सॅमसंग घेऊन येत आहे अगदी नवीन ‘गॅलेक्सी एफ’ सीरीज, डायरी प्रमाणे बंद होणार फोल्डेबल फोन या महिन्यात होईल लॉन्च

सॅमसंग च्या फोल्डेबल फोनची अनेक वर्षांपासून चालू आहे. आधी लीक्स समोर येत होते ज्यात फोनच्या डिजाईन आणि लुक संबंधित माहिती दिली जात होती. पण गेल्या महिन्यात सॅमसंग फोल्डेबल फोन बद्दल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी डी जे कोह यांनी विधान केल्यामुळे या फोनची चर्चा अजूनच वाढली आहे. सॅमसंग फोल्डेबल फोन कसा दिसेल तसेच याचे नाव काय असेल हे अजून आॅफिशियल झाले नाही. पण फोल्डेबल फोन संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि सॅमसंग हा फोल्डेबल फोन ‘गॅलेक्सी एफ’ सीरीज मध्ये लॉन्च करेल.

सॅम मोबाईल ने सॅमसंग च्या फोल्डेबल फोन बद्दल एक्सक्लूसिव बातमी दिली आहे. या रिपोर्ट अनुसार सॅमसंग या फोल्डेबल फोन साठी एक नवीन स्मार्टफोन सीरीज घेऊन येणार आहे जिचे नाव गॅलेक्सी एफ सीरीज असेल आणि या सीरीज अंतर्गत कंपनीचा फोल्डेबल फोन लॉन्च होईल. रिपोर्ट अनुसार या महिन्यात आयोजित होणाऱ्या एसडीसी 2018 मध्ये सॅमसंग आपला हा फोन जागासमोर अनु शकते आणि हा टेक मंचावर सादर करू शकते.

सॅमसंग गॅलेक्सी एफ सीरीजच्या या फोल्डेबल फोनचा मॉडेल नंबर या रिपोर्ट मध्ये एसएम-एफ900यू सांगण्यात आला आहे. रिपोर्ट अनुसार सॅमसंग आपल्या फोल्डेबल फोन साठी एक वेगळा एंडरॉयड यूजर इंटरफेस बनवत आहे जो खूप यूनिक असेल. या एंडरॉयड यूआई साठी सॅमसंग कंपनी गूगल सोबत मिळून काम करत आहे. सॅमसंग फोल्डेबल फोन बद्दल बोलले जात आहे कि फोन मध्ये 512जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात येईल.

सॅमसंग चे वरिष्ठ अधिकारी डी जे कोह यांनी एका इंटरव्यू मध्ये सांगितले आहे कि कंपनीचा फोल्डेबल डिवाईस टॅबलेट आणि फोन दोन्हींचे काम करेल. हा डिवाईस टॅबलेटच्या आकाराचा असेल पण यूजर याला फोल्ड करून म्हणजेच घडी करून एखाद्या फोन प्रमाणे आपल्या खिशात ठेऊ शकतील. कोह यांच्या अनुसार सॅमसंगचा फोल्डेबल डिवाईस यूजर्सना मल्टीटास्क करण्यास खूप उपयोगी पडेल.

सॅमसंग चे म्हणणे आहे कि हा डिवाईस मल्टी टास्किंग सोबतच इजी पॉर्टबिलिटी वाला असेल. म्हणजे यूजर्स टॅबलेट म्हणून यावर त्यांची कामे करू शकतील आणि एखाद्या सामान्य फोन प्रमाणे हा खिशात ठेवता येईल. सॅमसंग काही दिवसांनी होणाऱ्या आपल्या वार्षिक कॉफ्रेंस मध्ये हा फोल्डेबल फोन शोकेस करेल जो पुढल्या वर्षी बाजारात लॉन्च होईल अशी अशा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here