67 हजारांच्या आत Revamp Buddie 25 इलेक्ट्रिक बाइक लाँच; लायसन्सविना येणार चालवता

इलेक्ट्रिक व्हेइकल्सची मागणी देशात मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. त्यातही ग्राहक इलेक्ट्रिक स्कूटरला जास्त पसंती देत आहेत. त्यामुळे या सेगमेंटमध्ये दिवसेंदिवस अनेक नव्या कंपन्या येत आहेत. यात आता रीव्हॅम्प मोटोचा समावेश झाला आहे. कंपनीनं भारतातील पहिली ट्रांसफॉर्मेबल EV, Revamp Buddie 25 लाँच केली आहे. ही ई-बाइक चालवण्यासाठी लायसन्स किंवा रजिस्ट्रेशनची गरज नाही. चला जाणून घेऊया या इलेक्ट्रिक बाइकची किंमत, रेंज, टॉप स्पीड आणि फीचर्स.

किंमत आणि फायनान्स ऑप्शन

Buddie 25 ई-बाइकची किंमत 66,999 रुपयांपासून सुरु होते, ही किंमत एक्स-शोरूमनुसार आहे. विशेष म्हणजे तुम्ही ही इलेक्ट्रिक बाइक फक्त 999 रुपये देऊन बुक करू शकता. Buddie 25 ची बुकिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर सुरु आहे.Buddie 25 इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना देशभरातील अनेक शहरांमध्ये चालवण्यासाठी दिली जाईल. हे देखील वाचा: भारतीयांसाठी खास भेट! अत्यंत स्वस्तात 50MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेला Samsung Galaxy A04 लाँच

Revamp आपल्या इलेक्ट्रिक बाइकवर No Cost EMI आणि अनेक महिन्यांसाठी कमी व्याजदरासह इन्स्टंट लोन सारखे फायनान्स ऑप्शन देखील देत आहे. तसेच Buddie 25 लोनवर खरेदी करणं खूप सोपं आहे. या इलेक्ट्रिक बाइकची शॉपिंग विंडो 16 डिसेंबर 2022 दुपारी 12 वाजता ओपन झाली आहे. तर डिलिव्हरी एप्रिल 2023 पर्यंत सुरु होईल असा कंपनीनं सांगितलं आहे.

Revamp Buddie 25 चे स्पेसिफिकेशन्स

या इलेक्ट्रिक स्कूटरचा लूक एकदम वेगळा आहे, जो खूपच आकर्षक दिसतो. यामध्ये मल्टिपल व्हेईकल अदलाबदल करण्यायोग्य अटॅचमेंटचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना इन्सुलेटेड बॉक्स, सॅडल बॅग, वाहक, चाइल्ड सीट, बेस प्लेट, बेस रॅक आणि सँडल स्टे मिळेल. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीच्या डोकेदुखीत वाढ; 9,299 रुपयांमध्ये Samsung Galaxy A04e ची एंट्री

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीनं 48V 25 Ah लिथियम आयन बॅटरी पॅक दिला आहे. त्यामुळे ही स्कूटर सिंगल चार्जवर 70 किमी पर्यंतचा प्रवास करू शकते. या इलेक्ट्रिक बाइकचा टॉप स्पीड ताशी 25 किमी इतकाच आहे, म्हणून ही चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकत नाही. ही पिकअप क्षमता 120 किलो इतकी आहे.

Revamp Buddie 25 मध्ये IP 67 रेटेड, स्मार्ट BMS आणि CAN इनेबल्ड बॅटरी पॅक देण्यात आला आहे. यासाठी कंपनीनं यासाठी इन-हाउस बॅटरी पॅक बनवला आहे, जो एक मिनिटांत सहज स्वॅप करता येते. हिची बॅटरी फक्त 1 तास 45 मिनिटांत 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here