Samsung Galaxy S10 Lite आणि Galaxy Note 10 Lite ला मिळाले ब्लूटूथ सर्टिफिकेशन, पुढ्याच्या वर्षी होतील लॉन्च

Samsung Galaxy S10 Lite आणि Galaxy Note 10 Lite च्या लॉन्चिंग बद्दल अलीकडेच 91मोबाईल्सने एक्सक्लूसिव माहिती दिली होती. आम्हाला इंडस्ट्री सोर्सकडून माहिती मिळाली होती कि हे दोन्ही डिवाइस मिड-जानेवारी मध्ये सादर केले जातील. आता Galaxy S10 Lite आणि Galaxy Note 10 Lite ब्लूटूथ सार्टिफिकेशन साइट वर दिसले आहेत.

तसेच काही रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे कि सॅमसंगच्या वेबसाइट वर Galaxy S10 Lite चा सपोर्ट पेज पण तयार झाला आहे. लीक नुसार Samsung Galaxy S10 Lite आणि Galaxy Note 10 Lite फोन्स कंपनी एकसारख्या डिजाइन सह लॉन्च करू शकते.

Samsung Galaxy S10 Lite

Samsung Galaxy S10 Lite चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन पण क्वॉलकॉमच्या पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 सह येईल. एफसीसी वर हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे तसेच फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे समोर आले आहे. Samsung Galaxy S10 Lite एकापेक्षा जास्त वेरिएंट मध्ये बाजारात येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy S10 Lite ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह येईल. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळेल. तसेच हा फोन 12 मेगापिक्सलच्या सेकेंडरी आणि 5 मेगापिक्सलच्या थर्ड कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Galaxy S10 Lite मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे समोर आले आहे.

Samsung Galaxy S10 Lite एफसीसी च्या लिस्टिंग मध्ये 4500एमएएच ची पावरफुल बॅटरी सह असल्याचे सांगण्यात आले आहे. लिस्टिंगनुसार हा स्मार्टफोन EA-TA845 मॉडेल नंबर असलेल्या चार्जरला सपोर्ट करेल. हाच मॉडेल नंबर असलेला चार्जर Samsung Galaxy Note 10 Plus मध्ये दिसला होता आणि तो स्मार्टफोन 45वॉट फास्ट चार्जर सह बाजारात आला होता. म्हणजे Samsung Galaxy S10 Lite पण 45वॉट फास्ट चार्जरला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy Note 10 Lite

Samsung Galaxy S10 Lite चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार या स्मार्टफोन मध्ये 6.69 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळू शकतो. तसेच असे सांगण्यात आले आहे कि गॅलेक्सी एस10 लाइट ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल तसेच फोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा दिला जाईल. पावरबॅक साठी Samsung Galaxy S10 Lite मध्ये 45वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरी असल्याचे समोर आले आहे.

Samsung Galaxy Note 10 Lite बद्दल कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही त्यामुळे समोर आलेल्या स्पेसिफिकेशन्स आणि डिटेल्स वर विश्वास ठेवता येणार नाही जोपर्यंत Samsung स्वतः Galaxy Note 10 Lite बद्दल बोलत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here