32एमपी सेल्फी कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सह येईल सॅमसंग गॅलेक्सी ए60 स्मार्टफोन

सॅमसंग यावर्षीच्या सुरवातीपासून सतत चर्चेत आहे. कंपनी आतापर्यंत गॅलेक्सी एस10 सीरीज, गॅलेक्सी एम सीरीज सोबत गॅलेक्सी ए सीरीज मध्ये आपले स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. तसेच आता बातमी येत आहे कि कंपनी आपल्या ए सीरीज मध्ये एकूण 9 स्मार्टफोन लॉन्च करेल. आतापर्यंत या सीरीज मध्ये कंपनीने गॅलेक्सी ए 10, गॅलेक्सी ए 30 आणि गॅलेक्सी ए 50 लॉन्च केले आहेत.

तसेच काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट आला होता ज्यात सांगण्यात आले होते कि सॅमसंग तीन अश्या स्मार्टफोन्स वर काम करत आहे ज्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. सांगण्यात आले होते कि हे तिन्ही फोन गॅलेक्सी ए सीरीजचे असतील आणि हे गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए70, गॅलेक्सी ए60 तसेच गॅलेक्सी ए50 नावाने बाजारात येतील. तसेच आता या सीरीज मध्ये सादर केल्या जाणाऱ्या गॅलेक्सी ए60 स्मार्टफोनची अजून थोडी माहिती समोर आली आहे.

हा लीक स्लॅशलीक्स द्वारा समोर आला आहे, ज्यात गॅलेक्सी ए60 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. समोर आलेल्या फोटो नुसार गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी S60 ची डिजाइन जवळपास एक सारखी असेल. प बोलले जात आहे कि गॅलेक्सी ए60 चा डिस्प्ले थोडा मोठा म्हणजे 6.7-इंचाचा असेल जो फुल एचडी+ स्क्रीन रिजॉल्यूशन सह येईल. तसेच फोन गॅलेक्सी ए50 प्रमाणे हा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येईल. स्पेसिफिकेशन शीट मधून समजले आहे कि अपकमिंग ए60 हॅन्डसेट मध्ये 3डी ग्लासस्टिक कंस्ट्रक्शन असेल.

सॅमसंगचा आगामी स्मार्टफोन गॅलेक्सी ए60 बेजल लेस पंच-होल नॉच डिस्प्ले सह येईल. म्हणजे या फोनच्या फ्रंट पॅनल वर बॉडी पार्ट देण्यात येणार नाही. फोनच्या डिस्प्ले मध्ये एक छिद्र असेल आणि या छिद्रात सेल्फी कॅमेरा असेल. तसेच फोटो नुसार कंपनी सॅमसंग गॅलेक्सी ए60 मध्ये एसएम6150 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर असेल. हॅन्डसेट दोन वेरिएंट मध्ये सादर केला जाईल, ज्यात 6जीबी आणि 8जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेज दिली जाईल.

फोटोग्राफी साठी गॅलेक्सी ए60 मध्ये फ्रंट कॅमेरा 32-मेगापिक्सलचा असेल. तसेच फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल जो गॅलेक्सी ए50 मध्ये होता. यात प्राइमरी शूटर मध्ये बदल होतील. सोबत पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,500एमएएच ची बॅटरी असेल.

किंमत पाहता कंपनी गॅलेक्सी ए60 गॅलेक्सी 50 आणि ए 70 च्या मध्ये सादर केला जाऊ शकतो. सध्या या डिवाइसची ऑफिशियल किंमत आणि उपलब्धता समोर आलेली नाही. काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्ट नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए60 गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए70 आणि गॅलेक्सी ए50 स्मार्टफोन सोबत दुसऱ्या तिमाहीत सादर करू शकते. गॅलेक्सी ए60 एप्रिल मध्ये लॉन्च होऊ शकतो.

सॅमसंग बद्दल सांगण्यात आले आहे कि कंपनी यावर्षी आपल्या गॅलेक्सी ए सीरीज मध्ये 9 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे आणि या 9 मध्ये 3 स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतील. गॅलेक्सी ए60 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल कि नाही याबाबत अजूनही शंका आहे. या सीरीज मध्ये गॅलेक्सी ए90 सर्वात मोठा फ्लॅगशिप फोन असू शकतो ज्यात 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here