मोठी स्क्रीन, मोठी बॅटरी आणि ट्रिपल कॅमेऱ्यासह सॅमसंग घेऊन येत आहे दोन मोठे डिवाइस

साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने यावर्षी आपली अगदी नवीन गॅलेक्सी ‘एम’ सीरीज बाजारात आणली होती. तसेच कंपनीने आपल्या ‘ए’ सीरीज मध्ये पण नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. सोबत सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजच्या आगामी स्मार्टफोन्स बद्दल पण अनेक लीक्स येत असतात. अलीकडेच गॅलेक्सी ए70 ब्लूटूथ सर्टिफिकेशन साइटने सर्टिफाइड केला होता. तर आता गॅलेक्सी ए60 आणि ए70 टेना वर स्पॉट केला गेला आहे.

चीनच्या सर्टिफिकेशन साइट टेना वर गॅलेक्सी ए60 आणि ए70 काही स्पेसिफिकेशन्स सह स्पॉट केला गेला आहे. या दोन्ही फोन्सव्यतिरिक्त असे बोलले जात आहे कि ‘ए’ सीरीज मधील फोन ए90 नॉचलेस डिस्प्ले सह पुढल्या महिन्यात 10 एप्रिलला होणाऱ्या इवेंट मध्ये सादर केला जाऊ शकतो.

टेना वर सॅमसंगचे हे स्मार्टफोन्स गॅलेक्सी एसएम-ए6060 मॉडेल नंबर आणि गॅलेक्सी एसएम-ए7050 मॉडेल नंबर सह स्पॉट केले गेले आहेत. हे दोन्ही मॉडेल नंबर क्रमश: गॅलेक्सी ए60 आणि गॅलेक्सी ए70 चे आहेत असे सांगण्यात आले आहे. ए60 बद्दल बोलायचे तर लिस्टिंगनुसार डिवाइस मध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले असेल. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,410एमएएच असेल.

टेना वर समोर आलेल्या फोटोनुसार ए60 च्या डिजाइनची माहिती मिळाली आहे. या फोन मध्ये इनफिनिटी-वी डिस्प्ले दिला जाईल. तसेच बॅक मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश मॉड्यूल असेल. तसेच फोनच्या मागे फिंगरप्रिंट सेंसर दिसत आहे, ज्याचा अर्थ असा कि फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर नसेल.

गॅलेक्सी ए70 पाहता हा एसएम-ए7050 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. लिस्टिंगनुसार या फोन मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले आणि 4,400एमएएच ची बॅटरी असेल. डिस्प्ले साइज पाहता गॅलेक्सी ए60 पेक्षा गॅलेक्सी ए70 मोठा आहे. तसेच गॅलेक्सी ए60 मध्ये इनफिनिटी-ओ डिस्प्ले असेल. डिजाइन बद्दल बोलायचे तर फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा एलईडी फ्लॅश सह दिला जाईल.

साउथ कोरियातील्या दिग्गज कंपनी सॅमसंगने काही दिवसांपूर्वी घोषणा केली आहे कि ते येत्या 10 एप्रिलला ‘गॅलेक्सी ईवेंट’ चे आयोजन करणार आहेत. या इवेंट मध्ये कोणते डिवाइस येतील याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. असे सांगण्यात आले आहे कि या इवेंट मध्ये कंपनी ग्लाबोली ए सीरीजचे सर्व फोन्स सादर करू शकते.

विशेष म्हणजे सॅमसंगच्या नवीन गॅलेक्सी ए-सीरीज मध्ये आतापर्यंत गॅलेक्सी ए40, गॅलेक्सी ए10, गॅलेक्सी ए20, गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए50 लॉन्च केले गेले आहेत. तसेच या सीरीज मध्ये येणारे नवीन फोन कंपनी 10 एप्रिलला होणाऱ्या इवेंट मध्ये सादर करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here