भारतात बनणारे स्मार्टफोन महागणार! सरकारच्या निर्णयामुळे Made in India मोबाइल्सना फटका

गेली दोन वर्ष स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये अनेक चढ उतार पाहायला मिळाले आहेत. Mobile Phone लाँचची संख्या वाढली आहे परंतु त्याचबरोबर स्मार्टफोन्सच्या किंमती देखील वाढल्या आहेत. भारतीय मोबाइल युजर्स स्मार्टफोन्सच्या किंमती वाढल्यामुळे नाराज तर आहेत परंतु ही नाराजी अजून वाढणार आहे. कारण आता पुन्हा एकदा भारतात स्मार्टफोन्स महागणार असल्याची बातमी आली आहे आणि यात Made in India मोबाइल फोन्सवर सर्वाधिक परिणाम होणार आहे.

Smartphone price in India

भारतात पुन्हा एकदा स्मार्टफोन्सच्या किंमती वाढणार आहेत. पीटीआयच्या हवाल्याने बातमी आली आहे की भारतात स्मार्टफोन्सच्या किंमती वाढू शकतात. ही वाढ Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) द्वारे जारी करण्यात आलेल्या एका आदेशामुळे होऊ शकते, ज्यात custom duty चार्ज वाढवण्याचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे ही कस्टम ड्यूटी मोबाइलवरील नव्हे तर स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध पार्ट्सवर लावण्यात येईल.

या आदेशानुसार मोबाइल फोन्समध्ये वापरण्यात येणाऱ्या कम्पोनेंट्सवर कस्टम ड्यूटी लागू केली जाऊ शकते. Smartphone display तसेच back frames वर 10 टक्क्यांची वाढ होऊ शकते तसेच antenna pins, power buttons व अन्य अ‍ॅक्सेसरीजवर लागणारी कस्टम ड्यूटी 5 अजून टक्क्यांनी वाढू शकते. म्हणजे एकूण मिलाकर कस्टम ड्यूटीमध्ये 15 टक्क्यांची वृद्धी दिसू शकते.

Made in India Mobile महागणार

Apex indirect tax of India च्या ऑर्डरनुसार सर्वात जास्त फटका Made in India स्मार्टफोन्सना बसणार आहे. असे फोन निर्माता जे बाहेरच्या देशांमधून मोबाइल फोन्सचे पार्ट्स आयात करून ते भारतात असेंबल करतात, त्यांच्यावर सर्वाधिक भार पडेल. स्मार्टफोन्समध्ये वापरण्यात येणारे घटकांसाठी मॅन्युफॅक्चररला जास्त किंमत द्यावी लागेल त्यामुळे फोन बनवण्याचा खर्च वाढेल. परिणामी मोबाइल ब्रँड आपले स्मार्टफोन जास्त किंमतीत विकण्यास सुरु करतील.

या मोबाइल पार्ट्सवर द्यावा लागेल अतिरिक्त शुल्क

CBIC नुसार स्मार्टफोन डिस्प्लेमध्ये फिट होणाऱ्या Sim tray, antenna pin, speaker net, power key, slider switch, battery compartment, volume Flexible Printed Circuits (FPCs), power, sensors, speakers, fingerprint तसे metal व plastic back support frame वर 15 टक्क्यांची ड्यूटी लागेल.

डिस्प्ले असेंबलीसाठी touch panel, cover glass, brightness enhancement film, indicator guide light, reflector, LED blacklight, polarizers आणि LCD Driver mounted on a flible Printed Circuit ची आवश्यकता असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here