Samsung Galaxy S10 Lite चे फुल स्पेसिफिकेशन लीक, फोन असेल स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट, 4500mAh बॅटरी आणि 32MP सेल्फी कॅमेरा

91मोबाईल्सने काही दिवसांपूर्वी अशी माहिती दिली होती कि टेक कंपनी सॅमसंग जानेवारी मध्ये आपला नवीन स्मार्टफोन डिवाईस Samsung Galaxy S10 Lite आणि Galaxy Note 10 Lite लॉन्च करेल. Samsung ने आता पर्यंत या फोन्सचे लॉन्च डिटेल व स्पेसिफिकेशन्स सांगितले नाही पण हे स्मार्टफोन्स वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्स व बेंचमार्किंग साइट वर लिस्ट झाले आहेत. तसेच आता फोनच्या बाजारात येण्याआधी यातील एका Samsung Galaxy S10 Lite चे स्पेसिफिकेशन्स इंटरनेट वर वायरल झाले आहेत ज्यामुळे फोन लॉन्चच्या आधीच Galaxy S10 Lite ची संपूर्ण माहिती समोर आली आहे.

Samsung Galaxy S10 Lite संबंधित हि मोठी बातमी विनफ्यूचर वेबसाइटने प्रसिद्ध केली आहे. आपल्या रिपोर्ट मध्ये वेबसाइटने स्पष्ट केले आहे कि त्यांनी शेयर केलेले Samsung Galaxy S10 Lite चे स्पेसिफिकेशन्स फोनच्या यूरोपियन मॉडेलचे आहेत. त्यामुळे समोर आलेले Galaxy S10 Lite चे स्पेसिफिकेशन्स भारतात लॉन्च होणाऱ्या Galaxy S10 Lite मॉडेल पेक्षा थोडे वेगळे असू शकतात.

Samsung Galaxy S10 Lite

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता मीडिया रिपोर्टनुसार Samsung ने Galaxy S10 Lite स्मार्टफोन 19.5:5 आस्पेक्ट रेशियो असलेल्या पंच-होल डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. फोनचा डिस्प्ले पूर्णपणे बेजल लेस असेल तसेच स्क्रीनच्या वर सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल दिला जाईल. रिपोर्टनुसार या स्मार्टफोन मध्ये 2,400X 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.7 इंचाचा एमोलेड डिस्प्ले मिळेल.

Galaxy S10 Lite या रिपोर्ट मध्ये वन यूआई 2.0 आधारित एंडरॉयड 10 ओएस सह येईल. तसेच रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट सह लॉन्च केला जाईल. स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट Galaxy S10 Lite च्या यूरोपियन मॉडेल मध्ये असेल. त्यामुळे कदाचित इंडियन मार्केट मध्ये Samsung Galaxy S10 Lite मध्ये एक्सनॉस चिपसेट मिळण्याची शक्यता आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 640 जीपीयू असल्याचे समोर आले आहे.

Samsung Galaxy S10 Lite च्या या मीडिया रिपोर्ट मध्ये 8जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज दाखवण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डने 1टीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy S10 Lite क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च होईल. हा कॅमेरा सेटअप L-शेपचा असले जो फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वर दिला जाईल. या कॅमेरा सेटअप मध्ये चार सेंसर्स सह एक फ्लॅश लाईट पण असेल.

रिपोर्टनुसार Galaxy S10 Lite 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल. त्याचबरोबर फोनच्या बॅक पॅनल वर 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एक टीओएफ सेंसर दिला जाईल. तसेच सेल्फी साठी Samsung Galaxy S10 Lite मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन मध्ये 45वॉट सुपर फास्ट चार्जिंग 2.0 टेक्नॉलॉजी असलेली 4500एमएएच ची बॅटरी दिली जाईल. Samsung Galaxy S10 Lite या रिपोर्ट मध्ये ब्लॅक, ब्लू आणि व्हाईट कलर मध्ये दाखवण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत सॅमसंग स्वतः फोन संबंधित कोणती घोषणा करत नाही तोपर्यंत समोर आलेले स्पेसिफिकेशन्स फक्त लीक म्हणता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here