Home बातम्या लोकांच्या नजारा ‘वळतील’ असा फोन! Samsung ने लाँच केला फोल्डेबल फोन Galaxy Z Flip 4

लोकांच्या नजारा ‘वळतील’ असा फोन! Samsung ने लाँच केला फोल्डेबल फोन Galaxy Z Flip 4

Samsung नं आपल्या अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन करत काल आपले दोन फोल्डेबल मोबाइल फोन Samsung Galaxy Z Flip4 आणि Samsung Galaxy Z Fold4 लाँच केले आहेत. जागतिक बाजारात लाँच झालेले हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय बाजारात देखील ऑफिशियल झाले आहेत. हे दोन्ही मोबाइल फोन शानदार इनोवेशन आणि अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचं प्रतीक आहेत. . सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप4 च्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

Samsung Galaxy Z Flip 4 चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Z Flip 4 Design Display

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 4 सारखी विलक्षण डिजाईन कुठेही मिळणार नाही. या स्मार्टफोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्यात आहेत. एक फोन अनफोल्ड केल्यावर दिसते आणि दुसरी कायम वर असते. सेकंडरी डिस्प्लेवर नोटिफिकेशन्स, टाईम, कॅलेंडर इत्यादी बघता येतात.

Galaxy Z Flip4 ची मेन स्क्रीन 6.7 इंचाचा डायनॅमिक अ‍ॅमोलेड 2एक्स फ्लॅक्स डिस्प्ले आहे जो फुलएचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. तसेच फोनमध्ये 1.9 इंचाचा सेकंडरी सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन IPX8 रेटिंगसह बाजारात आला आहे.

Samsung Galaxy Z Flip 4 Camera

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy Z Flip4 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या मागे दोन 12 मेगापिक्सल सेन्सर देण्यात आले आहेत. प्रायमरी रियर कॅमेरा एक 12MP Ultra Wide Lens आहे जो एफ/2.2 अपर्चरसह येतो. तर एफ/1.8 अपर्चर असलेला 12MP Wide-angle सेन्सर देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 10 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा सेन्सरला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy Z Flip 4 Processor And OS

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 4 लेटेस्ट अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच झाला आहे जो सॅमसंगच्या वनयुआय 4.1.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जोडीला 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार करण्यात आलेला Qualcomm Snapdragon 8+ Gen1 चिपसेट आहे. हा मोबाइल फोन 5G, 4G LTE, Wi-Fi आणि Bluetooth v5.2 ला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy Z Flip 4 Battery

हा फोल्डेबल सॅमसंग स्मार्टफोन जितका स्टायलिश स्टायलिश आणि स्लीक दिसतो. तितकी पावरफुल बॅटरी देखील देण्यात आली आहे. बॅटरीमुळे फोनची जाडीवर फरक पडला नाही. सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप4 फोन 3,700एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात आली आहे.