सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज भारतात झाली लॉन्च, बघा सर्व मॉडेल्सची किंमत आणि कधी होईल सेल

सॅमसंग ने गेल्याच महिन्यात आपली बहूप्रतिक्षीत स्मार्टफोन सीरीज ‘गॅलेक्सी एस10’ सीरीज जागतिक टेक मंचावर सादर केली होती. हि सीरीज सादर करत सॅमसंग ने एक साथ तीन नवीन फोन गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 प्लस आणि गॅलेक्सी एस10ई सादर केले होते. इंटरनेशनल लॉन्च नंतर काही दिवसांनी सॅमसंग ने घोषणा केली होती कि हे तिन्ही स्मार्टफोन भारतातात येतील. गॅलेक्सी एस10 सीरीजचे तिन्ही मॉडेल आधीच देशात प्री-बुकिंग साठी उपलब्ध झाले होते तर सॅमसंग ने आपल्या फॅन्सची प्रतीक्षा संपवत आज गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 प्लस आणि गॅलेक्सी एस10ई भारतात लॉन्च केले आहेत.

सॅमसंग इंडिया ने राष्ट्रीय राजधानीत ईवेंट मधून गॅलेक्सी एस10 सीरीज भारतीय बाजारात आणली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10ई आणि गॅलेक्सी एस10 प्लस चे सर्व वेरिएंट्स भारतात 8 मार्च पासूनच सेल साठी उपलब्ध होतील. हे तिन्ही स्मार्टफोन मॉडेल्स वेगवेगळ्या आर्कषक ऑफर्स सह ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट सह शॉपिंग साइट फ्लिपकार्ट व अमेजन वरून विकत घेता येतील. तसेच ऑफलाईन प्लॅटफॉर्म वर सॅमसंग रजिस्ट्रर्ड रिटेल स्टोर्स वरून हे तिन्ही स्मार्टफोन मॉडेल्स विकत घेता येतील.

गॅलेक्सी एस10 सीरीजच्या किंमती

गॅलेक्सी एस10ई
6जीबी रॅम / 128जीबी मेमरी = 55,900 रुपये

गॅलेक्सी एस10 प्लस
8जीबी रॅम / 128जीबी मेमरी = 66,900 रुपये
8जीबी रॅम / 512जीबी मेमरी = 84,900 रुपये

गॅलेक्सी एस10 प्लस
8जीबी रॅम / 128जीबी मेमरी = 73,900 रुपये
8जीबी रॅम / 512जीबी मेमरी = 91,900 रुपये
12जीबी रॅम / 1टीबी मेमरी = 1,17,900 रुपये

सॅमसंगच्या गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10+ आणि गॅलेक्सी एस10ई चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले

सॅमसंग ने आपले तिन्ही स्मार्टफोन्स 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केले आहेत तसेच हे फोन इनफिनिटी ओ ​डिस्प्लेला सपोर्ट करतात. डिस्प्ले साईज आणि रेज्ल्यूशन पाहता..

गॅलेक्सी एस10 प्लस मध्ये 6.4-इंचाचा क्यूएचडी प्लस कर्व्ड डायनामाइक एमोलेड पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे.
गॅलेक्सी एस10 6.1-इंचाच्या क्वॉडएचडी प्लस कर्व्ड डायनामाइक एमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो.
गॅलेक्सी एस10 5.8-इंचाच्या फुलएचडी+ फ्लॅट डायनामाइक एमोलेड पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे.

विशेष म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एस10 आणि एस10 प्लस चा फ्रंट पॅनल कंपनी ने गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केला आहे. या दोन्ही स्मार्टफोनचा बॅक पॅनल गोरिल्ला ग्लास 5 ने सुसज्ज आहे. अशाचप्रकारे गॅलेक्सी एस10ई च्या फ्रंट व बॅक पॅनलला कंपनी ने गोरिल्ला ग्लास 5 ची मजबूती दिली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस10ई चा डिस्प्ले 438 पीपीआई ला सपोर्ट करतो. गॅलेक्सी एस10 चा ​डिस्प्ले 550 पीपीआई तर गॅलेक्सी एस10 प्लस चा डिस्प्ले 522 पीपीआई ला सपोर्ट करतो. इथे पीपीआई म्हणजे (पिक्सल पर इंच) आहे.

कॅमेरा सेटअप

सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज आपल्या डिजाईन व डिस्प्ले सोबत फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये पण खूप खास आहे. एकीकडे तिन्ही फोन मध्ये कॅमेरा प्लेसमेंट खूप वेगळ्या स्टाईल मध्ये करण्यात आली आहे त्याचबरोबर कॅमेरा सेंसरची पावर आणि फीचर पण शानदार आहेत.

गॅलेक्सी एस10 प्लसच्या फ्रंट पॅनल वर दोन पंच-होल आहेत ज्यात दोन सेल्फी कॅमेरा आहेत. यात एफ/1.9 अपर्चर वाला 10-मेगापिक्सलचा प्राइमरी सेल्फी तर एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी आरजीबी डेफ्थ सेंसिंग सेंसर देण्यात आला आहे.

गॅलेक्सी एस10 सिंगल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या पंच-होल मध्ये एफ/1.9 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

गॅलेक्सी एस10ई मध्ये सेल्फी साठी 10-मेगापिक्सलचा पंच-होल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस च्या बॅक पॅनल वर 3 कॅमेरा सेंसर आहेत. तिथे 12-मेगापिक्सलचा वेरिएबल अपर्चर वाला प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. हा सेंसर एफ/1.5 पासून एफ/2.4 अपर्चर पर्यंत सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे एफ/2.4 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा तिसरा सेंसर देण्यात आला आहे. या फोनचा रियर कॅमेरा सेटअप 2एक्स ऑप्टिकल आणि 10 एक्स डिजीटल झूम सोबत वाइड एंगल आणि ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सारख्या फीचर्सला सपोर्ट करतो.

तसेच गॅलेक्सी एस10ई डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सलचा प्राइमरी तसेच 16-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

बॅटरी

दमदार प्रोसे​सिंग कायम ठेवण्यासाठी सॅमसंग ने आपल्या गॅलेक्सी एस10 सीरीजच्या तिन्ही स्मार्टफोन्सना फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने सुसज्ज केले आहे. या तिन्ही फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. सोबतच गॅलेक्सी एस10 सीरीजचे तिन्ही फोन वायरलेस चार्जिंगला पण सपोर्ट करतात.

गॅलेक्सी एस10+ कंपनी ने 4,100एमएएच च्या बॅटरी वर लॉन्च केला आहे.
गॅलेक्सी एस10 स्मार्टफोन 3,400एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.
गॅलेक्सी एस10ई मध्ये पावर बॅकअप साठी 3,100एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

रॅम व मेमरी

सॅमसंग ने गॅलेक्सी एस10 सीरीजचे तिन्ही स्मार्टफोन्स एकापेक्षा जास्त रॅम व स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केले आहेत. चला एक नजर टाकूया..

गॅलेक्सी एस10 स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन 8जीबी रॅमला सपोर्ट करतो ज्यासोबत एक वेरिएंट मध्ये 128जीबी इंटरनल मेमरी तसेच दुसऱ्या मध्ये 512जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

गॅलेक्सी एस10+ दोन रॅम सह तीन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये सादर झाला आहे. हा फोन 8जीबी रॅम आणि 12जीबी रॅमला सपोर्ट करतो. स्टोरेज बद्दल बोलायचे तर हा 128जीबी, 512जीबी तसेच 1टीबी स्टोरेज सह लॉन्च केला गेला आहे.

गॅलेक्सी एस10ई सॅमसंग ने 6जीबी रॅम सह 128जीबी मेमरी तसेच 8जीबी रॅम सह 512जीबी मेमरी वर लॉन्च केला आहे.

विशेष म्हणजे सॅमसंग ने गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10 प्लस आणि गॅलेक्सी एस10ई कंपनीच्या एक्सनॉस 9820 चिपसेट वर सादर केले गेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here