एक्सक्लूसिव: 21 जानेवारी पासून सुरु होईल Samsung Galaxy Note10 Lite ची प्रीबुकिंग, फेब्रुवारी मध्ये होईल सेल

यावर्षीच्या सुरवातीला सॅमसंगने लॉस वेगास मध्ये झालेल्या कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक शो सीईएस मध्ये Galaxy S10 Lite आणि Galaxy Note10 Lite ची घोषाणा केली होती. तेव्हा पासून भारतात या फोन्सच्या लॉन्चची चर्चा सुरु आहे. काही दिवसांनी Samsung Galaxy S10 Lite फ्लिपकार्ट वर लिस्ट करण्यात आला होता आणि 23 जानेवारी पासून या फोनची प्रीबुकिंग सुरु होत आहे. आज 91मोबाईल्स कडे Samsung Galaxy Note10 Lite बद्दल एक्सक्लूसिव माहिती आहे. आम्हाला जी बातमी मिळाली आहे त्यानुसार सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 लाइटची प्रीबुकिंग 21 जानेवारीला भारतात सुरु होणार आहे आणि जानेवारीच्या शेवटी हा लॉन्च केला जाईल. फोनची विक्री फेब्रुवारी मध्ये सुरु होईल. फोनची प्री बुकिंग ऑफलाइन आणि ऑनलाइन एक साथ सुरु होईल. आम्हाला हि माहिती अश्या सोर्स कडून मिळेल आहे जे सॅमसंगच्या प्लानिंग आणि स्ट्रॅटेजी मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. इतकेच नाही तर त्यांनी आम्हाला सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइटच्या सेल बद्दल पण सांगितले आहे.

त्यांनी सांगितले कि “सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइट, नोट 10 लाइटच्या आधी सेलसाठी उपलब्ध होईल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात एस10 लाइटचा सेल सुरु होईल आणि नंतर नोट 10 लाइट येईल. यादरम्यान गॅलेक्सी ए51 आणि गॅलेक्सी ए71 पण स्टोर वर येतील. कंपनीचा असा प्रयत्न आहे कि भारतात सॅमसंग गॅलेक्सी एस11 ज्याला आता गॅलेक्सी एस20 म्हटले जात आहे, त्याच्या लॉन्चच्या आधी या फोन्सचा सेल सुरु केला जावा.”

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी आम्ही Samsung Galaxy Note10 Lite आणि गॅलेक्सी ए51 व गॅलेक्सी ए71 च्या किंमतीची माहिती दिली आहे. आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार गॅलेक्सी नोट 10 लाइटच्या बेस मॉडेल म्हणजे 6जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत 35,990 रुपये असेल. तसेच गॅलेक्सी नोट10 लाइटच्या 8जीबी रॅम मॉडेलची किंमत 39,990 रुपये असेल. राहिला प्रश्न ए सीरीजच्या फोन्सचा तर हे 22,990 आणि 29,990 रुपयांमध्ये सादर केले जाऊ शकतात.

Samsung Galaxy Note10 Lite स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy Note10 Lite मध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले आहे जो पंच होल डिस्प्ले सह येतो. कंपनीने याला सिनेमॅटिक इनफिनिटी डिस्प्लेचे नाव दिले आहे. हा फोन 10 एनएम आर्किटेक्चर असलेल्या एक्सनॉस 9810 चिपसेट वर चालतो. हा फोन 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅम मध्ये येतो आणि दोन्ही वेरिएंट्स मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. यात माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 1 टीबी पर्यंत मेमरी एक्सपांड करू शकता. गॅलेक्सी नोट 10 लाइट एनएफसी व सॅमसंग पे सारख्या फीचर्स सह येतो तसेच पावर बॅकअपसाठी या डिवाईस मध्ये सुपर फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy Note10 Lite चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सॅमसंगने फक्त सॉफ्टवेयर नाही तर आउटर लुकच्या बाबतीत पण फोनचा कॅमेरा डिपार्टमेंट खास बनवला आहे. बॅक पॅनल वर चौकोनी आकाराचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एफ/2.2 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/1.7 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलचा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आहे. फ्रंट पॅनल वरील पंच-होल मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

Samsung Galaxy S10 Lite चे स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy S10 Lite मध्ये 6.7 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 2400×1080 पिक्सल आहे आणि कंपनीने सुपर एमोलेड पॅनलचा वापर केला आहे. फोन मध्ये तुम्हाला पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याला कंपनीने Infinity O डिस्प्लेचे नाव दिले आहे.

Samsung Galaxy S10 Lite क्वालकॉम Snapdragon 855 चिपसेट चालतो आणि यात तुम्हाला 7 नॅनो मीटर आर्किटेक्चर असलेला आॅक्टाकोर प्रोसेसर मिळेल. तसेच 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज मिळेल. फोटोग्राफीसाठी 48 MP चा कॅमेरा आहे जो एफ/2.0 अपर्चर सह येतो. यात वाइड अँगल सपोर्ट आहे. तसेच ओआईएस पोर्ट पण देण्यात आला आहे. सोबत 5 MP + 12 MP चे सेंसर्स पण आहेत. सेल्फीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइट मध्ये 32 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S20

11 फेब्रुवारीला न्यूयॉर्क मध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस 20 सीरीजचा लॉन्च आहे आणि आतापर्यंत जी बातमी मिळाली आहे त्यानुसार कंपनी गॅलेक्सी एस20 अल्ट्रा, गॅलेक्सी एस20 प्लस, गॅलेक्सी एस20 प्लस 5जी आणि गॅलेक्सी एस20 सह चार फोन सादर करणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 लाइट वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here