Samsung Galaxy S10 Lite बनला सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, कंपनीने किंमतीत केली मोठी कपात

Samsung ची गॅलेक्सी ‘एस सीरीज’ हाईएंड स्पेसिफिकेशन्स फ्लॅगशिप स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. अलीकडेच लॉन्च झालेला Samsung Galaxy S20 FE च्या आधी या सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy S10 Lite होता जो 42,999 रुपयांच्या बेस किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध होता. आज हा फोन अजून स्वस्त करत सॅमसंगने फोनच्या किंमतीत 2,000 रुपयांची कपात केली आहे. या प्राइस कट नंतर सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइट पुन्हा या सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनला आहे.

Samsung Galaxy S10 Lite भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता. फोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 512 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत कमी झाल्यानंतर फोनच्या 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 40,999 रुपये झाली आहे तर फोनच्या 512 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत काही बदलली नाही आणि याची किंमत 47,999 रुपये आहे. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येते आणि हा फोन प्रिज्म व्हाइट, प्रिज्म ब्लॅक आणि प्रिज्म ब्लू कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy S10 Lite

सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइटचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे, ज्यात वरच्या बाजूला पंच-होल सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन सॅमसंग वन यूआई 2.0 आधारित अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे जो ऑक्टाकोर प्रोसेसर सह 7 नॅनोमीटर आर्किटेक्चर वाले क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालतो.

हे देखील वाचा : 9,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे पावरफुल Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइट ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फीसाठी Samsung Galaxy S10 Lite एफ/2.2 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy S10 Lite भारतात एक वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात 8 जीबी रॅम असेल. तसेच फोन मध्ये कमीत कमी 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोन मध्ये तुम्हाला डुअल सिम सह 4जी वोएलटीई सपोर्ट मिळेल. तसेच बेसिक कनेक्विटी फीचर्स सह एनएफसी सपोर्ट पण मिळेल. पावर बॅकअपसाठी Galaxy S10 Lite मध्ये 4,500 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Samsung फोन सह 25वॉट चा चार्जर पण देत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइट व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here