6GB RAM सह Samsung Galaxy M35 5G फोन बेंचमार्क साईटवर झाला लिस्ट, प्रोसेसर पण आला समोर

Samsung ने अलीकडेच Galaxy A35 5G (संपूर्ण माहिती) ला भारतात लाँच केले आहे जो 30,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या मोबाईलला बाजारात आल्यानंतर आता कंपनीच्या ‘एम’ सीरिजचा नवीन स्मार्टफोन समोर आला आहे जो Samsung Galaxy M35 5G नावाने भारतात लाँच होऊ शकतो हा गॅलेक्सी एम35 5जी फोन चीनी बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे ​जिथे अनेक स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली आहे.

Samsung Galaxy M35 5G गीकबेंच माहिती

  • सॅमसंग गॅलेक्सी एम35 5जी फोन गीकबेंचवर SM-M356B मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे.
  • लिस्टिंगमध्ये समोर आले आहे की हा सॅमसंग मोबाईल Android 14 OS वर लाँच होईल.
  • या मदरबोर्ड सेक्शनमध्ये ब्रँडच्या Exynos 1380 चिपसेटचे कोडनेम लिहिले आहे.
  • Samsung Galaxy M35 5G फोनमध्ये 2.4GHz Cortex-A78 + 2.0GHz Cortex-A55 CPU मिळेल.
  • ग्राफिक्ससाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये Mali-G68 GPU दिली जाणार असल्याची माहिती लिस्टिंगमध्ये समोर आली आहे.
  • बेंचमार्क स्कोर पाहता गॅलेक्सी एम35 5जी ला 656 Single-Core व 1967 Multi-Core मिळाला आहे.

Samsung Galaxy A35 5G चे स्पेसिफिकेशन

  • 6.6″ 120Hz AMOLED Screen
  • Samsung Exynos 1380
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 25W 5,000mAh Battery
  • 13MP Selfie Camera
  • 50MP Triple Rear Camera

डिस्प्ले : सॅमसंग गॅलेक्सी ए35 5जी फोन 1080 x 2340 पिक्सल रेजोल्यूशन असणारी 6.6 इंचाच्या फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन 120हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 1000 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते.

प्रोसेसर : हा फोन अँड्रॉइड 14 आधारित वनयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी यात 5 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला एक्सिनॉस 1380 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.4 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर 50 मेगापिक्सल OIS सेन्सर देण्यात आला आहे ज्यासोबत एफ/2.2 अपर्चर 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/2.4 अपर्चर 5 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स मिळते. तसेच Galaxy A35 5G 13 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 25 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी पण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here