7000mAh बॅटरी आणि 4 बॅक कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Samsung चा नवीन फोन Galaxy M62

Samsung ने गॅलेक्सी एम-सीरीजमध्ये एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे, ज्याचे नाव Galaxy M62 आहे. कंपनीने हा फोन चुपचाप थायलंडमध्ये सादर केला आहे जो कंपनीच्या वेबसइटवर नवीन मॉडेल म्हणून अपडेटेड झाला आहे. गॅलेक्सी एम62 फोन गेल्या आठवड्यात भारतात लॉन्च झालेल्या Samsung Galaxy F62 चा रीब्रँडेंड वर्जन आहे. दोन्ही फोन्सचे सर्व स्पेसिफिकेशन्स जलपास एकसारखे आहेत. कंपनीने गेल्यावर्षी एफ-सीरीज मध्ये सर्वप्रथम गॅलेक्सी एफ41 भारतात लॉन्च केला होता. त्याचप्रमाणे गॅलेक्सी एफ62 जगात सर्वप्रथम गेल्या महिन्यात भारतातच लाॅन्च केला गेला आहे. (samsung galaxy m62 launch with 7000mah battery)

डिजाइन

डिजाइन बद्दल बोलायचे तर सॅमसंग गॅलेक्सी एम62 आणि Galaxy F62 अगदी एकसारखे आहेत. फोनमध्ये पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे जो स्क्रीनच्या वर मध्यभागी आहे. तसेच Galaxy M62 च्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे चौकोनी आकारात आहे. या सेटअपच्या खाली फ्लॅश दिसत आहे तसेच पॅनलवर सर्वात खाली वर्टिकली Samsung लोगो आहे.

हे देखील वाचा : Vivo ने कमी केली 32MP चा सेल्फी कॅमेरा असलेल्या वीवो V20 SE ची किंमत, आता या किंमतीत होत आहे विक्री

स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी एम62 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.7 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2400) सुपर एमोलेड प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. सध्या फोन कोणत्या ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येईल याची कोणतीही माहिती मिळाली नाही. गॅलेक्सी एम62 फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. जी माइक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येते.

गॅलेक्सी एम62 मध्ये मागे चौकोनी क्वाड-कॅमेरा सेटअप स्पोर्ट आहे, ज्यात 64MP मेन सोनी आईएमएक्स 682 सेंसर आहे. तसेच गॅलेक्सी M62 वर 12MP अल्ट्रा-वाइड लेंस आहे जी 123-डिग्री व्यू कॅप्चर करते. त्याचबरोबर फोनमध्ये 5MP मॅक्रो लेंस क्लोज-अप शॉट्स कॅप्चर करण्यासाठी मिळेल. गॅलेक्सी F62 च्या 5MP डेप्थ सेंसर लेंसमध्ये लाइव फोकससह अद्भुत पोर्ट्रेट शॉट घेता येतील. फोन मध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी गॅलेक्सी F62 चा 32MP फ्रंट कॅमेरा 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि स्लो-मो सेल्फीला पण सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : ताकदवान प्रोसेसर आणि दमदार कॅमेरा असलेला पावरफुल फोन Vivo X60 इंडियन साइटवर झाला लिस्ट, आता Samsung-Xiaomi ची उडेल झोप

बॅटरी आणि कनेक्टिविटी फीचर्स

कनेक्टिविटी ऑप्शनसाठी यात 4जी, डुअल बॅंड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, एफएफसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. तसेच, फोन मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम62 फोन मध्ये 7,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनचे डायमेंशन 163.9×76.3×9.5mm आणि वजन 218 ग्राम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here