Xiaomi X50 स्मार्ट टीव्हीवर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. इतरवेळी शाओमीचा हा टीव्ही 34,999 रुपयांमध्ये खरेदी करावा लागतो परंतु सेलमध्ये याची किंमत 32,999 रुपये झाली आहे. हे देखील वाचा: OnePlus 11 ची लाँच डेट लीक! कंपनीच्या 9th anniversary च्या दिवशी येईल सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन

Xiaomi X43

Xiaomi X43 स्मार्ट टीव्हीवर सेल आउट स्कीम दरम्यान 1000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. या टीव्हीची मूळ किंमत 28,999 रुपये आहे, परंतु सेल दरम्यान हा टीव्ही 27,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

The post डिस्काउंटसह मिळत आहेत Redmi आणि Mi चे स्मार्ट टीव्ही; सुरु झाला Xiaomi चा Sale Out सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-sale-out-scheme-discount-on-redmi-and-mi-tv/feed/ 0
Xiaomi ने 8 Smart TV मॉडेल्सचे भाव वाढवून दिला झटका, 3000 रुपयांनी वाढली किंमत https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-tv-4x-4a-pro-price-increased-by-rs-3000-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-tv-4x-4a-pro-price-increased-by-rs-3000-in-india/#respond Wed, 06 Jan 2021 12:43:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9555 नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच शाओमीने आपल्या फॅन्सना झटका दिला आहे. कंपनीने आपल्या स्मार्ट टेलीविजन मॉडेलच्या किंमतीत 3,000 रुपयांची वाढ केली आहे.

The post Xiaomi ने 8 Smart TV मॉडेल्सचे भाव वाढवून दिला झटका, 3000 रुपयांनी वाढली किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi बराच काळ भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड स्थानावर कायम आहे. स्वस्त मोबाईल फोन्स पासून डिवायसेज पर्यंत सर्व सेग्मेंट मध्ये शाओमी लोकांना आवडते. स्मार्टफोन आणि ऍक्सेसरीज सोबतच स्मार्ट गॅजेट आणि स्मार्टटीव्हीच्या बाजारात पण शाओमीने खूप नाव कमावले आहे. Xiaomi Smart TV शानदार फीचर्स आणि कमी किंमत या गोष्टींमुळे भारतीयांना आवडतात. पण नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच शाओमीने आपल्या फॅन्सना झटका दिला आहे. कंपनीने आपल्या स्मार्ट टेलीविजन मॉडेलच्या किंमतीत 3,000 रुपयांची वाढ केली आहे.

कोणती टीव्ही झाली किती महाग

सर्वप्रथम Xiaomi Mi TV 4A पाहता या स्मार्टटीव्हीचा 32 इंच मॉडेल आतापर्यंत 13,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता, पण आता कंपनीने या मॉडेलची किंमत 1,000 रुपयांनी वाढवली आहे. किंमत वाढवल्यानंतर मी टीव्ही 4ए 32 इंचाच्या मॉडेलची किंमत आता 14,999 रुपये झाली आहे.

हे देखील वाचा : 108एमपी कॅमेरा आणि 8 जीबी रॅम सह भारतात लॉन्च झाला Xiaomi चा पावरफुल फोन Mi 10i 5G

त्याचप्रमाणे 32 इंच डिस्प्ले असलेला Xiaomi Mi TV 4A Pro चा भाव पण कंपनीने 1,000 रुपयांनी वाढवला आहे. हा स्मार्ट टेलीविजन आतापर्यंत बाजारात 13,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता, पण आता भाववाढ झाल्यामुळे स्मार्टटीव्हीची किंमत 14,999 रुपये झाली आहे. तसेच Xiaomi 32 इंच HZ TV च्या किंमतीत 1,500 रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळे 14,499 रुपयांचा टीव्ही आता 15,999 रुपयांना मिळत आहे.

Xiaomi Mi TV 4A 43 इंच मॉडेलची किंमत कंपनीने 2,500 रुपयांनी वाढवली आहे. हि स्मार्टटीव्ही आतापर्यंत 22,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होती, पण आता किंमत वाढवल्यामुळे हा टीव्ही मॉडेल 25,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 43 इंच HZ TV ची किंमत पण 2,500 रुपयांनी वाढून 23,499 रुपयांवरून 25,999 रुपये झाली आहे.

हे देखील वाचा : Xiaomi चालली Apple च्या वाटेवर, चार्जरविना लॉन्च केला 108MP कॅमेरा असलेला Mi 11, सर्वात ताकदवान प्रोसेसर आहे यात

Xiaomi Mi TV 4X पाहता या टीव्हीच्या सर्व मॉडेल वर कंपनीने थेट 3,000 रुपयांची वाढ केली आहे. या स्मार्टटीव्हीचा 43 इंच मॉडेल आधी 25,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता, पण आता याची किंमत वाढून 28,999 रुपये झाली आहे. 31,999 रुपयांमध्ये मिळणारा 50 इंचाचा मॉडेल महाग होऊन 34,999 रुपयांचा झाला आहे तसेच 36,999 रुपयांचा 55 इंच मॉडेल आता 44,999 रुपयांमध्ये मिळेल.

The post Xiaomi ने 8 Smart TV मॉडेल्सचे भाव वाढवून दिला झटका, 3000 रुपयांनी वाढली किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-tv-4x-4a-pro-price-increased-by-rs-3000-in-india/feed/ 0
Nokia ची 55 इंच 4K स्मार्टटीव्ही इंडियन वेबसाइट वर लिस्ट, एंडरॉयड 9 आणि JBL साउंड सिस्टम सह होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-55-inch-display-4k-ultra-hd-panel-android-9-os-jbl-sound-system-bis-listing-55cauhdn-india/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-55-inch-display-4k-ultra-hd-panel-android-9-os-jbl-sound-system-bis-listing-55cauhdn-india/#respond Thu, 14 Nov 2019 14:30:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5784 फ्लिपकार्ट सोबत झालेल्या या पार्टनरशिपने स्पष्ट केले आहे कि Nokia स्मार्ट टेलीविजन या शॉपिंग साइट वर एक्सक्लूसिवली विकला जाईल.

The post Nokia ची 55 इंच 4K स्मार्टटीव्ही इंडियन वेबसाइट वर लिस्ट, एंडरॉयड 9 आणि JBL साउंड सिस्टम सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारत जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन बाजारापॅकी एक आहे. जगभरातील टेक कंपन्या भारतात आपले भविष्य शोधत आहेत. स्मार्टफोनचे मोठे मार्केट बनल्यानंतर आता देशात स्मार्ट टेलीविजनची मागणी वाढत आहे. Samsung व LG च्या फ्लॅगशिप स्मार्ट टेलीविजन सोबत Xiaomi स्वस्त बजेट मध्ये टीव्ही उपलब्ध करवून देत आहे. मागे OnePlus आणि Motorola ने पण भारतात आपला स्मार्ट टेलीविजन आणला होता. आता स्मार्ट टीव्हीच्या बाजारात Nokia पण आपले नशीब अजमावण्यास तयार आहे. Nokia ब्रँड पण भारतात आपला स्मार्ट टेलीविजन लॉन्च करणार आहे आणि हि स्मार्टटीव्ही भारतीय सर्टिफिकेशन्स साइट वर पण लिस्ट झाला आहे.

Nokia च्या स्मार्ट टीव्हीची माहिती गेल्या आठवड्यात समोर आली होती. Nokia ने या टेलीविजन साठी ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट सह भागेदारी केली आहे. कंपनीने अजूनतरी या आगामी टीव्हीचे डिटेल्स शेयर केले नाहीत, पण हा स्मार्टटीव्ही आता भारतीय सर्टिफिकेशन साइट ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजे BIS वर लिस्ट झाला आहे. BIS वर हा टीव्ही 55CAUHDN मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे, ज्यावरून टीव्ही संबंधित महत्वाची माहिती मिळाली आहे.

सर्टिफिकेशन्स मध्ये झाला खुलासा

BIS सर्टिफिकेशन्सवरून समजले आहे कि Nokia चा हा आगामी टेलीविजन 55 इंच डिस्प्ले सह बाजारात येईल. बोलले जात आहे कि Nokia स्मार्ट टीव्ही एकापेक्षा जास्त साईज मॉडेल्स सह मार्केट मध्ये लॉन्च होईल. फ्लिपकार्ट सोबत झालेल्या या पार्टनरशिपने स्पष्ट केले आहे कि Nokia स्मार्ट टेलीविजन या शॉपिंग साइट वर एक्सक्लूसिवली विकला जाईल.

Nokia स्मार्ट टीव्ही

नोकिया ब्रँडच्या या पहिल्या स्मार्ट टेलीविजनचे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक मध्ये समोर आले आहे कि कंपनीचा लॉन्च केला जाणारा टीव्ही 55-इंचाचा असेल. बोलले जात आहे कि हा टीव्ही 4K अल्ट्रा एचडी पॅनल वर बनलेला असेल जो शानदार विजुअल क्वॉलिटी देईल. Nokia स्मार्ट टेलीविजन एंडरॉयड 9.0 पाई ओएस सह येईल. लीकनुसार हा टीव्ही मध्ये इंटेलिजेंट डीमिंग टेक्नोलॉजी वापर करेल तसेच Nokia स्मार्टटीव्ही मध्ये जेबीएलची साउंड सिस्टम असेल.

Realme पण घेऊन येत आहे टीव्ही

91mobiles ला इंडस्ट्री सोर्स कडून अशी माहिती मिळाली आहे कि Realme ब्रँड पण स्मार्ट टेलीविजन वर काम करत आहे आणि कंपनी यावर्षीच्या शेवटी इंडियन मार्केट मध्ये आपला पहिला टीव्ही लॉन्च करण्याची प्लानिंग करत आहे. आशा आहे कि Realme स्मार्टटीव्ही पण बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च केली जाईल जी अफोर्डेबल असेल. Nokia आणि Realme चे स्मार्ट टेलीविजन बाजारात आल्यामुळे Xiaomi Mi TV ला थेट टक्कर मिळेल.

The post Nokia ची 55 इंच 4K स्मार्टटीव्ही इंडियन वेबसाइट वर लिस्ट, एंडरॉयड 9 आणि JBL साउंड सिस्टम सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-smart-tv-55-inch-display-4k-ultra-hd-panel-android-9-os-jbl-sound-system-bis-listing-55cauhdn-india/feed/ 0
एका महिन्यात 120 लाख प्रोडक्ट्स विकून Xiaomi ने केला रेकॉर्ड, 85 लाख स्मार्टफोन्स सह विकले गेले 6 लाख MI TV https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-sold-over-12-million-devices-smartphone-mi-tv-in-one-month-during-festive-sales-indian-market/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-sold-over-12-million-devices-smartphone-mi-tv-in-one-month-during-festive-sales-indian-market/#respond Wed, 30 Oct 2019 11:32:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5621 साधारणतः एका महिन्यात संपूर्ण स्मार्ट टीवी इंडस्ट्री मध्ये 4 लाखांपर्यंत स्मार्ट टेलीविजन विकले जातात पण Xiaomi ने फक्त एका महिन्यात 6 लाख टीवी विकले आहेत.

The post एका महिन्यात 120 लाख प्रोडक्ट्स विकून Xiaomi ने केला रेकॉर्ड, 85 लाख स्मार्टफोन्स सह विकले गेले 6 लाख MI TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय बाजारात यशस्वी झाल्यानंतर Xiaomi ची स्पर्धा Samsung शी होती. तसेच गेल्या काही महिन्यांत Realme चे नाव इतक्या वेगाने वर येत आहे कि या ब्रँडला Xiaomi चा प्रतिस्पर्धी म्हटले जात आहे. Realme ने कालच माहिती दिली होती कि साल 2019 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने ग्लोबल मार्केट मध्ये 10 मिलियन म्हणजे 1 कोटी स्मार्टफोन्सची शिपमेंट केली आहे जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 808 टक्के जास्त आहे. तर आज Realme च्या प्रसिद्धीनंतर Xiaomi ने पण घोषणा केली आहे कि ब्रँडने फक्त एका महिन्यात भारतात 12 मिलियन म्हणजे 1.2 कोटी Xiaomi डिवाईस विकून नवीन रेकॉर्ड केला आहे.

Xiaomi ने प्रसिद्धीपत्रक पाठवून आपल्या या नवीन रेकॉर्डची माहिती दिली आहे. Xiaomi ने सांगितले आहे कि सणासुदीच्या निमित्ताने कंपनीने आयोजित केलेल्या फेस्टिवल सेल्स मध्ये ब्रँडचे 12 मिलियन पेक्षा पण जास्त डिवाईस विकले गेले आहेत. Xiaomi चे हे आकडे फक्त एका महिन्याचे आहेत. 28 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर पर्यंत भारतात 120 लाखांपेक्षा पण जास्त Xiaomi प्रोडक्ट्सची विक्री झाली आहे. या प्रोडक्ट्स मध्ये Xiaomi स्मार्टफोन्स सोबत Mi TV, Mi Ecosystem आणि Accessory चा समावेश होता.

40 टक्क्यांची वाढ

Xiaomi नुसार गेल्या एका महिन्यात साल 2018 मध्ये आयोजित फेस्टिवल सेलच्या तुलनेत यावर्षी ब्रँडने भारतात 40 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्यावर्षी याच दिवसांत Xiaomi चे 8.5 मिलियन म्हणजे 85 लाख डिवाईस विकले गेले होते, पण यावर्षीच्या फेस्टिवल सेल मध्ये Xiaomi ने 120 लाखांपेक्षा पण जास्त प्रोडक्ट विकले आहेत. या Xiaomi प्रोडक्ट्सचा सेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइट मी डॉट कॉम सोबत मी होम, फ्लिपकार्ट आणि अमेझॉन तसेच रिटेल स्टोर्स वर झाला आहे.

हे देखील वाचा: जगातील पहिला 108 एमपी कॅमेरा असेलला फोन Xiaomi Mi CC9 Pro, 5 नोव्हेंबरला होईल लॉन्च

85 लाख स्मार्टफोन

Xiaomi नुसार या महिन्याभरात ब्रँडचे 8.5 मिलियन म्हणजे 85 लाखांपेक्षा पण जास्त स्मार्टफोन विकले गेले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी विकले गेलले स्मार्टफोन 37 टक्के जास्त आहेत. याच काळात Redmi Note 7 सीरीज Xiaomi ची सर्वात जास्त विकली जाणारी सीरीज होती तर Redmi 7 आणि Redmi 7A अमेझॉन वर विकले गेलेले बेस्ट बजेट स्मार्टफोन बनले.

6 लाख टीवी

Xiaomi चे स्मार्टफोननेच नाही तर स्मार्टटीवीने पण यूजर्सना आकर्षित केले आहे. शाओमीनुसार यावर्षी आयोजित झालेल्या फेस्टिव सेल मध्ये 6,00,000 Mi TV ची विक्री झाली आहे. हि विक्री गेल्या वर्षी झालेल्या सेल पेक्षा 48 टक्के जास्त आहे. Xiaomi म्हणते आहे कि साधारणतः एका महिन्यात संपूर्ण स्मार्ट टीवी इंडस्ट्री मध्ये 4 लाखांपर्यंत स्मार्ट टेलीविजन विकले जातात पण Xiaomi ने फक्त एका महिन्यात 6 लाख टीवी विकले आहेत.

हे देखील वाचा: फक्त तीन महिन्यात भारतीयांनी विकत घेतले 490 लाख फोन, Xiaomi आहे नंबर वन तर Realme आहे सर्वात वेगवान

तीन महिन्यात विकले गेले 490 लाख फोन

काउंटरप्वाइंटच्या रिपोर्ट नुसार जुलै ते सप्टेंबर महिन्यात भारतात 490 लाख स्मार्टफोन्सचा सेल झाला आहे. या आकड्यांची प्रमुख करणे म्हणजे स्मार्टफोन कंपन्यांनी केलेले नवीन लॉन्च, स्मार्टफोन्स वर देण्यात आलेला डिस्काउंट आणि दिवाळीच्य आधी वेगवेगळ्या शॉपिंग साइट वर आयोजित झालेला सेल असल्याचे बोलले जात आहे. रिपोर्ट नुसार 49 मिलियन यूनिटच्या या विक्रीत एकट्या Xiaomi ने 26 टक्के मार्केट शेयर आपल्या नावे केला आहे. साल 2018 च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत साल 2019 च्या तिसऱ्या तिमाहीत Xiaomi ने 7 टक्क्यांची वाढ केली आहे.

The post एका महिन्यात 120 लाख प्रोडक्ट्स विकून Xiaomi ने केला रेकॉर्ड, 85 लाख स्मार्टफोन्स सह विकले गेले 6 लाख MI TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-sold-over-12-million-devices-smartphone-mi-tv-in-one-month-during-festive-sales-indian-market/feed/ 0
पुन्हा सुरु होत आहे शाओमी ‘मी फेस्टिवल’, 1 रुपायात मिळेल रेडमी नोट 7 प्रो आणि मी एलईडी टीवी https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-festival-2019-redmi-note-7-pro-mi-phone-poco-tv-price-cut-offer-discount/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-festival-2019-redmi-note-7-pro-mi-phone-poco-tv-price-cut-offer-discount/#respond Mon, 01 Apr 2019 15:11:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3987 शाओमी मी फेस्टिवल मध्ये मी पे ने पेमेंट करणाऱ्या शाओमी यूजर्सना मी टीवी आणि रेडमी नोट 7 फ्री मध्ये मिळवण्याची संधी पण मिळेल

The post पुन्हा सुरु होत आहे शाओमी ‘मी फेस्टिवल’, 1 रुपायात मिळेल रेडमी नोट 7 प्रो आणि मी एलईडी टीवी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड बनली आहे शाओमी. शाओमीची फॅन फॉलोइंग इंडियन स्मार्टफोन यूजर्स मध्ये जितकी आहे तितकी क्वचितच एखाद्या ब्रँडची असेल. शाओमीचा जवळपास प्रत्येक प्रोडक्ट देसाहत रेकॉर्ड विक्री करतो, मग स्मार्टफोन असो ​स्मार्टटीवी असो किंवा स्मार्ट बँड. शाओमी पण आपल्या फॅन्सची खास काळजी घेते. आणि त्यासाठीच कंपनी दरवर्षी ‘मी फेस्टिवल’ चे आयोजन करते. आपल्या फॅन्ससाठी पुन्हा एकदा आकर्षक ऑफर्स आणि शानदार डील्स घेऊन येत शाओमी ने ‘मी फेस्टिवल’ ची सुरवात केली आहे. या मेगा सेल अंतर्गत फक्त शाओमी प्रोडक्ट स्वस्तात आणि भरपूर डिस्काउंट वर मिळत नाहीत तर सोबत लकी शाओमी फॅन्सना शाओमी डिवाईस 1 रुपयात मिळवण्याची संधी पण मिळेल.

‘शाओमी मी फेस्टिवल’
शाओमी ने आज ‘मी फेस्टिवल’ च्या आयोजनाची अधिकृत घोषणा केली आहे. प्रेस रिलीज पाठवून शाओमी ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 4 एप्रिलला ‘मी फेस्टिवल’ सुरु होईल. शाओमी मी फेस्टिवल तीन दिवसांसाठी आयोजित होईल जो 6 एप्रिल पर्यंत चालेल. शाओमी मी फेस्टिवलचे आयोजन मी डॉट काम वर केले जाईल, सोबत शाओमी प्रोडक्ट्स आर्कषक ऑफर व डिस्काउंट वर मी होम, मी स्टोर्स व आफलाईन स्टोर्स वरून पण विकत घेता येतील. चला एक नजर टाकू मी फेस्टिवल मध्ये मिळणाऱ्या स्वस्त प्रोडक्ट्स वर.

1 रुपयात फ्लॅश सेल
शाओमी मी फेस्टिवल मध्ये ‘1 रुपया फ्लॅश सेल’ चे आयोजन पण केले जाईल. तिन्ही दिवशी म्हणजे 4, 5 आणि एप्रिलला दुपारी दोन वाजता हा अनोखा सेल सुरु होईल. 1 रुपये फ्लॅश सेल मध्ये शाओमीचे वेगवेगळे प्रोडक्ट्स जसे कि रेडमी नोट 7 प्रो, पोको एफ1, मी साउंडबार, मी एलईडी टीवी 4ए प्रो (32) सारखे अनेक स्मार्टफोन व गॅजेट्स फक्त 1 रुपयात मिळवण्याची संधी मिळेल. तसेच सेल मध्ये ‘मिस्ट्री बॉक्स’ पण विकले जातील. या बॉक्स मध्ये 2400 रुपयांपर्यंतचे सामान असेल पण 99 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा मिस्ट्री बॉक्स सेल रोज 4 वाजता सुरु होईल.

हे देखील वाचा: शाओमी घेऊन येत आहे अनोखा फोन, बॉटमला असतील दोन सेल्फी कॅमेरे

इतका मिळेल डिस्काउंट
शाओमी ने सांगितले आहे कि मी फेस्टिवल मध्ये पोको एफ1 चा 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरिएंट 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच रेडमी नोट 5 प्रो चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 10,999 रुपये आणि 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. शाओमी नुसार मी फेस्टिवल मध्ये रेडमी नोट 6 प्रो वर 5,000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल आणि फोनचा 4जीबी रॅम वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. मी फेस्टिवल मध्ये शाओमीचा मी एलईडी टीवी 4 प्रो चा 55इंच मॉडेल 45,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

बँक ऑफर्स
शाओमी मी फेस्टिवल मध्ये कंपनी द्वारा दिल्या जाणाऱ्या ऑफर्स आणि डिस्काउंट व्यतिरिक्त वेगवेगळ्या बँकेच्या कार्ड वरून शॉपिंग केल्यास पण लोकांचा फायदा होईल. मी फेस्टिवल मध्ये एचडीएफसी बँक कार्ड वरून शॉपिंग केल्यास 5 टक्क्यांची ​अतिरिक्त सूट मिळेल. तसेच मी एलईडी टीवी, मी साउंड बार आणि शाओमी स्मार्टफोन्स ईएमआई वर पण विकत घेता येतील.

हे देखील वाचा: खुशखबर : 4जीबी रॅम असलेला रियलमी यू1 झाला 1500 रुपयांनी स्वस्त, किंमत फक्त 9,999 रुपयांपासून सुरु

त्याचबरोबर मोबि​क्विकने पेमेंट केल्यास 15 टक्क्यांचा फ्लॅट डिस्काउंट मिळेल​ ज्यात 2000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक पण मिळेल. शाओमी मी फेस्टिवल मध्ये मी पे ने पेमेंट करणाऱ्या शाओमी यूजर्सना मी टीवी आणि रेडमी नोट 7 फ्री मध्ये मिळवण्याची संधी पण मिळेल.
शाओमी मी फेस्टिवल मध्ये सहभागी होण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post पुन्हा सुरु होत आहे शाओमी ‘मी फेस्टिवल’, 1 रुपायात मिळेल रेडमी नोट 7 प्रो आणि मी एलईडी टीवी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-festival-2019-redmi-note-7-pro-mi-phone-poco-tv-price-cut-offer-discount/feed/ 0