Exclusive: 22,990 रुपयांमध्ये लॉन्च होईल Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 ची किंमत असेल 29,990 रुपये

सॅमसंगच्या नवीन Galaxy A सीरीज बाबत गेल्या अनेक महिन्यांपासून बातम्या येत होत्या. गेल्याच महिन्यात कंपनीने Galaxy A51 आणि Galaxy A51 वियतनाम मध्ये लॉन्च केले होते. त्यानंतर बातम्या येऊ लागल्या होत्या कि लवकरच हे फोन्स भारतात पण लॉन्च केले जाऊ शकतात आणि आज 91मोबाईल्स कडे या फोन्स संबंधित खास बातमी उपलब्ध आहे. कालच आम्ही माहिती दिली होती कि Samsung Galaxy A51 आणि Samsung Galaxy A51 चे पोस्टर दिल्ली एनसीआर मध्ये लागण्यास सुरवात झाली आहे आणि पुढल्या आठवड्यापासून हा भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. तर आज आमच्याकडे या फोन्सची किंमत पण उपलब्ध आहे. Samsung Galaxy A51 भारतीय बाजारात 22,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल तर Galaxy A71 ची किंमत 29,990 रुपये असेल. आम्हाला हि माहिती ऑफलाइन रिटेल सोर्सच्या माध्यमातून मिळाली आहे आणि त्यांनी सांगितले कि हे फोन्स मकर संक्रांतीच्या आसपास लॉन्च केले जाऊ शकतात.

सॅमसंग Galaxy A51 चे स्पेसिफिकेशन

वर सांगितल्याप्रमाणे Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 वियतनाम मध्ये आधीच लॉन्च करण्यात आले आहेत त्यामुळे फोन्सचे सर्व स्पेसिफिकेशन उपलब्ध आहेत. Galaxy A51 मध्ये तुम्हाला 6.5-इंचाची स्क्रीन मिळेल. कंपनीने यात सुपर AMOLED डिस्प्लेचा वापर केला आहे आणि यात 1080 x2400 पिक्सल रेजल्यूशन असलेला पंच होल डिस्प्ले मिळेल. सॅमसंगने याला इनफिनिटी-O डिस्प्ले नाव दिले आहे.

Samsung Galaxy A51 Exynos 9611 चिपसेट वर सादर केला गेला आहे आणि फोन मध्ये 2.3 GHz ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 4 GB, 6 GB आणि 8 GB रॅम सह उपलब्ध आहे तसेच मेमरीसाठी तुम्हाला 64 GB आणि 128 GB ची इंटरनल स्टोरेज मिळते. फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 512 GB पर्यंत मेमरी वाढवू शकता. आम्हाला जी किंमत 22,990 रुपयांची मिळाली आहे ती बेस वेरियंटची आहे आणि आम्हाला जी बातमी मिळाली आहे त्यानुसार भारतात 6जीबी वेरियंट पासून सुरवात होऊ शकते. कंपनी 4जीबी वाला मॉडेल सादर करणार नाही.

फोटोग्राफीसाठी सॅमसंग Galaxy A51 मध्ये पण क्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे आणि याचा मेन सेंसर 48 MP चा आहे. कंपनीने हा एफ/1.8 अपर्चर सह सादर केला आहे. तसेच दुसरा सेंसर 5 MP चा आहे आणि यात तुम्हाला एफ/2.2 अपर्चर मिळेल. हा सेंसर डेफ्थ सेंसिंगसाठी आहे. तर तिसरा सेंसर 5 MP चा आहे आणि हा मॅक्रो मोडला सपोर्ट करतो. हा पण एफ/2.4 अपर्चर सह येतो. फोनचा चौथा सेंसर 12 MP चा आहे जी अल्ट्रा वाइड लेंस आहे. हा सेंसर एफ/2.2 अपर्चर सह येतो.

सेल्फी मध्ये पण हा कमी नाही. या फोन मध्ये तुम्हाला 32 MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. तसेच पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4,000 mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 15W फास्ट चार्जिंग सह येते.

सॅमसंग Galaxy A71 चे स्पेसिफिकेशन

हा फोन थोडा महाग आहे आणि स्पेसिफिकेशन पण चांगले आहेत. Samsung Galaxy A71 मध्ये तुम्हाला 6.7-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन मिळेल. तसेच या फोन मध्ये पण तुम्हाला सुपर ऐमोलेड डिस्प्ले मिळेल आणि कंपनीने हा इनफिनिटी ओ डिस्प्ले सह सादर केला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट वर चालतो आणि यात 2.2 GHz का ऑक्टाकोर प्रासेेसर आहे. हा फोन 6 GB व 8 GB रॅम सह येतो. दोनही तुम्हाला 128 GB स्टोरेज मिळेल. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 512 जीबी पर्यंत हि एक्सपांड करू शकता.

फोटोग्राफीसाठी सॅमसंग Galaxy A71 मध्ये पण क्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे पण याचा मेन कॅमेरा 64 MP चा आहे आणि हा एफ/1.8 अपर्चर सह सादर केला गेला आहे. तर दुसरा सेंसर 5 MP चा आहे. कंपनीने हा एफ/2.2 अर्पचर सह सादर केला आहे आणि हा डेफ्थ सेंसिंगचे काम करतो. फोनचा तिसरा सेंसर 5 MP चा आहे आणि हा अल्ट्रा वाइड मोडला सपोर्ट करतो. हा सेंसर एफ/2.4 अपर्चर सह सादर केला गेला आहे. याचा चौथा सेंसर 12 MP आहे आणि हा अल्ट्रा वाइड अँगलला सपोर्ट करतो.

सेल्फीसाठी या फोन मध्ये 32 MP चा फ्रंट कॅमेरा आहे आणि हा वाइड अँगलला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4,500mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 25W फास्ट चार्जिंग सह येते.

सॅमसंग Galaxy A71 वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here