Exclusive: लवकरच भारतात लॉन्च होईल Samsung चा 64 MP कॅमेरा असलेला Galaxy A70s, पोस्टर झाला लीक

गेल्या अनेक दिवसांपासून Samsung च्या नवीन 64 मेगापिक्सल वाल्या Galaxy A70s ची चर्चा सुरु आहे. आतापर्यंत कंपनीने याबद्दल अधिकृत विधान केले नाही पण 91मोबाईल्सला या फोनचा प्रमोशनल पोस्टर मिळाला आहे ज्यात Galaxy A30s आणि Galaxy A50s सह Samsung Galaxy A70s चा पण उल्लेख आहे. सोबत या फोनचा फोटो पण देण्यात आला आहे. आम्हाला हा पोस्टर सॅमसंगच्या एका रिटेल स्टोर मधून मिळाला आहे. कंपनीने याचे प्रमोशनल पोस्टर लावायला सुरवात केली आहे आणि लवकरच भारतातील अनेक शहरांत हे दिसतील. पोस्टर मध्ये कुठेही स्पेसिफिकेशनचा उल्लेख नाही पण आशा आहे कि लवकरच हा फोन भारतात लॉन्च होईल. आम्हाला जी बातमी मिळाली आहे त्या नुसार सप्टेंबरच्या शेवटपर्यंत हा लॉन्च केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy A70s चे स्पेसिफिकेशंस

Samsung Galaxy A70s बद्दल जास्त माहिती सध्या नाही पण काही लिक्स मधून अशी बातमी अली होती कि हा कंपनीचा पहिला फोन असेल ज्यात 64 MP चा कॅमेरा असेल. त्याचबरोबर असे पण सांगण्यात आले आहे कि A70s काही महिन्यांपूर्वी लॉन्च झालेल्या Galaxy A70 चा अपग्रेड वर्जन असेल. अलीकडेच हा फोन वाईफाई आणि गीकबेंच सहित काही सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट झाला होता जिथे फोनचे काही स्पेसिफिकेशन उपलब्ध होते. बातम्यांनुसार Samsung Galaxy A70s क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर फोन मध्ये तुम्हाला 6 GB रॅम मिळेल. स्क्रीन आणि मेमरी Galaxy A70 सारखीच असण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा: 6,000 रुपये स्वस्त मिळत आहेत Samsung Galaxy Note 10 आणि Note 10+, जाणून घ्या कुठे आणि कसे घ्यावे विकत

Samsung Galaxy A70 चे स्पेसिफिकेशंस

Samsung Galaxy A70 मध्ये तुम्हाला 1080 X 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 6.7-इंचाची मोठी फुलएचडी+ सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच कंपनीने हा इनफिनिटी यू डिस्प्ले सह सादर केला आहे. फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे.

क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट आधारित या फोन मध्ये 2.0 गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 32 मेगापिक्सलचा प्राइमरी, 8 मेगापिक्सल सेकेंडरी आणि 5 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आहे.

सेल्फी साठी सॅमसंग Galaxy A70 मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 25 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500 एमएमएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी झाली स्वस्त, आता द्यावे लागतील 6 रुपयांपेक्षा कमी पैसे

64 मेगापिक्सल कॅमेरा फोन

विशेष म्हणजे सर्वात आधी शाओमी ने रेडमी नोट 8 प्रो मॉडेल चीन मध्ये लॉन्च केला होता ज्यात 64 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. त्यानंतर रियलमी ने भारतात 64 मेगापिक्सल कॅमेरा असेलेला फोन आणला आहे. आता या यादीत नवीन नाव सॅमसंगचे येणार आहे. कंपनी सप्टेंबरच्या शेवटपर्यंत हा फोन लॉन्च करेल. सर्वात खास बाब अशी कि सर्व 64 एमपी कॅमेरा वाल्या फोन्स मध्ये सॅमसंग चा आइसोसेल ब्राइट जीडब्ल्यू1 कॅमेरा सेंसर वापरला जात आहे. तसेच आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार वीवो वी17 प्रो चा पण एक वेरियंट लॉन्च करू शकते ज्यात 64 एमपी चा कॅमेरा असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here