Exclusive: आता Samsung Galaxy Tab M62 घेऊन येण्याची तयारी करत आहे कंपनी, जाणून घ्या कधी लॉन्च होईल हा टॅबलेट

गेल्या वर्षी 2019 मध्ये Samsung ने आपल्या M सीरीजच्या फोन्सची सुरवात केली होती लेकिन 2020 मध्ये हे फोन्स खूप यशस्वी झाले होते आणि मिड सेग्मेंट मध्ये कंपनीला एक नवीन ओळख दिली. गॅलेक्सी एम सीरीजच्या या यशानंतर कंपनी या सीरीज मध्ये नवीन टॅबलेट आणण्याची योजना बनवत आहे. 91mobiles ला याबाबत एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे. बातमी अशी आहे कि कंपनी M Series च्या नवीन टॅबलेट वर काम करत आहे आणि याअंतर्गत पहिला मॉडेल Samsung Galaxy Tab M62 लॉन्च केला जाईल. या टॅबलेटच्या स्पेसिफिकेशन बाबत सध्या कोणतीही माहिती मिळाली नाही पण बोलले जात आहे कि कॉम्पॅक्ट डिजाइन मध्ये येईल. हा मोठी स्क्रीन असलेला टॅबलेट सध्या नसेल.

विशेष म्हणजे कोरोनामुळे लॉकडाउन नंतर वर्क फ्रॉम होमची मागणी वाढली आहे आणि डिजिटल एज्युकेशनने पण खूप जोर पकडला आहे. आतापर्यंत शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस उघडले नाहीत आणि ऑनलाइनच अभ्यास केला जात आहे. त्यामुळे मोठी स्क्रीन असलेले डिवाइस किंवा असे म्हणूया कि टॅबलेटची मागणी खूप जास्त आहे त्यामुळे सॅसमंगची योजना योग्य आहे असे म्हणता येईल.

हे देखील वाचा : Samsung Galaxy S21 सीरीज 14 जानेवारीला होईल लाॅन्च, 29 जानेवारी पासून सुरु होईल भारतात सेल

राहिला प्रश्न किंमतीचा तर Tablet चे स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती सध्या मिळाली नाही पण एवढे मात्र माहित आहे कि एम सीरीजचे डिवाइस मिड सेग्मेंट मध्ये येतात त्यामुळे Samsung Galaxy Tab M62 कंपनीचा एम सीरीज अंतगर्त पहिला टॅबलेट असेल आणि टॅब पण कंपनी मिड बजेट मध्ये सादर करू शकते.

टॅबलेटच्या लॉन्च बद्दल बोलायचे झाले तर सध्या अधिकृतपणे कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही पण 91मोबाईल्सकडे जी बातमी आहे त्यानुसार हा सुरवातीचा काळ आहे आणि अजून खूप डेवलपमेंट बाकी आहे. त्यामुळे हा लॉन्च होण्यास खूप वेळ लागू शकतो. कदाचित कंपनी हा मार्च किंवा एप्रिल पर्यंत सादर करेल.

हे देखील वाचा : Nokia घेऊन येत आहे स्वस्त एंडराॅयड ‘गो’ स्मार्टफोन, 15 डिसेंबरला होईल लाॅन्च

2021 साठी काय आहे तयारी

2020 सॅमसंगसाठी खूप चांगला होता आणि यात खास करून गॅलेक्सी एम सीरीजचे योगदान जास्त होते. सॅमसंग हेच पुढे चालू ठेवेल. नवीन वर्षात सर्वप्रथम Samsung Galaxy S21 कंपनी लॉन्च करणार आहे आणि या फोन बद्दल खूप लीक पण आले आहेत. तसेच सॅमसंग द्वारे एम सीरीज मध्ये पण अनेक मॉडेल आणण्याचा प्लान आहे. यात Galaxy M12 आणि Gaalaxy M42 सारखी नावे प्रामुख्याने येत आहेत. तसेच ए सीरीज मध्ये Galaxy A72 ची खूप चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्सनेच बातमी दिली होती कि कंपनी आपली ई सीरीज पुन्हा लॉन्च करण्याचा प्लान करत आहे आणि याअंतर्गत पहिला फोन सॅमसंग Galaxy E62 लॉन्च केला जाऊ शकतो. हा फोन कंपनी Galaxy F62 नावाने पण लॉन्च करेल असे पण होऊ शकते. या फोन बाबत अशी माहिती आहे कि हा कंपनीचा एक स्लिम फोन असेल जो मोठ्या स्क्रिन सह मोठ्या बॅटरी मध्ये उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here