HTC U12 Life - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 30 Aug 2018 11:54:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.5 6जीबी रॅम आणि 6-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला एचटीसी चा पावरफुल फोन यू12 लाइफ https://www.91mobiles.com/marathi/htc-u12-life-official-with-6gb-ram-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/htc-u12-life-official-with-6gb-ram-specifications-price-in-marathi/#respond Thu, 30 Aug 2018 11:51:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1872 या फोनची अंर्तराष्ट्रीय किंमत 27,700 रुपयांच्या आसपास आहे जो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आशियातील देशांत लॉन्च केला जाईल.

The post 6जीबी रॅम आणि 6-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला एचटीसी चा पावरफुल फोन यू12 लाइफ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एचटीसी च्या यू सीरीज ने आधीच टेक बाजारात पाय रोवले आहेत. आज कंपनी ने आपल्या या सीरीज मध्ये अजून एक स्मार्टफोन आणला आहे. एचटीसी ने ग्लोबल मंचावरून यू12 लाइफ स्मार्टफोन सादर केला आहे. या फोनची अंर्तराष्ट्रीय किंमत 27,700 रुपयांच्या आसपास आहे जो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आशियातील देशांत लॉन्च केला जाईल. एचटीसी यू12 लाइफ इंडिया मध्ये कधी लॉन्च होईल याची माहिती कंपनी ने दिली नाही पण आशा आहे की येत्या काही दिवसांत एचटीसी याची घोषणा करू शकते.

एचटीसी यू12 लाइफ कंपनी ने मे महिन्यात लॉन्च केलेल्या यू12 प्लस स्मार्टफोन चा छोटा वर्जन आहे. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन मेटल आणि ग्लास डिजाईन वर बनलेला आहे. फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6-इंचाचा फुलएचडी+ बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. कंपनी ने फोन एचटीसी सेंस टेक्नोलॉजी सह बाजारात आणला आहे.

यू12 लाइफ दोन वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. एक वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा वेरिएंट 6जीबी रॅम सह 128जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सोबत 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यू12 लाइफ च्या फ्रंट पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

एचटीसी यू12 लाइफ 4जी एलटीई ला सपोर्ट करतो तसेच यात वाईफाई, एनएफसी, यूएसबी टाइप सी आणि 3.5एमएम जॅक सारखे आॅप्शन्स आहेत. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,600एमएएच ची बॅटरी आहे. एचटीसी यू12 लाइफ कंपनी ने मूनलाईट ब्लू आणि ट्वाईलाइट पर्पल कलर मध्ये लॉन्च केला आहे. फोन च्या इंडिया लॉन्च साठी कंपनी च्या ​आॅफिशियल घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post 6जीबी रॅम आणि 6-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला एचटीसी चा पावरफुल फोन यू12 लाइफ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/htc-u12-life-official-with-6gb-ram-specifications-price-in-marathi/feed/ 0