ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Samsung Galaxy M54 5G चा नवा लुक; लाँच होण्याआधी डिजाईन लीक

Highlights

  • Samsung Galaxy M54 5G चा 360डिग्री व्हिडीओ लीक झाला आहे.
  • यात फोनचे सर्व पॅनल्स व अँगल दाखवण्यात आले आहेत.
  • हा सॅमसंग फोन एक्सनॉस 1380 चिपसेटवर लाँच होऊ शकतो.

Samsung लवकरच टेक विश्वात मोठा धमाका करणार आहे, कंपनी लवकरच आपली Galaxy S23 Series बाजारात आणणार आहे. ही सीरिज फ्लॅगशिप लेव्हलची असल्यामुळे सर्वांच्याच बजेटमध्ये बसेलच असं नाही. म्हणूनच मिडबजेट युजर्ससाठी कंपनीचा Samsung Galaxy M54 5G येत आहे. कंपनीनं जरी या स्मार्टफोनची अधिकृत माहिती दिली नसली तरी हा फोन यंदा होळी निमित्त ग्राहकांच्या भेटीला येईल. तत्पूर्वी एका नवीन लीकमधून या सॅमसंग फोनची रेंडर ईमेज आणि 360डिग्री व्हिडीओ लीक झाला आहे ज्यात फोनच्या संपूर्ण लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे.

Samsung Galaxy M54 5G फोन संबंधित ही माहिती टेक वेबसाइट माय स्मार्ट प्राइसनं शेयर केली आहे. वेबसाइटनं फोनचा व्हिडीओ शेयर केला आहे ज्यात फोन 360डिग्री अँगलनं दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये फोनचे सर्व पॅनल व पोर्ट्स दिसत आहेत. लीकच्या माध्यमातून लाँचच्या आधीच गॅलेक्सी एम54 5जी फोनच्या डिजाईन सोबतच अनेक महत्वाच्या फीचर्सची माहिती मिळाली आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमी नव्हे तर ही कंपनी आणतेय स्वस्त 5G Phone; 4 फेब्रुवारीला येणार भारतात

कशी असेल Samsung Galaxy M54 5G ची डिजाईन?

सॅमसंग गॅलेक्सी एम54 5जी फोन पंच-होल अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह येईल. या स्क्रीनच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तथा खालच्या बाजूला बारीक चीन आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी असलेल्या होलमध्ये सेल्फी कॅमेरा असेल. फोनच्या मागे डावीकडे व्हर्टिकल ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश आहे. उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन आहे. डाव्या पॅनलवर सिम स्लॉट आहे. हा फोन dark blue, blue, pink आणि green कलरमध्ये दिसत आहे. हे देखील वाचा: पुन्हा स्वस्तात फ्लॅगशिप फोन देणार वनप्लस? आगामी OnePlus 11 price लीक, जाणून घ्या व्हेरिएंट्स व किंमत

Samsung Galaxy M54 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 12GB RAM
  • Android 13
  • 2.40Ghz Processor
  • Samsung Exnos 1380 SoC

फोनच्या स्पेसिफिकेशन्सची जास्त माहिती उपलब्ध नाही. लीक्स व सर्टिफिकेशन्स नुसार हा फोन 8जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग एक्सनॉस 1380 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो जो 2.40गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडसह येईल. हा 5जी सॅमसंग फोन लेटेस्ट अँड्रॉइड ओएस अँड्रॉइड 13 सह येईल. तसेच मार्केटमध्ये या स्मार्टफोनचा 12जीबी रॅम व्हेरिएंट देखील येऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here