Redmi K80 स्मार्टफोनवर काम झाले सुरू, पावरफुल Redmi K80 Pro पण असेल

Xiaomi सब-ब्रँड रेडमीने गेल्यावर्षी आपल्या होम मार्केट चीनमध्ये ‘रेडमी के70’ सीरिजला सादर करत Redmi K70, Redmi K70 Pro आणि Redmi K70e स्मार्टफोन लाँच केले होते. हे तिन्ही मोबाईल हायएन्ड स्पेसिफिकेशनसोबत बाजारात आणले होते. तसेच आता बातमी समोर येत आहे की कंपनी या सीरिजची नेक्स्ट जेनरेशन रेडमी के 80 सीरिजला पण लवकर सादर करण्याच्या तयारीमध्ये आहे. या अपकमिंग स्मार्टफोन सीरिजचा Redmi K80 आणि Redmi K80 Pro स्मार्टफोन लीकमध्ये समोर आला आहे, ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Redmi K80 series माहिती (लीक)

  • चीनी मायक्रोब्लागिंग साईट वेईबोवर रेडमी के80 सीरिजची माहिती टिपस्टर द्वारे देण्यात आली आहे. पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे की कंपनीने आपल्या रेडमी के80 सीरिजवर काम सुरु केले आहे तसेच याला येत्या महिन्यामध्ये सादर केले जाईल. ही स्मार्टफोन सीरिज चीनमध्ये लाँच होईल. लीकनुसार सीरिजमध्ये Redmi K80 आणि Redmi K80 Pro आणले जाणार आहेत, तसेच यावेळी कंपनी Redmi K80e लाँच करू शकते.
  • लीकमध्ये अंदाज लावला जात आहे की रेडमी के80 आणि के80 प्रो दोन्ही स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगनचे सर्वात पावरफुल चिपसेटवर लाँच केले जाणार आहेत. यामध्ये Snapdragon 8 Gen 3 सीरिज प्रोसेसर किंवा Snapdragon 8 Gen 4 सीरिज चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच कॅमेराच्या बाबतीत पण हा अपकमिंग रेडमी स्मार्टफोन अ‍ॅडव्हान्स टेक्नोलॉजी व फिचर्ससह असणार आहे.
    • Redmi K70 आणि K70 Pro चे स्पेसिफिकेशन

      • डिस्प्ले: Redmi K70 आणि K70 Pro फोनमध्ये 6.67 इंचाचा TCL C8 OLED टेक्नोलॉजी असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर 2K रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. हेच नाही तर या दोन्हीला 4,000 निट्स पीक ब्राइटनेस, 3840Hz PWM हाई-फ्रिक्वेन्सी डिमिंग सपोर्ट, HDR10+ आणि डॉल्बी व्हिजनसह ठेवले जाणार आहे. स्क्रीनवर पंच-होल कटआउट डिझाईन देण्यात आले आहे.
      • प्रोसेसर: Redmi K70 Pro मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसर आहे. तसेच Redmi K70 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 सोबत मार्केटमध्ये आणले जाणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइड 14 आधारित हायपरओएसवर काम करतात. डेटा स्टोर करण्यासाठी दोन्ही स्मार्टफोन 24GB LPDDR5 रॅम आणि 1TB UFS 4.0 इंटरनल स्टोरेजसह येतात.
      • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता Redmi K70 आणि प्रो दोन्हीमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. ज्यात K70 OIS ला सपोर्टसह 50MP 1/1.55-इंचाचा प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. तर प्रो फोन प्रायमरी लेन्ससह 2x झूम असलेला 50MP टेलीफोटो आणि 12MP अल्ट्रा-वाइड लेन्सला सपोर्ट करतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी दोन्ही मध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
      • बॅटरी: Redmi K70 आणि K70 Pro दोन्ही मोबाईल फोन पावरफुल 5,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करते. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 120 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.
      • आणखी: Redmi K70 आणि K70 Pro मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, USB-C पोर्ट, वायफाय-7, NFC, IR ब्लास्टर, ब्लूटूथ 5.4, X-अ‍ॅक्सिस लीनियर मोटर सारख्या अनेक फिचर्सचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here