सॅमसंग गॅलेक्सी ए6 आणि गॅलेक्सी ए6 प्लस लॉन्च, इनफिनिटी डिस्प्ले डुअल कॅमेरा आणि शानदार सेल्फी

मागील काही महिन्यांपासून सॅमसंग चे दोन नवीन मॉडेल गॅलेक्सी ए6 आणि गॅलेक्सी ए6+ बद्दल चर्चा होत होती. तसेच काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्स ने माहिती दिली होती कि लवकरच हे फोन भारतात लॉन्च होणार आहेत. या सोबत आम्ही काही स्पेसिफिकेशन पण शेयर केले होते. पण आज सॅमसंग ने या फोन्स वरून पडदा हटवला आहे. कंपनी ने आपल्या आॅफिशियल वेबसाइट वर सॅमसंग गॅलेक्सी ए6 आणि गॅलेक्सी ए6+ लिस्ट केले आहेत. सध्यातरी हे इंडोनेशिया च्या वेबसाइट वर लिस्ट करण्यात आले आहेत पण लवकरच हे भारतात लॉन्च होणार आहेत.

कंपनी ने आता पर्यंत किंमतीची माहिती दिली नाही पण फोन्स चे सर्व स्पेसिफिकेशन उपलब्ध झाले आहेत. सॅमसंग गॅलेक्सी ए6 मॉडेल आहे तर गॅलेक्सी ए6+ थोडा मोठा वेरियंट आहे. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर सॅमसंग गॅलेक्सी ए6 मध्ये तुम्हाला 5.6-इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल. फोन चे स्क्रीन रेजल्यूशन 1480 x 720 पिक्सल आहे. विशेष म्हणजे या फोन मध्ये तुम्हाला 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाला इनफिनिटी डिसप्ले मिळणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए6 मध्ये 16-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी ने याला एफ/1.7 अपर्चर सह सादर केले आहे जो मोठे फोटो घेण्यास सक्षम आहे. तसेच याचा फ्रंट कॅमेरा पण 16-मेगापिक्सलचा आहे. दोन्ही कॅमेरा सोबत तुम्हाला फ्लॅश मिळेल. फोनचा फ्रंट कॅमेरा पण काही कमी नाही. हा एफ/1.9 अपर्चर सह सादर करण्यात आला आहे जो वाइड एंगल सेल्फी घेण्यास सक्षम आहे.

यह फोन सैमसंग के ही एक्नोस 7870 चिपसेट पर कार्य करता है और इसमें 1.6गीगाहट्र्ज का आॅक्टाकोर प्रोसेसर दिया गया है। इसके साथ ही 3जीबी रैम और 32जीबी की इंटरनल मैमोरी है। फोन में मैमोरी कार्ड सपोर्ट है और आप 256जीबी तक के कार्ड का उपयोग कर सकते हैं।


हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो. डुअल सिम आधारित या फोन मध्ये 4जी वोएलटीई सपोर्ट आहे. तसेच सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनी ने यात फेस अनलॉक फीचर पण दिले आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए6+ पाहता हा फोन खुप अडवांस आहे. यात तुम्हाला 6-इंचाची सुपरएमोलेड स्क्रीन मिळेल. जी कंपनी ने फुलचडी प्लस (2220 x 1080 पिक्सल रेजोल्यूशन) सह सादर केली आहे. पण अजूनही प्रोटेक्शन ची माहिती देण्यात आली नाही. या फोन मध्ये तुम्हाला 18.5:9 आसपेक्ट रेशियो वाला इनफिनिटी डिसप्ले मिळेल.

फोटोग्राफी बद्दल बोलायचे झाले तर सॅमसंग गॅलेक्सी ए6+ मध्ये तुम्हाला 16-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा मिळेल. यात एक सेंसर एफ/1.7 अपर्चर सह आहे तर दुसरा एफ/1.9 अपर्चर सह देण्यात आला आहे. सेल्फी च्या बाबतीत हा अजूनच पुढे आहे. याचा फ्रंट कॅमेरा 24—मेगापिक्सल चा देण्यात आला आहे जो एफ/1.9 अपर्चर सह आहे. यात तुम्हाला बॅक सह फ्रंट मध्ये पण फ्लॅश मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी ए6+ क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो आणि यात 1.8गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मध्ये 4जीबी रॅम सह 32जीबी ची इंटरनल मेमरी आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 400जीबी पर्यंतचे कार्ड वापरू शकता.

ए6 प्रमाणे हा फोन पण एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि यात फिंगरप्रिंट स्कॅनर सह फेस अनलॉक पण मिळेल. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here