पुन्हा कमी झाली सॅमसंगच्या चार रियर कॅमेरा असलेल्या गॅलेक्सी ए9 ची किंमत, जाणून घ्या किती रुपयांत मिळेल हा शानदार फोन

सॅमसंग ने गेल्या महिन्यात भारतातील चार रियर कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 ची किंमत कमी केली होती. कंपनीने या फोनची किंमत 3,000 रुपयांनी कमी केली होती जी फोनच्या दोन्ही वेरिएंट्स वर लागू झाली होती. आत एका महिन्याच्या आताच सॅमसंगने पुन्हा एकदा या शानदार स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. सॅमसंग इंडिया ने पुन्हा गॅलेक्सी ए9 ची किंमत थेट 3,000 रुपयांनी कमी केली आहे आणि आज पासून हा फोन नव्या किंमतींवर सेल साठी उपलब्ध झाला आहे.

सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला होता. कंपनी ने फोनचा 6जीबी रॅम वेरिएंट 36,999 रुपये आणि 8जीबी रॅम वेरिएंट 39,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. तसेच गेल्या महिन्यात कमी झालेल्या किंमतींनंतर दोन्ही वेरिएंट्सच्या किंमती क्रमश: 33,990 रुपये व 36,990 रुपये झाल्या होत्या. आज पुन्हा झालेल्या प्राइज कट नंतर गॅलेक्सी ए9 चा 6जीबी रॅम वेरिएंट 30,990 रुपये तसेच 8जीबी रॅम वेरिएंट 33,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

गॅलेक्सी ए9 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोन मध्ये 1080×2280 पिक्सल रेजल्यूशन 6.3-इंचाचा सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 18.5:9 आसपेक्ट रेशियो असलेला बेजल लेस डिस्प्ले आहे. तसेच हा फोन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो. जो सॅमसंगच्या यूजर इंटरफेस एक्सपीरियंस 8.5 यूआई सह चालतो. तसेच प्रोसेसिंग साठी कंपनी ने हा फोन 14एनएम ऑक्टा-कोर प्रोसेसर वर सादर केला आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रीनो 512 जीपीयू आहे.

सोनी एक्सपीरिया एक्सए3 चा फोटो झाला लीक, 25 फेब्रुवारीला लॉन्च होईल हा शानदार स्मार्टफोन

तसेच गॅलेक्सी ए9 बद्दल बोलायचे तर यात बॅक पॅनल वर 4 रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. यातील एफ/1.7 अपर्चर वाला 24-मेगापिक्सलचा ओआईएस सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर, एफ/2.4 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर वाला 10-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 एफ/2.0 अपर्चर वाल्या 24-मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याने सुस्सज आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे तसेच हा फोन अनलॉकिंग साठी फेस रिकॉग्निशन फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी सॅमसंग ने गॅलेक्सी ए9 क्विक चार्ज 2.0 सपोर्ट वाल्या 3,800एमएएच बॅटरी सह लॉन्च केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here