सर्वात स्वस्त मोबाईलमध्ये दिला 8GB RAM; Samsung Galaxy A04 लाँच, पाहा फुल स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी ‘ए’ सीरीज भारतात आपल्या लो बजेट स्मार्टफोन्ससाठी प्रसिद्ध आहे. तसेच या सीरीजमध्ये Samsung Galaxy A73, Galaxy A53 5G आणि Galaxy A52s 5G सारखे डिवाइस मिडबजेटमध्ये हिट झाले आहेत. तसेच कंपनीचा Galaxy A03 हा स्वस्त मोबाइलची बाजारात जबरदस्त विक्री झाली आहे. आता या स्मार्टफोन गॅलेक्सी ए03 चा अपग्रेड व्हर्जन सॅमसंगनं आज टेक मार्केटमध्ये सादर केला आहे. कंपनीनं नवीन मोबाइल फोन Samsung Galaxy A04 लाँच केला आहे.

Samsung Galaxy A04 स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच झाला आहे. कंपनीनं अजूनतरी मोबाइल फोनच्या किंमतीची माहिती दिली नाही परंतु रिपोर्ट्समध्ये सांगितलं जात आहे की या डिवाइसची किंमत 169 यूरोपासून सुरु होईल. ही किंमत भारतीय चालनानुसार 13,400 रुपयांच्या आसपास असेल. हा फोन तीन व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो ज्यात 4जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजचा समावेश असेल. हे देखील वाचा: सर्वांना परवडणाऱ्या बजेटमध्ये Samsung नं लाँच केले दोन दमदार 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत व वैशिष्ट्ये

Samsung Galaxy A04 चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी ए04 स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे ज्याला कंपनीनं इनफिनिटी व्ही डिस्प्लेचं नाव दिलं आहे. या सॅमसंग मोबाइल फोनचे डायमेंशन 164.4 x 76.3 x 9.1एमएम आणि वजन 192 ग्राम आहे.

Samsung Galaxy A04 अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच झाला आहे जो सॅमसंग वनयुआय कोर 4.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसरसह सॅमसंगचा एक्सनॉस 850 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन तीन व्हेरिएंट्समध्ये विकला जाईल ज्यात 8 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज असेल. लोकांच्या नजारा ‘वळतील’ असा फोन! Samsung ने लाँच केला फोल्डेबल फोन Galaxy Z Flip 4

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A04 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे जो 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A04 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. या मोबाइलमध्ये 3.5एमएम जॅकसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. मार्केटमध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए04 नं black, white, green आणि copper कलरमध्ये एंट्री घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here