iQOO Z6X - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 26 Aug 2022 06:30:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.5 6,000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह आला iQOO Z6X 5G; कमी किंमतीत 8GB RAM सह 144Hz डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/6000-mah-battery-phone-iqoo-z6x-5g-launched-with-dimensity-810-know-price-specification-details/ https://www.91mobiles.com/marathi/6000-mah-battery-phone-iqoo-z6x-5g-launched-with-dimensity-810-know-price-specification-details/#respond Fri, 26 Aug 2022 06:30:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12512 iQOO लवकरच भारतात आपली ‘झेड6 सीरीज’ चा विस्तार करणार असल्याची चर्चा आहे आणि यात iQOO Z6X किंवा Z6 Lite स्मार्टफोन लाँच केले जातील. कंपनीनं अजूनतरी या मोबाइल फोनबद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु भारतात पदार्पण करण्याआधी स्मार्टफोन आयकू झेड 6 एक्स कंपनीच्या होम मार्केट चीनमध्ये लाँच झाला आहे. iQOO Z6X स्मार्टफोन 144Hz Display, 8GB RAM, […]

The post 6,000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह आला iQOO Z6X 5G; कमी किंमतीत 8GB RAM सह 144Hz डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iQOO लवकरच भारतात आपली ‘झेड6 सीरीज’ चा विस्तार करणार असल्याची चर्चा आहे आणि यात iQOO Z6X किंवा Z6 Lite स्मार्टफोन लाँच केले जातील. कंपनीनं अजूनतरी या मोबाइल फोनबद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु भारतात पदार्पण करण्याआधी स्मार्टफोन आयकू झेड 6 एक्स कंपनीच्या होम मार्केट चीनमध्ये लाँच झाला आहे. iQOO Z6X स्मार्टफोन 144Hz Display, 8GB RAM, MediaTek Dimensity 810 चिपसेट आणि 6000mAh Battery ला सपोर्ट करतो.

iQOO Z6x 5G चे स्पेसिफिकेशन्स

आयकू झेड6एक्स स्मार्टफोन कंपनीनं 20ः9 अस्पेक्ट रेशियोवर सादर केला आहे जो 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 144हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हे देखील वाचा: स्वस्तात 12GB रॅम असलेला फोन हवा? दोन-दोन बॅटरी सेलसह होणार iQOO Z6 ची एंट्री, इतकी असेल किंमत

हा फोन अँड्रॉइड 11 ओएस आधारित ओरिजन ओएस ओशियनसह लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालणारा ऑक्टाकोर प्रोसेसर तसेच 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेन्सिटी 810 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन माली-जी57 जीपीयूला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी आयकू झेड 6एक्स मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या मॅक्रो लेन्ससह येतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा आयकू मोबाइल एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

iQOO Z6x ड्युअल सिम फोन आहे जो 5जी व 4जी दोन्ही नेटवर्कवर चालतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएचच्या शक्तिशाली बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 2,099 मध्ये स्वस्त 4G फिचर फोन itel Magic X लाँच; Jio Phone होणार बाजारातून हद्दपार?

iQOO Z6x 5G ची किंमत

आयकू झेड 6एक्स तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत CNY 1,199 (जवळपास 14,000 रुपये) आहे. तसेच iQOO Z6x 8GB + 128GB व्हेरिएंट CNY 1,399 (जवळपास 16,300 रुपये) आणि iQOO Z6x 8GB + 256GB व्हेरिएंट CNY 1,599 (जवळपास रुपये 18,600 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. हा फोन Black, Blue आणि Orange कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची अधिकृत माहिती समोर आली नाही.

The post 6,000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह आला iQOO Z6X 5G; कमी किंमतीत 8GB RAM सह 144Hz डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/6000-mah-battery-phone-iqoo-z6x-5g-launched-with-dimensity-810-know-price-specification-details/feed/ 0