Samsung Galaxy S10 Lite, Note 10 Lite, A71 आणि A51 ची किंमत झाली लीक, येतील लवकरच

Samsung वियतनाम मध्ये 12 डिसेंबरला एक लॉन्च इवेंटचे आयोजन करणार आहे. या इवेंट मध्ये Galaxy A 2020 सीरीज सादर होईल. पण A सीरीज मध्ये कोणते फोन्स सादर केले जातील याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पण असे बोलले जात आहे कि कंपनी Samsung Galaxy A51 या इवेंट मध्ये सादर करू शकते. तसेच आता Galaxy A51 ची किंमत समोर आली आहे.

अधिकृत लॉन्चच्या आधी Galaxy A51 च्या किंमतींव्यतिरिक्त Samsung Galaxy S10 Lite, Galaxy Note 10 Lite आणि Galaxy A71 ची किंमत पण समोर आली आहे. Slovakian नावाच्या रिटेलरने नवीन गॅलेक्सी सीरीज फोनच्या किंमती सांगितल्या आहेत.

आशा आहे कि Samsung लवकरच लेटेस्ट मॉडेल सादर करेल. 91मोबाईल्सने माहिती दिली होती कि कंपनी मिड जानेवारी मध्ये गॅलेक्सी एस10 लाइट आणि नोट 10 लाइट सादर करू शकते. तसेच दुसऱ्या रिपोर्ट्स नुसार नवीन सॅमसंग फोन (Galaxy A51) Christmas 2019 नंतर 27 डिसेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो.

लीकनुसार अशी असेल किंमत

लीकनुसार Galaxy A51 ची किंमत 375 यूरो (जवळपास 29,500 रुपये), Galaxy A71 ची किंमत 469 यूरो (जवळपास 37,000 रुपये), Galaxy Note 10 Lite ची किंमत 609 यूरो (जवळपास 47,900 रुपये) आणि Galaxy S10 Lite ची किंमत 669 यूरो (जवळपास 52,600 रुपये) असेल.

कंपनीने अजूनपर्यंत अधिकृतपणे गॅलेक्सी एस10 लाइट, गॅलेक्सी नोट 10 लाइट, गॅलेक्सी ए71 आणि गॅलेक्सी ए51 च्या लॉन्चची घोषणा केली नाही. पण आशा कि कंपनी वियतनाम मध्ये 12 डिसेंबरला Galaxy A51 सादर करू शकते.

Samsung Galaxy A51 स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A51 चे स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार हा फोन 6.5 इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळू शकतो. चर्चा अशी आहे कि हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला जाईल जो वनयूआई 2.0 आधारित असेल. तसेच प्रोसेसिंग साठी Galaxy A51 मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट मिळेल.

Galaxy A51 च्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा असू शकतो. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 12 मेगापिक्सलची वाईड एंगल लेंस, 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर दिला जाऊ शकतो. रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला आहे कि हा स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. Samsung Galaxy A51 4,000 एमएमएच च्या पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here